आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • There Are About Four And A Half Hundred Marathi Families Living In Benaras Despite The Corona Crisis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:‘काशी कबहुं न छोडिए, विश्वनाथ दरबार’ : कोरोना संकटातही बनारसमध्ये वास्तव्यास आहेत सुमारे साडेचारशे मराठी कुुटुंबे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
गंगा दशहरानिमित्त यंदा भाविकांची तुरळक उपस्थिती. - Divya Marathi
गंगा दशहरानिमित्त यंदा भाविकांची तुरळक उपस्थिती.
  • दुर्गा घाट, ब्रह्मा घाट, दशाश्वमेघ घाट भागात बहुसंख्य मराठी भाषिकांची वस्ती

(विनोद यादव)

मुंबादेवी, बाबुलनाथ आणि महालक्ष्मीच्या पावन भूमीहून मोठ्या संख्येने उत्तर भारतीय कामगार, मजूर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधील आपल्या मूळ गावी परतले आहेत, परंतु बनारसमध्ये वास्तव्यास असलेल्या सुमारे ४५० मराठी कुटुंबांनी मात्र ‘चना-चबेगा गंग जल, जो पुरवे करतार । काशी कबहुं न छोडिए, विश्वनाथ दरबार,’ असे म्हणत काशीतच मुक्कामी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला जिल्ह्यातील कारखेड गावाहून बनारसला (वाराणसी) गेलेले षडानन पाठक यांचे मूळ आडनाव ‘कारखेडकर’ आहे. दहा पिढ्यांपासून त्यांचे कुटंुब या ठिकाणीच वास्तव्यास आहे. ते म्हणाले, बनारसमध्ये आम्हाला शिळंपाकं मिळालं तरीही इथेच अायुष्य व्यतीत करणार, मात्र काशी कधीही सोडणार नाही. महाराष्ट्र सेवा समितीचे अध्यक्ष संतोष सोलापूरकर यांनी सांगितले की, बनारसमध्ये जुनी जवळपास २५० ते ३०० मराठी कुटंुबे वास्तव्यास आहेत. याशिवाय सातारा-सांगलीसह इतर जिल्ह्यांतून सोने-चांदींचे दागिने त्याशिवाय यासंबंधित कामे करण्यासाठी आलेली मराठी माणसेही आहेत. या कुटंुबांची संख्या १०० ते १५० आहे. सोलापूरकर यांच्या मते, स्वत: अस्सल मराठी भाषिक मानणारे ८० टक्के लोक इथे पौरोहित्य किंवा याज्ञिकीसारखी धार्मिक कामे करतात. २० टक्के लोक शासकीय अथवा खासगी नोकरी करतात.

म्हणून बनारस सोडणार नाही मराठी माणूस

गणेशोत्सवापासून सर्वच मराठी उत्सवांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या साधना वेदांती यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज बनारसला आले होते त्या वेळी महाराष्ट्रातील अनेक लोक बनारसला आले होते. त्याच वेळी अनेक जण इथेच स्थायिक झाले. अर्थात, ते स्थलांतरित कामगार नाहीत. त्यामुळे कोरोनासारख्या संकटातही हे मराठी कुटुंबीय बनारस सोडणार नाहीत. दरम्यान, हे सर्व मराठी भाषिक ब्रह्मा घाट, दुर्गा घाट आणि दशाश्वमेघ घाट या भागात राहतात.

बातम्या आणखी आहेत...