आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Wedding Began On March 23, The Lockdown On The 25th; The People Of Groom Side Was Stuck For 52 Days ... Finally Returning House After 71 Days!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:23 मार्चला लागले लग्न, 25 ला लॉकडाऊन; वऱ्हाडी 52 दिवस अडकले... अखेर 71 दिवसांनंतर गृहप्रवेश!

उना (विजय शर्मा)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विवाहबंधनात “लॉक’ होताच कोरोनाची परीक्षा, वऱ्हाडींचा एकाच खोलीत मुक्काम

हिमाचल प्रदेशात उना जिल्ह्यातील सुनीलकुमार याच्या लग्नाचे वऱ्हाड कोलकात्याला पोहाेचले. थाटामाटात लग्नही झाले. मात्र, अक्षता पडताच वैवाहिक जीवन कोरोनामुळे ७१ दिवसांसाठी कैद झाले. घडले असे : सुनील १८ वऱ्हाडी घेऊन २० मार्चला रेल्वेने कोलकात्याला पोहोचले. २३ मार्चला बंगाली पद्धतीनुसार सुनील आणि सुनिप्ता यांचा विवाह पार पाडला. २५ मार्चला परत निघायचे होते. मात्र त्याच वेळी कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाली. सर्व वऱ्हाडी कोलकात्यातील काशीपूरमध्येच मुलीच्या घरी अडकले. वऱ्हाडी मंडळी घरी परतण्यासाठी प्रशासन व राज्य सरकारला सतत विनंती करत होते. मात्र ते शक्य नव्हते. वऱ्हाडींना इतके दिवस एका खोलीत राहावे लागले. एक वेळ तर मुलीकडील कुटुंबाचे धान्यही संपले. नंतर उना जिल्हा प्रशासन आणि हिमाचल सरकारला विनंती केल्यानंतर कशीबशी सर्वांच्या भोजनाची व्यवस्था झाली.

सोलनहून बस कोलकात्यात आल्याची दिलासादायक बातमी मिळाली. जिल्हा प्रशासनाशी परतीसाठी संपर्क साधण्यात आला. १२ मे रोजी बसने रवाना झालेले वऱ्हाड १६ मे रोजी हिमाचलच्या सीमेवर पोहोचले. नियमाप्रमाणे नमुने घेऊन सर्वांची रवानगी इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाइन सेंटरमध्ये आली.

नवरदेवाच्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह... २३ मे रोजी नवरदेवाच्या भावाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे नवरा-नवरीची वापसी पुन्हा लांबणीवर पडली. नवरदेवाच्या भावाला कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. २८ मे रोजी संध्याकाळी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यानंतरच १७ लोकांना घरी जाण्याची परवानगी मिळाली. बीएमओने त्यांची डिस्चार्ज स्लिप देऊन रवानगी केली. २९ मे रोजी नवदांपत्याच्या आयुष्यात आनंदाचा दिवस उजाडला. सुनील व सुनिप्ता घरी पोहोचले व ७१ दिवसांनी नवरीने गृहप्रवेश केला.

अनोखा विवाह साेहळा, जिथे ५२ दिवस वऱ्हाडाचा मुक्काम

सध्या वन डे मॅरेजचा काळ आहे. जुन्या काळात वऱ्हाड २-३ दिवस थांबत असे. मात्र उनातील परोइया गावातील हे कदाचित असे पहिलेच लग्न असेल, जेथे वऱ्हाडी तब्बल ५२ दिवस नवरीच्या घरी मुक्कामी थांबले होते. नवदांपत्य म्हणाले, देशव्यापी लॉकडाऊनमुळे अडचणी आल्या, मात्र जीवन वाचवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचेही होते.

बातम्या आणखी आहेत...