आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टमुलांनी अचानक डोके आदळायला केली सुरूवात, शाळा प्रशासन घाबरले:भूत-प्रेत नव्हे, हा ‘मास हिस्टिरिया’चा प्रकार

अलिशा सिन्हा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील बागेश्वर येथील एका शाळेत 8 विद्यार्थी विनाकारण रडतात, किंचाळतात, जमिनीवर लोळतात आणि डोक्यावर हात मारतात. त्याातील 6 मुली आणि 2 मुले आहेत. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. सोशल मीडियावर याचे वर्णन मास हिस्टिरिया म्हणून केले जातय.

बागेश्वरच्या डेप्युटी सीएमओच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या टीमने मुलांचे समुपदेशन केले, त्यानंतर त्यांना समजले की, ते आधीच घाबरलेले होते आणि रिकाम्या पोटी शाळेत आले होते.

बातमीत आणखी काही वाचण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा...

जी परिस्थिती शाळेतील मुलांची होती, ती परिस्थिती कोणाची झाली तर लोक त्याला भूत-प्रेत असे नाव देतात किंवा त्यांच्या अंगात देवी आली असेही म्हणतात.

प्रश्न पडतो की, यामागे मास हिस्टिरिया आहे का? कामाची गोष्ट मध्ये आज आपण, मेरठ येथील मानसशास्त्रज्ञ आणि संमोहन चिकित्सक डॉ. काशिका जैन आणि बीएलके हॉस्पिटल, नवी दिल्लीचे डॉ. मनीष जैन यांच्याकडून हे समजून घेणार आहे.

प्रश्न- सर्वप्रथम हिस्टीरिया म्हणजे काय हे जाणून घ्या?

उत्तर- हा एक प्रकारचा मानसिक विकार किंवा मानसिक समस्या आहे. मनोचिकित्सकांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक किंवा भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असते तेव्हा तो लक्ष वेधतो आणि असामान्य वागतो. यामध्ये एका व्यक्तीला हे करताना पाहून दुसरी, तिसरी आणि अनेक लोक असामान्य गोष्टी करू शकतात. यामध्ये ती व्यक्ती आतून गुदमरत असते आणि आपली वेदना कोणाला सांगू शकत नाही. लोकांनी त्याच्याशी बोलावं, त्याच्या समस्यांबद्दल विचारावं असं त्याला वाटतं.

प्रश्नः हिस्टिरिया हा मास हिस्टिरिया कधी होतो?

उत्तर- बहुतेक लोक अशा रुग्णाला मंदिरात किंवा तांत्रिकाकडे घेऊन जातात, तिथे हिस्टिरियाचे रुग्ण डोलत असतात. दुसरा पेशंट त्यांच्यासारखाच कोणीतरी पाहतो तेव्हा तोही हसायला लागतो. कारण असे रुग्ण एकमेकांची कॉपी करतात. मग हिस्टिरिया मास हिस्टिरिया बनतो.

प्रश्न- मास हिस्टेरियाची समस्या कोणत्या ठिकाणी जास्त आहे?

उत्तर- बीएलके हॉस्पिटल, नवी दिल्लीचे डॉ. मनीष जैन यांच्यावर विश्वास ठेवला तर, मास हिस्टिरिया हा बहुधा संस्कृती असलेल्या ठिकाणी आढळणारा आजार आहे. ही समस्या खेड्यांमध्ये आणि कमी शिकलेल्या लोकांमध्ये जास्त आढळते.

याचा अर्थ असा नाही की हा रोग संस्कृतीच्या विश्वासामुळे होतो. मास हिस्टिरिया उद्भवू शकतो जेव्हा संस्कृतीचा विश्वास अनियंत्रित किंवा जास्त मोठा होतो. म्हणूनच अनेक लोक म्हणतात की, अशा व्यक्तीच्या अंगात देवी आली आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला भूतबाधा झाली आहे.

प्रश्न- मास हिस्टिरियाची समस्या कोणत्या लोकांमध्ये जास्त असते?

