आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिचारिका दिन:पहिल्या परिचारिका फ्लोरेन्सच्या सन्मानार्थ साजरा होतो हा दिवस, त्यांची आज 200 वी जयंती 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फ्लॉरेन्स नाइटिंगेल - नर्सिंगला दिले आधुनिक स्वरूप, संसर्गजन्य रोगांची माहिती संकलित केली

आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्स येथे झाला. त्या गणित व डाटात हुशार होत्या. या गुणांचा वापर त्यांनी रुग्णालये व लोकांची प्रकृती सुधारण्यासाठी केला. फ्लारेन्स यांनी प्रथम नर्सिंगला जाण्याची इच्छा जाहीर केली तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी त्यास विरोध केला. नंतर त्यांनी त्यांच्या जिद्दीपुढे माघार घेतली. त्यांनी तिला प्रशिक्षणासाठी जर्मनीला पाठवले. १८५३ मध्ये क्रिमियन युद्धाच्या काळात त्यांना तुर्कस्तानच्या लष्करी रुग्णालयात पाठवण्यात आले. एखाद्या महिलेस ब्रिटनकडून लष्करात संधी देण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या बराक रुग्णालयात पोहोचल्या. तेव्हा त्यांनी फरशीवर धुळीचा मोठा थर साचल्याचे अनुभवले. त्यांनी सर्वप्रथम रुग्णालय साफ केले. सैनिकांसाठी चांगला आहार व स्वच्छ कपड्यांची सोय केली. सैनिकांच्या  अवस्थेकडे लक्ष देण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांच्या चौकशीनंतर नियुक्त केलेल्या चौकशी समितीस आढळून आले की, तुर्कीमध्ये १८ हजार सैनिकांपैकी १६ हजार सैनिकांचा मृत्यू अस्वच्छता व संसर्गजन्य आजाराने झाला होता. फ्लाॅरेन्स यांच्या प्रयत्याने ब्रिटिश सैन्यास वैद्यकीय, सॅनिटरी सायन्स व सांख्यिकी विभाग तयार केले. रुग्णालयात साफसफाई ही त्यांचीच संकल्पना. या रुग्णालयात रात्रपाळीत त्या हातात मशाल घेऊन रुग्णांची सेवा करत असत. यामुळे त्या लेडी विथ लॅम्प म्हणून प्रसिद्ध झाल्या. आजही त्यांच्या सन्मानार्थ नर्सिंगची शपथ हातात लॅम्प घेऊन केली जाते. 

अंजली कुलथे : कसाबचा सामना करणाऱ्या आता कोरोना वॉरियर

मनीषा भल्ला | मुंबई 

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात कुख्यात अतिरेकी कसाबशी दोन हात करणाऱ्या अंजली कुलथे कामा रुग्णालयात क्वॉरंटाइन कर्मचाऱ्यांची देखभाल करत आहेत. आता १२ परिचारिका क्वॉरंटाइन असल्याचे त्या सांगतात. या परिचारिकांना आहार देणे, त्यांची देखभाल करणे, स्वॅबची चाचणी घेणे आदी कामे त्यांना करावी लागत आहेत. त्यांच्यात सकारात्मक भूमिका जागवण्यासाठी त्यांना स्फूर्तिदायक कथा ऐकवतात. मुुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अंजली यांनी २० गर्भवती महिलांचा जीव वाचवला होता. त्या दिवसाची आठवण सांगताना त्या सांगतात, अचानक गोळीबार सुरू झाला. मी बाहेर डोकावून पाहिले तेव्हा जे. जे. स्कूलच्या रोडवर दोन दहशतवादी गोळीबार करत धावत जाताना दिसले. मी वॉर्डातील सर्व रुग्णांना एकत्र आणले. एक महिला बाथरूममध्ये होती. तिला घेण्यासाठी धावले. दरम्यान, अतिरेकी रुग्णालयात घुसले. दोन गोळ्या माझ्या जवळून गेल्या. त्यापैकी एक सर्व्हंटला लागली. मी त्या महिलेस घेऊन वॉर्डाकडे धावले. त्या सर्वांना एका पँट्रीमध्ये लपवले. नंतर पोलिसांनी अनेकदा कसाबची ओळख पटवण्यासाठी मला बोलावले होते. आधी तर तो जोरात हसत असे. नंतर म्हणायचा, ‘होय मॅडम, मीच तो अजमल कसाब.’ अंजलीचे पती भारतीय नौदलात अधिकारी आहेत.

मार्गेट थेपली : वयाच्या ८४ व्या वर्षीही कोरोना रुग्णांची देखभाल

दिव्य मराठी नेटवर्क | लंडन

ही गोष्ट आहे, ८४ वर्षे वयाच्या परिचारिका मार्गेट थेपली यांची. कोरोनामुळे प्राणाचे बलिदान करणाऱ्या जगातील त्या ज्येष्ठ परिचारिका आहेत. ब्रिटनमधील विटनी कम्युनिटी रुग्णालयात त्या रात्रपाळीत सतत काम करतात. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना संक्रमण झाले. साेशल मीडियावर त्यांना सर्वाधिक मेहनती, काळजी घेणाऱ्या व परिपूर्ण महिला म्हणून स्मरण केले जाते. कोराेना ज्येष्ठ व्यक्तींना सर्वाधिक घातक ठरत आहे. मार्गेट यांच्याकडे काम सोडून देण्याचा पर्याय होता. परंतु त्यांनी नकार दिला. डॉक्टर व त्यांचे सहकारी सांगतात, त्या वॉर्डात सर्वाधिक लोकप्रिय होत्या. रुग्णालयाचे सीईओ स्टुअर्ट वेल सांगतात, माझ्या करिअरमध्ये मी जितक्या महिलांना पाहिले, भेटलो. मार्गेट त्यांच्यात सर्वाधिक प्रभावशाली होत्या. इतकी धैर्यवान महिला मी याआधी कधी पाहिली नव्हती. या वयातही त्या रात्रपाळीत काम करत असत. त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. रुग्णालयातील लाेकांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानत असत. मार्गेट यांचा नातू टॉम वूड यांनी सांगितले, मला आजीचा अभिमान वाटतो. मी त्यांना पाहूनच परिचर झालो. त्यांना खूप आधीच निवृत्त व्हायला हवे होते. परंतु त्यांनी आपलेे आयुष्य रुग्णसेवेकरिता वाहिले होते. स्वत:ला रुग्णालयापासून दूर ठेवणे त्यांना शक्य नव्हते.

बातम्या आणखी आहेत...