आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरराजनाथांना मिळालेला मंगोल घोडा आहे 'खास':यांच्यामुळेच चंगेज खान विश्वविजयी; बचावासाठी चीनला बांधावी लागली भिंत

लेखकः अनुराग आनंद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगोलिया दौऱ्यावर गेलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना भेट स्वरुपात एक घोडा मिळाला आहे. 6 वर्षांपूर्वी जेव्हा पंतप्रधान मोदी मंगोलियात गेले होते, तेव्हा त्यांनाही भेट म्हणून घोडाच देण्यात आला होता. ही परंपरा नेहरूंच्या काळापासून सुरू आहे. 16 सप्टेंबर 1958 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू मंगोलिया दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांनाही मंगोलियन प्रजातीचे 3 घोडे भेट म्हणून देण्यात आले होते.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया की, मंगोलियन प्रजातीच्या घोड्यांमध्ये असे काय खास आहे की मंगोलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतातील मोठ्या नेत्यांना भेट म्हणून घोडाच दिला जातो...
आता सर्वात आधी मंगोलियन प्रजातीच्या घोड्याविषयी या ग्राफिक्समध्ये वाचा...

घोड्यांशिवाय मंगोलियाचा इतिहास अपूर्ण
अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीच्या अहवालानुसार, मंगोलियात राहणारे लोक आपल्या दैनंदिन जीवनात दुसऱ्या कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वात जास्त घोड्यांचा वापर करतात. याची 2 कारणे आहेत.
1. इथे सुमारे 4000 वर्षांपासून मंगोलियन ब्रीडच्या घोड्यांचा वापर प्रवासासाठी केला जात आहे. लोक माल वाहून नेण्यासाठी तसेच प्रवासासाठी याचा वापर करतात.
2. सुमारे 850 वर्षांपूर्वी 1175 मध्ये मंगोलियन शासक चंगेज खानने या प्रजातीच्या घोड्यांवर बसूनच पृथ्वीचा 22% भूभाग जिंकला होता. यानंतर इथले लोक दररोजच्या जीवनातच नाही, तर युद्धाच्या मैदानातही घोड्यांना महत्वाचा साथीदार मानू लागले.
मंगोलियन प्रजातीच्या घोड्यांना इथले लोक आपल्या देशाच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतिक मानतात. म्हणूनच इथे येणाऱ्या पाहुण्यांना घोडा भेट देण्याची परंपरा आहे.
मंगोलिया निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण असोसिएशनचे अध्यक्ष जे. सेरेन्डेलेग म्हणतात, मला वाटते की घोड्यांशिवाय मंगोलियाच्या भविष्याचा विचार केला जाऊ शकत नाही.
20,000 मंगोलांनी घोड्यांच्या बळावर 80,000 रशियन सैनिकांना हरवले
वर्ष 1223 मध्ये 80,000 रशियन सैनिकांसमोर 20,000 मंगोलियन सैनिक होते. या युद्धाचे नेतृत्व चंगेज खानच्या दोन लेफ्टनंटकडे होते. समोर चौपट जास्त सैनिक असूनही घाबरण्याऐवजी मंगोलियन घोडेस्वारांनी जोरदार हल्ला केला.
या युद्धात मंगोलियन घोडेस्वारांनी धनुष्य आणि भाल्यांचा वापर करून सहजपणे विजय मिळवला. हे युद्ध मंगोलांनी सैनिकांमुळे नव्हे तर घोड्यांमुळे जिंकल्याचे सांगितले जाते.
अॅनिमलहाऊएव्हर वेबसाईटनुसार, चंगेज खानच्या सैनिकांनी 90 लाख वर्ग किलोमीटर क्षेत्रात आपले साम्राज्य स्थापित करण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या. यादरम्यान मंगोलियन सैनिक निरोगी आणि मजबूत राहण्यासाठी या घोड्यांचे दूध आणि रक्तही प्यायचे. आजही मंगोलियाच्या काही भागात ही परंपरा आहे.