उत्तर- ही समस्या बहुतेक स्त्रियांमध्ये दिसून येते, ज्या कमी शिकलेल्या आहेत किंवा ज्या आपल्या इच्छा आणि मन मारुन राहतात. कोणाला काही सांगता येत नाही, पण ते फक्त महिलांसाठीच असावे असे नाही. हिस्टीरियाची समस्या अनेक पुरुषांमध्ये दिसून आली आहे.

लोक बर्‍याचदा हिस्टिरियाच्या झटक्याची अपस्माराच्या किंवा मिरगीच्या झटक्यांबरोबर तुलना करतात. परंतु हे दोन्ही भिन्न आहेत. कसे हे जाणून घेण्यासाठी खालील ग्राफिक्स वाचा-

प्रश्न- मास हिस्टिरियाला कन्व्हर्जन डिसऑर्डर असेही म्हणतात, का?

उत्तर- त्यातील मानसिक लक्षणे शारीरिक लक्षणांमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे कुटुंबीयांना हा शारीरिक आजार आहे असे वाटते, पण तसे नाही. म्हणूनच त्याला कन्व्हर्जन डिसऑर्डर म्हणतात.

प्रश्न- बरेच लोक मास हिस्टिरियाला भूत, आत्मा किंवा डायन असे नाव देतात, का?

उत्तर- हिस्टिरियाचे रुग्ण अनेकदा तक्रार करतो की त्याला काहीच आठवत नाही. असे दिसते की कोणीतरी त्याचा गळा दाबत आहे, त्याला श्वास घेता येत नाही किंवा कोणीतरी दिसत आहे. हा सर्व त्रास रुग्णाच्या मानसिक स्थितीमुळे होतो. असं खरंच होत नाही. लोक या मानसिक स्थितीला अंधश्रद्धेशी जोडतात आणि भूत, आत्मा, डायन किंवा देवी आईचे नाव देतात.

प्रश्न- मास हिस्टिरियावर उपचार काय?

उत्तर- हिस्टिरियाचा झटका काही रुग्णांमध्ये इतक्या वेळा पुनरावृत्त्त होतो की लोक देवी आली किंवा डायन किंवा भूत समजतात. हा आजार नैराश्याचा आहे आणि त्यावर उपाय हा व्यक्त होणे आहे. या लोकांनी वेळ न घालवता त्यांना समजून घेतले पाहिजे.

प्रश्न- हिस्टिरियाच्या रुग्णाला बरे करण्यासाठी काय करावे?

उत्तर- रुग्णावर उपचार करणे आवश्यक आहे-

सर्व प्रथम त्याला मानसशास्त्रज्ञाकडे घेऊन जा.

  • मानसशास्त्रज्ञ त्या व्यक्तीच्या दडपलेल्या इच्छा विचारून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.
  • कुटुंबाला जागृत आणि शिक्षित करा.
  • रुग्णाचे समुपदेशन केले जाते आणि त्याला ध्यान-धारणा करायला लावली जाते.
  • हिप्नोथेरपीचा रुग्णाला खूप फायदा होतो.
  • संमोहन थेरपीमध्ये, रुग्णाच्या दडपलेल्या इच्छा बाहेर काढल्या जातात आणि त्याची मानसिक स्थिती बनविली जाते.
  • या सर्वांच्या मदतीने रुग्ण हळूहळू बरा होतो.

अखेरीस पण महत्त्वाचे जाणून घ्या...

जेव्हा हिस्टिरियाच्या रुग्णांना वाईट वाटू लागते, तेव्हा त्यांना जाणीव होते की आता पाणी त्यांच्या डोक्यावरून गेले आहे आणि त्यांना झटका येणार आहे. त्यामुळे हे लोक स्वत:ला सुरक्षित ठेवण्यास सक्षम असतात. त्यांना दुखापत होत नाही. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही म्हणजेच कुटुंबीय किंवा जवळचे लोक रुग्णाकडे लक्ष देतात, तेव्हा ती व्यक्ती हळूहळू सामान्य होऊ लागते, परंतु त्याला समजते की लक्ष वेधण्याचा हा मार्ग आहे. तो पुन्हा पुन्हा ही पद्धत अवलंबू लागतो. त्यामुळे वेळ न घालवता मानसशास्त्रज्ञाची मदत घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...