आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज लष्कर दिन:तेव्हा पाकिस्तानी सैनिकांची संख्या प्रचंड होती; आमच्या सडेतोड प्रत्युत्तरानंतर पाकने सफेद निशाण फडकावून शस्त्रे टाकली

बिकानेर / नवीन शर्मा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशी केली होती घेराबंदी. छाया: मनीष पारीक - Divya Marathi
अशी केली होती घेराबंदी. छाया: मनीष पारीक
  • आज लष्कर दिन, वाचा भारताच्या विजयाची कथा

भारतीय लष्कर म्हणजे शौर्य, दुदर्म्य धाडस अन् बलिदानाचे दुसरे नाव! १९७१ चे युद्ध भारत-पाकच्या सांचू बॉर्डरवर लढले गेले. या युद्धात भारताने पाकला कशी धूळ चारली, हे जाणून घेण्यासाठी आम्ही बिकानेरहून २५० किमीवरील सांचू बॉर्डरवर गेलो. पाकला हरवून भारताने तीन चौक्या कशा जिंकल्या, याचे प्रात्यक्षिक दैनिक भास्करसाठी बीएसएफने करून दाखवले.

३ डिसेंबर १९७१चा दिवस : दोन रात्रींचा प्रवास, एका रात्रीत विजयाची आंखों देखी सांगताहेत ब्रिगेडियर जगमालसिंह राठोड
आम्ही बिकमपूरमध्ये कबड्डी खेळत होतो. अचानक कर्नल विजयसिंह बंकरमधून बाहेर पडत जाेरात ओरडले, मूव्ह... सर्व जवान सतर्क झाले. संध्याकाळी उशिरा ए स्क्वाॅड्रन १३ ग्रेनेडियरची (गंगा रिसाला) हालचाल सुरू झाली. रात्रभर उंटांवरून प्रवास केला. पहाटे रणजीपुरात पोहोचलो. दिवसभर तेथे तळ ठोकला. रात्री पुन्हा कूच केले. सकाळी सांचूला पोहोचलो. तेथून ५ किमीवर पाकिस्तानची रनिहाल चौकी ताब्यात घ्यायची होती. रेकीसाठी पाठवलेले अधिकारी खेतपालसिंह राठोड यांनी बातमी आणली की, शत्रूचा सर्वत्र वेढा आहे, तो अपेक्षेपेक्षा जास्त संख्येने आहे. स्थानिक लोकही त्यांच्यासोबत आहेत. आम्ही हल्ल्याची योजना आखली. सूर्य मावळताच मेजर अजित सिंह यांच्या कंपनीने पहिल्या हल्ल्यातच गोरा-धोरावर फत्ते केले. शत्रूला पळता भुई थोडी झाली. पुढील हल्ल्यासाठी आम्ही हवाई मदत मागितली, मात्र त्या वेळी लोंगेवालात मोठी लढाई सुरू असल्याने मदत मिळू शकली नाही. आमच्याकडे वेळ नव्हता. कमांडरचे आदेश घेऊन पुढे निघालो. मात्र शत्रूला त्याची खबर लागली. त्याने एलएमजी गन व मोर्टारचा मारा केला. ताे चुकवत आम्ही मुसंडी मारली. रनिहालला वेढा घालून हल्ला केला. शत्रूची घाबरगुंडी उडाली. त्याने सफेद निशाण फडकावले. कमांडरला चार गोळ्या लागल्या, मात्र ते बचावले.

सांचूचे सामरिक महत्त्व आहे. ६५ व ७१ ची युद्धे येथेच लढली गेली. आता लोकांसाठी ते खुले केले आहे. - पुष्पेंद्रसिंह राठोड डीआयजी, बीएसएफ

सांचूचा इतिहास : भारताने पाकच्या रनिहाल, रुकनपूर व बिजनोठ पोस्ट फत्ते केल्या होत्या. मात्र सिमला करारांतर्गत त्या १९६५ मध्ये पाकला परत केल्या.

बातम्या आणखी आहेत...