आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ओरिजिनल:120 वर्षांत यंदा 40 वे निना वर्ष; यामुळे हिवाळ्यात अधेमधे कडाक्याच्या थंडीची लाट, दाट धुकेही दाटणार

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 डिसेंबर ते 20 जानेवारी 2021 पर्यंत हवामानावर ‘ला निना’चा प्रभाव राहणार

यंदा कडाक्याच्या हिवाळ्यासाठी सज्ज राहा. २० डिसेंबर ते २० जानेवारी २०२१ पर्यंत हवामानावर ‘ला निना’चा प्रभाव राहणार आहे. ‘ला निना’त हिवाळ्याचे तापमान सरासरीपेक्षा कमी राहते. यामुळे यंदा ऑक्टोबरपासूनच पारा घसरत आहे. यंदाचा हिवाळा गेल्या शतकातील १० सर्वात गार वर्षांत नाेंदवला जाण्याची शक्यता आहे. शनिवारी पाकिस्तानी भागाकडून यंदाचा पहिला मजबूत पश्चिम विक्षोभ येईल. परिणामी डोंगराळ राज्यांत बर्फवृष्टी होऊ शकते. दिवाळीनंतर मैदानी राज्यांत थंडी पडेल.

पुणे आयएमडीचे क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिस हेड डॉ. डी. एस. पै यांच्यानुसार आयएमडीत १९०१ पासून नोंदी होताहेत. त्यानुसार यापूर्वीच्या १२० वर्षांत ३९ वेळा ‘ला निना’ राहिला. यादरम्यान हिवाळा कडक होता. ‘ला-निना’चा ट्रेंड पाहता यंदा फेब्रुवारीपर्यंत तापमान सरासरीपेक्षा कमीच राहू शकते.

14 नोव्हेंबरला प. विक्षोभाचा परिणाम

स्कायमेटचे शास्त्रज्ञ महेश पालावत यांच्यानुसार, या हंगामापूर्वीच्या पश्चिमी विक्षोभामुळे १४ नोव्हेंबरला पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टी होऊ शकते. दुसरीकडे, मैदानी भागांतही हलका पाऊस होईल. १७-१८ नोव्हेंबरनंतर सर्व क्षेत्रांत तापमान १० अंशांहून कमी राहू शकते.

बातम्या आणखी आहेत...