आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • There Is No Poverty richness In Sports, But Poverty Always Brings Difficulties; Interview With Arjuna Award Winning Player Sarika Kale By Her Coach

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:खेळात गरिबी-श्रीमंती नसते, पण गरिबीमुळे अडचणी येतातच; अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू सारिका काळेची तिच्या गुरूंनी घेतलेली मुलाखत

डॉ. चंद्रजित जाधव | उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे काजू, बदाम खाऊन डाएट फॉलो करणारे क्रीडापटू आणि दुसरीकडे बेताच्या परिस्थितीतून खो-खो खेळणारी मी. खरंतर खेळामध्ये गरीब-श्रीमंतीचा काहीच संबंध नाही, पण परिस्थिती नसेल तर अडचणी नक्कीच येतात. हे मत आहे खो-खोतील सुवर्णकन्या सारिका काळे हिचे. तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला असून यानिमित्त तिचे क्रीडा मार्गदर्शक प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी तिची घेतलेली मुलाखत.

तू सामान्य कुटुंबातली, तरी हे यश कसं मिळवलंस ?

काजू, बदाम, पिस्ता हे सारं क्रीडापटूंना मिळतं, पण मला मिळत नव्हतं. मात्र, हा विचार बाजूला ठेवून मला जो आहार मिळेल तो घेत उद्देश साध्य करत राहिले. टोमॅटोची भाजी, मॅगी खूप आवडत होती. मात्र, समतोल आहार घेण्यासाठी मी या दोन्ही गोष्टी कमी केल्या.

खो-खो खेळावं असं का वाटलं?

शाळा सुटल्यानंतर बाहेर मैदानावर मुलींना खो-खो खेळताना पाहायचे. एक-दोन वेळा मुली कसं खेळतात हे पाहून त्यानंतर मलाही खो-खो खेळावासा वाटला.

कर्णधारपद सांभाळताना नेमक्या कोणत्या अडचणी आल्या?

गुवाहाटी येथे दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यावर खूप दडपण आले होते. ४५ दिवसांची प्रॅक्टिस सुरू होती. वेगवेगळ्या राज्यांतील मुलींना एकत्र आणून संघाची तयारी करायची होती. भारतीय संघाची कर्णधार होईल अशी मी कल्पनाच केली नव्हती. पण देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण केले.

पुरस्काराची संधी गेल्याची खंत तुला कधी वाटली होती का?

खरंतर बारामतीच्या स्पर्धेतच मला राणी लक्ष्मीबाई क्रीडा पुरस्कार मिळायला हवा होता. मी त्या पुरस्काराची प्रमुख दावेदार होते. खंत वाटत होती. मात्र, पुरस्कार मिळण्यापेक्षा जिंकत राहणं महत्त्वाचं होतं. पुढे बंगळुरूच्या राष्ट्रीय स्पर्धेत हा पुरस्कार मिळाला.

ग्रामीण भागातील असल्याचा न्यूनगंड वाटला का?

नाही. पण प्रथमच मुंबईला गेल्यानंतर विमान पाहिलं आणि मोठ्यानं विमान... विमान... म्हणून ओरडले. पुढे खो-खोने मला सारं काही दिलं.

पुढे काय विचार?

खो-खोमध्ये मला इतर मुलींना मार्गदर्शन करायचे आहे. त्यामुळे मला प्रशिक्षक म्हणूनच काम करायला आवडेल. खो-खो हीच माझी ओळख आहे. ती कायम ठेवायची आहे.

संकलन : चंद्रसेन देशमुख, उस्मानाबाद