आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • There Was A Hidden Camera In The Bathroom Of The Girls Hostel, Find Out How To Find The SPY Camera, Latest News And Update

कामाची बातमी:गर्ल्स हॉस्टेलच्या बाथरूमध्ये होता हिडन कॅमेरा, जाणून घ्या हॉटेलच्या खोलीपासून चेंजिंग रूमपर्यंत कॅमेरा कसा शोधायचा

अलिशा सिन्हा25 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील एका गर्ल्स हॉस्टेलच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा आढळला. पोलिसांनी हॉस्टेल मालकाच्या मुसक्या आवळून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

संपूर्ण प्रकरण समजून घ्या

 • प्रयागराजमधील डॉक्टराचा मुलगा आशिष खरेने आपल्या घरात गर्ल्स हॉस्टेल सुरू केले होते.
 • एक विद्यार्थिनी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली असता शॉवरमधून पाणी कमी येत होते.
 • विद्यार्थीनीला शॉवरमध्ये काहीतरी अडकल्याचे वाटले. तिने ते 2-3 वेळा हलवले, तर कॅमेरा खाली पडला.
 • पोलिसांनी घरमालकाकडून संगणक, 9 हार्ड डिस्क, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डरसह अनेक गोष्टी जप्त केल्या.

अशी प्रकरणे केवळ गर्ल्स हॉस्टेलच नव्हे तर हॉटेलच्या खोलीपासून दुकानाच्या चेंजिंग रूमपर्यंत नेहमीच उघडकीस येतात. त्यामुळे आजच्या कामाच्या बातमीत आम्ही तुम्हाला अनोळख्या ठिकाणावरील हिडन कॅमेरे कसे शोधावेत? हे सांगणार आहोत.

प्रश्न -हिडन कॅमेरा म्हणजे काय?

उत्तर -हॉस्टेल, हॉटेल, बाथरूम किंवा चेंजिंग रूमसारख्या कोणत्याही ठिकाणी लपवण्यात येणाऱ्या कॅमेऱ्याला हिडन कॅमेरा असे म्हटले जाते. या कॅमेऱ्याच्या मदतीने अनेकदा दुसऱ्यांना ब्लॅकमेलही केले जाते.

प्रश्न - बहुतांशवेळा कोणत्या ठिकाणी लपवला जातो हिडन कॅमेरा?

उत्तर -अशा ठिकाणी, जिथे लोकांची नजर जात नाही. उदाहरणार्थ -

 • एअर फिल्टर इक्विपमेंट
 • पुस्तकांचे कोपरे
 • भींतीवरील एखाद्या सजावटीच्या वस्तूच्या आत किंवा बाहेर
 • घराच्या आत लावलेले प्लान्ट्स
 • स्मोक डिटेक्टर
 • टिश्यू बॉक्स
 • एखादी खेळणी
 • डिजिटल टीव्ही बॉक्स
 • हेअर ड्रायर
 • भींतीवरील घड्याळ
 • पेन
 • एखाद्या कपड्यात

प्रश्न -एखाद्या हॉटेल किंवा वसतीगृहात थांबण्यापूर्वी काय खबरदारी घ्यावी?

उत्तर -

 • हॉटेल किंवा हॉस्टेलची माहिती आसपासच्या लोकांकडून घ्यावी.
 • एखाद्या चांगल्या ठिकाणीच खोली घ्यावी. जागा चांगली नसेल तर दुसर्या पर्याय शोधावा.
 • बोगस संकेतस्थळावरुन खोली बूक करू नका. हॉस्टेलची माहिती तेथील मुलींकडून घेता येईल.
 • हॉटेल किंवा वसतिगृहाचे पैसे भरल्याची पावती अवश्य घ्या. काही अडचण आल्यास पैसे परत घेता येतील.

प्रश्न -हॉटेल, हॉस्टेल किंवा चेंजिंग रूमसारख्या ठिकाणी हिडन कॅमेरा आढळला तर सर्वसामान्य व्यक्तीने काय करावे?

उत्तर -वकील अविनाश गोयल यांच्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीला हिडन किंवा स्पाय कॅमेरा आढळला तर त्याने त्याची तत्काळ तक्रार पोलिसांत करावी. भादंवि कलम 354 अंतर्गत आरोपीवर कारवाई केली जाईल.

जाता जाता जाणून घेऊ...

हिडन कॅमेऱ्यात इन्फ्रारेड (आयआर) ब्लास्टर्सचा वापर झाला असतो. त्याच्या मदतीने ते अंधारातही रेकॉर्ड करतात. कोणताही व्यक्ती आपल्या डोळ्याने आयआर लाईट्सचा शोध घेऊ शकत नाही. यामुळेच या कॅमेऱ्यांना अंधारात उघड्या डोळ्याने पाहणे अशक्य असते. पण, मोबाईल कॅमेऱ्याच्या इन्फ्रारेड स्पेक्ट्रमने या लाईट्सचा शोध घेता येतो.

बातम्या आणखी आहेत...