आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Wives Of CDS, Chief Of Army Staff And Air Chief Told Bhaskar On Women's Day How They Take Care Of Military Families

महिला दिन विशेष:सीडीएस, लष्करप्रमुख, हवाई दल प्रमुख यांच्या पत्नींनी सांगितले, घरासोबत सैनिकांच्या कुटुंबांना कशा प्रकारे मदत केली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हवाई दल प्रमुखांच्या पत्नी आशा भदौरिया, लष्करप्रमुखांच्या पत्नी वीणा नरवणे, सीडीएस रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत - Divya Marathi
हवाई दल प्रमुखांच्या पत्नी आशा भदौरिया, लष्करप्रमुखांच्या पत्नी वीणा नरवणे, सीडीएस रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत

संतुलन : सीडीएस पद संवेदनशील, पेशाला कुटुंबापासून वेगळे ठेवतात
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत म्हणाल्या, घरातील मोठे निर्णय दोघांच्या सहमतीने घेतले जातात. त्यांची (पती) व्यग्रता कौटुंबिक विषयात सामील होण्याची परवानगी देत नाही. मी कर्तव्याबरोबरच घराच्या आघाडीवरही काम करते. या दोन्ही भूमिका परस्परांशी पूरक आहेत. सैन्याने आत्मनिर्भर जगावे कसे हे शिकवले आहे. जनरल साहेब राष्ट्रीय कर्तव्यावर बाहेर असतात तेव्हा ते त्रस्त होतील असे काही घरात घडणार नाही, याची खबरदारी मला घ्यावी लागते. आम्ही शंका, आनंद शेअर करतो. त्यांच्या जीवनात प्रवेश केल्यानंतर आलेल्या आव्हानांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्या कठोर मनगटावर मुलायम हातमोजे घालण्याचे काम मी केलेय. आमचे नाते वर्किंग व इमोशनल अशा दोन्ही पातळ्यांवर आहे. त्यांचे पद खूप संवेदनशील आहे. ते राजकारण व सैन्याच्या कक्षेत येते. म्हणूनच पेशाला खासगी नात्यांपासून वेगळे ठेवते. आमच्या जबाबदाऱ्या आमच्या जीवनात रंग भरण्यासाठी पुरेशा आहेत, हे सांगायला आवडेल. सशस्त्र दलांत पत्नींच्या कल्याण संघाची मोठी भूमिका आहे. या गटाने कुटुंब व व्यवसाय यामधील गुंतागुंतीबरोबरच कोरोनाचा निपटारा करण्यातही महत्त्वाची भूमिका निभावली. हा गट कुटुंब व काम यांच्यात सेतूसारखा आहे.

प्रयत्न : सैनिकांच्या पत्नींना कौशल्य विकास, सशक्तीकरणासाठी मदत
लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांच्या पत्नी वीणा नरवणे म्हणाल्या, आम्ही परस्परांच्या सहमतीने निर्णय घेतो. जीवनाचे प्रत्येक वळण आव्हान देणारे असते. तरुण असताना सर्वात मोठी चिंता मुलींची सुरक्षा, शिक्षण व आरोग्याबाबत होती. मोठे झाल्यानंतर वयस्कर आई-वडिलांची प्रकृती, देखभाल या गोष्टींनी जागा घेतली. मी नोकरदार होते. त्यामुळे आमच्यात कामाचे समसमान वाटप झाले. स्वयंपाक, मुलांची कामे किंवा हातपाय पसरून टीव्ही किंवा पेपर वाचत बसल्याचा एक दिवसही मला आठवत नाही. ते अनेक वर्षे लष्करी आघाडीवर तैनात राहिले. मात्र घरी येत तेव्हा संपूर्ण लक्ष आमच्यावर असे. चहा करणे, भाजी खरेदी करणे, मुलांची नॅपी बदलण्यापर्यंत करताना ते मागे राहिले नाहीत. आम्ही परस्परांच्या व्यावसायिक निर्णयांत कधीही हस्तक्षेप केला नाही. आम्हाला आनंद होण्यासाठी फार काही लागत नाही. सैन्य एक मोठे कुटुंब आहे. सैनिकांच्या पत्नींना वारंवार बदल्या, पतीच्या अनुपस्थितीत मुलांचे संगोपन व कौटुंबिक समस्यांना एकट्याने हाताळावे लागते. तोंड द्यावे लागते. एवढे असून स्वत:ची आेळख निर्माण करण्याची त्यांची इच्छा असते. बदलत्या परिस्थितीत सर्व सैनिकांच्या पत्नींमध्ये कौशल्य विकास व्हावा, यासाठी शहीद सैनिकांच्या वीर भगिनींच्या मदतीसाठी आमची संस्था आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन सदैव तत्पर आहे.

पुढाकार : हवाई दलाच्या सैनिकांच्या पत्नींसाठी सायबर जागृतीचा प्रयत्न
हवाई दलाचे प्रमुख आर.के.एस. भदौरिया यांच्या पत्नी आशा भदौरिया म्हणाल्या, आपला समाज खूप विकसित झाला आहे. माझ्या मैत्रिणी बहुतांश होममेकर आहेत. परस्पर संवादाचे सत्र, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम व सायबर जागृतीचे मॉडेल याद्वारे आम्ही त्यांना कुशल बनवत आहोत. हवाई दलाच्या प्रमुखाची पत्नी या नात्याने सर्वात मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. आव्हानांमुळे प्रेरित असलेली व्यक्ती म्हणून मला आेळखले जाते. यासोबत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. एखादी मुलगी हवाई दलातील सैनिकासोबत विवाह करते, तेव्हा तिला सैन्य जीवन कसे असते, याची कल्पना नसते. येथे आमची भूमिका आहे. हवाई दलातील सर्व महिला याबाबतीत अगदी मिळून-मिसळून वागणाऱ्या आहेत. संकटात त्या परस्परांच्या सोबत उभ्या राहतात. अशी भावनात्मक सुरक्षा कोणत्याही महिलेसाठी अतिशय महत्त्वाची असते. जगासाठी जोखीम असणारी गोष्ट आमच्यासाठी सामान्य आहे. आपल्याकडे महिलांना फील्ड ड्यूटीचा अनुभव दीड दशकापासून आहे. हवाई दलाने मूल्यांकन करून लढाऊ भूमिकेपर्यंत सामील केले. निवृत्त झाल्यानंतरही हवाई दलाशी असलेले नाते तुटलेले नाही. नाळेसारखे आम्ही जोडलेलो आहोत. या नात्याला संस्थात्मक रूप देण्यासाठी देशभरात ७ क्षेत्रे तयार केली आणि महिला त्याच्या सदस्य आहेत.

बातम्या आणखी आहेत...