आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • There Are Beds For Patients In The Rooms Of The Madrasa, A Team Of 50 Members Deployed For Treatment, Breakfast Food, Medicines Are All Free

हैदराबादमध्ये मशिद बनले रुग्णालय:मदरशाच्या खोल्यांमध्ये रुग्णांसाठी बेडची व्यवस्था, उपाचारांसाठी 50 जणांची टीम तैनात, औषधांसह नाश्ता-जेवणाची मोफत सोय

अक्षय बाजपेयी7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात धार्मिक स्थळांनी मदतीसाठी हात पुढे केले आहेत.

कोरोनाच्या कठीण काळात सर्व धार्मिक स्थळांनी पीडितांच्या मदतीसाठी त्यांचे दरवाजे उघडले आहेत. हैदराबादमधील मशिद मोहम्मदियाची दारंही गरजुंसाठी उघडली गेली आहेत. सामाजिक बांधिलकी जपत येथे कोरोना रुग्णांवर मशिद आणि मदरशांमध्ये अगदी मोफत उपचार केले जात आहेत.

मशिदी आणि मदरशांमध्ये बेडची व्यवस्था
देशात कोरोनाची दुसरी लाट आली. एप्रिल-मेमध्ये कोरोनाची प्रकरणे इतकी वाढली होती की, रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन व्यवस्था अपुरी पडली. रुग्णांवर ऑक्सिजन सिलिंडर हातात घेऊन व्हीलचेअरवर बसण्याची वेळ आली. हैदराबाद येथेही परिस्थिती काही वेगळी नव्हती. सरकारी रुग्णालयात जागा नव्हती. दरम्यान, हेल्पिंग हँड फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ हैदराबाद डेक्कन कोविड सेंटर सुरू करता येईल, अशा जागेच्या शोधात होते.

ओपीडीबरोबरच येथे विश्रामगृहही बनविण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्थेचे सदस्य 24 तास येथे हजर असतात.
ओपीडीबरोबरच येथे विश्रामगृहही बनविण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्थेचे सदस्य 24 तास येथे हजर असतात.

ते अशा जागेच्या शोधात होते, जी मोठी असावी आणि सोबतच तिथे पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध असावी. जेव्हा फाउंडेशनने राजेंद्रनगर स्थित मशिद मोहम्मदियाशी संपर्क साधला तेव्हा मशिदी व्यवस्थापनाने कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी मशिदी व मदरशा विनाशुल्क उपलब्ध करुन दिली.

मदरशाच्या 23 खोल्यांमध्ये बेड लागले
यानंतर मशिदी आणि मदरशाचे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाले. मदरशाच्या 23 खोल्यांमध्ये कुठे दोन, तर कुठे तीन बेड लावण्यात आले. औषधे, डॉक्टर, विश्रांतीची जागा, कॅज्युअल वॉर्ड तयार करण्यात आले. फिजिओथेरपिस्ट आणि डायटीशियनही नेमले गेले.

रुग्णांच्या सोईसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आणि यासाठी त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेतले गेले नाहीत.
रुग्णांच्या सोईसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आणि यासाठी त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेतले गेले नाहीत.

सर्व परवानग्या मिळाल्यानंतर हे केंद्र 24 मेपासून 40 बेडसह सुरू झाले. फाउंडेशनचे मॅनेजर मोहम्मद फरीद उल्लाह यांनी सांगितले की, पहिल्या दिवशी आठ रूग्ण दाखल झाले होते. दुसर्‍या दिवसापासून सर्व बेड भरले गेले. येथे प्रत्येक बेडसह ऑक्सिजनची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवणसुद्धा दिले जाते. उपचार, औषधे आणि चाचण्यांचा संपूर्ण खर्च फाउंडेशनच उचलते. जर एखादा श्रीमंत रुग्ण असेल तर तो त्याच्या इच्छेने तपासणीसाठी फी भरू शकतो.

जोपर्यंत मदरसा सुरु होत नाही, तोपर्यंत कोविड सेंटर सुरूच राहणार आहे मोहम्मद फरीद उल्लाह यांच्या म्हणण्यानुसार, ज्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी 85 ते 90 च्या दरम्यान आहे, आम्ही त्यांना येथे ठेवतो, परंतु जर एखाद्याचे प्रमाण 85 पेक्षा कमी झाले असेल तर आम्ही रुग्णाला एका हायर सेंटरकडे पाठवतो, कारण येथे कमी सॅच्युरेशन असलेल्या रुग्णांना पुरेशी ऑक्सिजन सुविधा नाही. फाउंडेशन स्वत:च्या खर्चाने सरकारी किंवा खासगी रुग्णालयात रुग्णांसाठी बेडची व्यवस्था करते आणि रुग्णवाहिकेद्वारे त्यांना तेथे विनामूल्य पोहोचवते.

जर एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर असेल तर एनजीओचे सदस्य त्याच्यासाठी मोठ्या रूग्णालयात बेडची व्यवस्था करतात आणि त्याला तेथे शिफ्ट करतात.
जर एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर असेल तर एनजीओचे सदस्य त्याच्यासाठी मोठ्या रूग्णालयात बेडची व्यवस्था करतात आणि त्याला तेथे शिफ्ट करतात.

मशिदीत 120 बेड्सची व्यवस्था होऊ शकते. परंतु परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, त्यामुळे बेड वाढवण्यात आले नाहीत. शाळा सुरू करण्याचे आदेश येईपर्यंत हे कोविड सेंटर सुरु राहणार आहे. मशिदीत कोविड सेंटर उभारण्यासाठी 75 लाख रुपये खर्च करण्यात आले असून त्यामध्ये सहा महिन्यांच्या ऑपरेशन कॉस्टचा समावेश आहे. हेल्पिंग हँड रोटरी ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ हैदराबाद आणि शिक्षण व आर्थिक विकास (सीईईडी) यांनी हा सर्व खर्च उचलला आहे.

बातम्या आणखी आहेत...