आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Village In Which Thieves And Smugglers First Roamed; CCTV Cameras Are Installed All Over The Place, Children's Education Is Being Monitored. News And Updates In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजची पॉझिटिव्ह स्टोरी:ज्या गावात आधी चोर आणि तस्कर फिरायचे; तिथे आज सीसीटीव्हीव्दारे ठेवले जाते गावासह मुलांच्या शिक्षणावर लक्ष

वडोदरा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरातमधील वडोदरा जिल्हातील नडा गाव डिजिटल झाले असून अत्याधूनिक सुविधांनी पूर्ण आहे

आजच्या पॉझिटिव्ह स्टोरीत आपण पाहणार आहोत गुजरातमधील वडोदरा जिल्हातील नडा गावाची गोष्ट. हे गाव आता पूर्णपणे डिजिटल झाले असून अत्याधूनिक सोयी-सुविधांनी स्वयंपूर्ण झाले आहे. जे गाव एकेकाळी चोर आणि तस्करांच्या निशाण्यावर असायचे, त्या गावात आज सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून लक्ष ठेवले जात आहे. या गावात पाणी, रस्ते आणि सांडपाण्याची व्यवस्था चांगली आहे. गावातील संपूर्ण घरात नळाव्दारे पाणी सोडण्यात येते. नडा गावात दूध डेअरी असून त्यामूळे लोकांना दूध आणायला बाहेर गावात जाण्याची आवश्यकता भासत नाही. काही लोकांना दुधाच्या माध्यमातून रोजगारदेखील मिळाला आहे. या संपूर्ण परिवर्तनाचे श्रेय ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्यांना दिले जाते.

गावातील प्रमुख भागात 34 कॅमेरे लावले

डभोई तालुक्यातील पंचायत समिती सदस्य आणि गावचे रहिवाशी भावेश पटेलच्या म्हणण्यानुसार, गावाची लोकसंख्या 1800 च्या जवळपास आहे. ते सांगतात की, या गावात प्रत्येक दिवशी चोरीच्या घटना घडत होत्या. गावात तस्कर लोक फिरत असल्यामूळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण व्हायचे. या वाढत चाललेल्या घटनेला आळा बसवण्यासाठी ग्रामपंचायतीने नोव्हेंबर- डिसेंबरच्या सुरुवातीला संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गावातील प्रवेशव्दार, शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयासह 34 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले.

गावातील लोकच करतात सीसीटीव्ही मॉनिटरिंग

नडा गावात जिल्हा परिषदच्या माध्यमातून सीसीटीव्ही लावण्यात आले असून सतत याची मॉनिटरिंग केली जाते. ही जबाबदारी गावातील काही लोकांवर दिली आहे. गावातील लोक तीन शिप्टमध्ये काम करत त्यावर मॉनिटरिंग करतात. याव्दारे गावातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या प्रत्येक घडामोडीवर बारिक लक्ष ठेवले जाते. भावेश पू्ढे सांगतात की, काही विद्यार्थी अभ्यास न करता, बाहेर फिरत असतील, तर त्यांची तक्रार संबंधित शिक्षकांजवळ केली जाते. सोबतच शिक्षकांच्या शिकवणीवरही लक्ष ठेवत त्यांचीसुद्धा मॉनिटरिंग केली जात असते.

संपूर्ण गावात सौर यंत्रणा बसवण्याचे नियोजन

नडा गावच्या सरपंच वैशालीबेन पटेल सांगतात की, आमच्या गावात दोन शाळा असून येथे बोरबार आणि थरवासा गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे मुख्याध्यापक आणि गावातील विद्यार्थांच्या शिकवणीवर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. येणाऱ्या काळात आमचे संपूर्ण गावात सौर यंत्रणा बसविण्याची योजना असून, त्यामाध्यमातून गावातील लोकांना चोवीस तास विज उपलब्ध होणार आहे. यासाठी आम्ही कामही सुरू केले आहे.

कोरोनाकाळात सीसीटीव्ही कॅमेरे खुप कामी आले

वैशालीबेन यांच्या म्हणण्यानुसार, गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा सर्वात जास्त फायदा हा कोरोना काळात झाला. जेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला होता, तेव्हा गावात बाहेरुन येणाऱ्या लोकांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आम्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने निगराणी ठेवत बाहेरुन आलेल्या लोकांना ताबडतोब क्वारंटाईन करायचो.

गावाला स्मार्ट व्हिलेज बनविण्यावर भर देणार - सरपंच

सरपंचा म्हणतात की, येणाऱ्या काळात गावाला पूर्णरित्या डिजिटल बनवण्यावर भर दिला जाईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबत गावातील लोकांना मोफत वायफाय दिले जाणार आहे. गावातील सर्व शाळांमध्ये स्मार्ट क्लास रुम बनविण्यात येत असून विद्यार्थांना संगणक क्लाससोबतच अत्याधूनिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे.

इतर गावादेखील घेत आहे प्रेरणा

नडा गावात 34 सीसीटीव्ही कॅमेरे असून गावात यामुळे सुरक्षितेचा वातावरण निर्माण झाला आहे. नडा गावाची चर्चा इतर सर्वत्र गावात सुरू असून बाकीचे गावदेखील यामुळे प्रेरित होत अशी योजना राबवण्यास तयार झाले आहे. सांगण्यात येते की, गुजरात सरकारकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर 30% सबसिडी देण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...