10,000 वर्षे जुन्या घोड्यांच्या वापरामागे 5 कारणे
जगभरातील घोड्यांविषयी माहिती देणाऱ्या ग्लोबलट्रॉटर डॉट कॉम या संकेतस्थळानुसार मंगोलियन प्रजातीच्या घोड्यांना पाळण्याची सुरूवात 4000 वर्षांपूर्वी झाली असली, तरी मध्य आशियात या घोड्यांचे अस्तित्व 10,000 वर्षांपासून आहे.
मंगोलियन शासक चंगेज खानने या घोड्याच्या बळावर आशिया आणि युरोपच्या 90 लाख वर्ग किलोमीटर भागात आपले साम्राज्य स्थापित केले होते. चंगेज खान दररोज या घोड्यावर बसून 80 मैल म्हणजेच सुमारे 128 किलोमीटरचा प्रवास करायचा. तेव्हापासून ते आतापर्यंत या घोड्यांचा वापर या 5 कारणांमुळे होतो...
1. प्रवासासाठी
2. माल वाहून नेण्यासाठी
3. दुधासाठी
4. शिकारीसाठी
5. आध्यात्मिक कारणांमुळे
मंगोलियाच्या लोकसंख्येइतकीच आहे देशातील घोड्यांची संख्या
रिपोर्टनुसार, मंगोलियात आजही हॉर्स-कल्चर जोरकसपणे वाढत आहे. 2020 मध्ये या देशाची लोकसंख्या 33 लाख होती आणि इथे घोड्यांची संख्या 30 लाख होती, यावरूनच याचा अंदाज लावला जाऊ शकतो. आजही घोडा इथल्या पारंपरिक जीवनशैलीचा भाग आहे.
आजही बहुतांश मंगोलियन लोक भटके जीवन जगतात हेही यामागील एक कारण आहे. लोक जेवण आणि अनेक इतर संसाधनांसाठी पशू, बकरी, मेंढ्या, याक, ऊंट आणि घोड्यांच्या झुंडीवर अवलंबून आहेत. मंगोलियन प्रजातीचा घोडा बाळगणाऱ्यांना इथे श्रीमंत समजले जाते. यामुळेच मंगोलियात एक म्हण आहे की, घोड्याशिवाय मंगोल पंखहीन पक्ष्यासारखा आहे.
मंगोलियाकडून दरवर्षी 2 हजार कोटींच्या घोड्यांच्या केसांची विक्री होते
ओईसी डॉट वर्ल्डनुसार मंगोलियातून दुसऱ्या देशांत निर्यात केल्या जाणाऱ्या टॉप-5 वस्तूंमध्ये घोड्यांच्या केसांचा समावेश आहे. 2020 मध्ये मंगोलियाने 1865 कोटी रुपयांच्या घोड्यांच्या केसांची निर्यात केली होती.
याशिवाय 263 कोटींच्या घोड्याचा मांसाचीही मंगोलियाने निर्यात केली आहे. मंगोलियातील प्रत्येक घरात दूध आणि मांसासाठी या घोड्यांचा वापर होत आहे. कमी अंतराच्या प्रवासासाठीही लोक घोड्यांचा वापर करतात, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापरही कमी होतो.

समतल मैदान किंवा वाळवंट किंवा डोंगराळ चढाई प्रत्येक जागेवर मंगोल घोड्यांची क्षमता शानदार असते. याच बळावर चंगेज खानच्या सेनेने जगातील मोठ्या भूभागावर राज्य केले.
समतल मैदान किंवा वाळवंट किंवा डोंगराळ चढाई प्रत्येक जागेवर मंगोल घोड्यांची क्षमता शानदार असते. याच बळावर चंगेज खानच्या सेनेने जगातील मोठ्या भूभागावर राज्य केले.

मंगोलियन घोडेस्वारांपासून बचावासाठी चीनने बांधली भिंत
सायन्स डॉट ओआरजीच्या रिपोर्टमध्ये, मंगोलियन घोडे आणि घोडेस्वारांचा उल्लेख आहे. सुमारे 2200 वर्षांपूर्वी चीनी सैन्य आणि चंगेज खानच्या घोडेस्वार धनुर्धरांमध्ये तुंबळ युद्ध झाले होते. यादरम्यान मंगोलियन घोड्यांमुळे चंगेज खानचे सैनिक खूप प्रबळ झाले होते.
यामुळेच 220 ते 226 ईसवी सनपूर्वी चीनचे प्रथम सम्राट शी हुआंग यांना 6400 किलोमीटर लांबीची भिंत बांधावी लागली होती.
2003 च्या 'द अमेरिकन जर्नल ऑफ ह्युमन जेनेटिक्स'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार जगात चंगेज खानच्या वंशाचे सुमारे 1.6 कोटी पुरुष अस्तित्वात आहेत. रिपोर्टनुसार जगातील सर्वात जास्त याच वंशाचे लोक आहेत. यामागे मंगोलियन घोडेस्वार असल्याचे सांगितले जाते. या घोड्यांवर स्वार होऊन चंगेज सैनिक जिथेही जायचे तिथे महिलांवर बलात्कार करायचे आणि दहशत माजवायचे.
राजनाथ सिंहांना भेट म्हणून मिळालेला घोडा भारतात येणार नाही
मंगोलियाच्या संरक्षण मंत्र्यांनी राजनाथ सिंहांना जो घोडा भेट म्हणून दिला आहे, तो आपल्या देशात येणार नाही. असे यासाठी आहे, कारण मंगोलियात राजनाथ सिंहांना भेट म्हणून प्रतिकात्मक स्वरुपात मिळाली आहे.
2005 मधील पर्यावरण आणि वन मंत्रालयाने तयार केलेल्या कायद्यानुसार, भेट म्हणून पशूंच्या देवाण-घेवाणीवर बंदी आणली आहे. वास्तविक अशा प्रकारची भेट घेण्यास मनाई नाही. हे देणाऱ्या देशाच्या इच्छेवर अवलंबून आहे. पण देशातील कायद्यामुळे हे घोडे देशात आणले जात नाही.
यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेव्हा 2015 मध्ये भेट म्हणून मंगोलियन घोडा मिळाला, तेव्हा तो तेथील भारतीय दुतावासातच ठेवण्यात आला.
घोड्यांची चर्चा होत आहे, तर ग्राफिक्समधून पाहा जगातील सर्वात जुन्या प्रजातीच्या आणि सर्वात महाग घोड्यांविषयी...

बातम्या आणखी आहेत...