आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टघरीच करा बाप्पाचे विसर्जन:माती, POP, फिटकरीच्या मूर्ती विसर्जनासाठी फॉलो करा या टिप्स

लेखक: अलिशा सिन्हाएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

लाडक्या गणरायाच्या आगमनाची लगबग सुरूच असताना बाप्पाला निरोप द्यायचीही वेळ आली आहे. जे लोक जास्त व्यस्त असतात, ते तिसऱ्या दिवशीच बाप्पाला निरोप देतात.
जर तुम्हीही आजच बाप्पाला निरोप देत असाल तर मूर्ती नदी, तलाव, विहिरीत विसर्जित करण्याऐवजी घरातच विसर्जन करा आणि पर्यावरण संवर्धनात आपले योगदान द्या.
घरातच गणपतीचे विसर्जन कसे आणि केव्हा करायचे आहे ते जाणून घेऊया. सोबतच पाहूया हे करताना तुम्ही कोणत्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे...
प्रश्न - कोणत्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाऊ शकते?
उत्तर -
तिसऱ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी घरीच गणपतीचे विसर्जन केले जाऊ शकते.

POP ऐवजी नेहमी मातीच्या गणपतीची स्थापना करणे चांगले आहे. पण जर तुम्ही POP च्या मूर्तीची स्थापना केली असेल तर या मूर्तीचेही घरीच विसर्जन करून पर्यावरणाचे नुकसान तुम्ही टाळू शकता. POP मूर्तीच्या विसर्जनासाठी तुम्ही पुढील बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे.
ही आहे पद्धत

 • मूर्तीच्या आकारानुसार बादली किंवा भांडे घ्यावे
 • मूर्ती विसर्जित होईल इतके पाणी त्यात घ्यावे
 • या पाण्यात अमोनियम बायकार्बोनेट टाकून ते पाण्यात मिसळू द्यावे
 • यानंतर या पाण्यात मूर्तीचे विसर्जन करून दर दोन तासांनी पाणी ढवळावे
 • ४८ तासांनंतर हे पाणी दूधासारखे पांढऱ्या रंगाचे होईल
 • यानंतर हे पाणी मोकळ्या मैदानात सांडून द्यावे

मातीचा गणपती बनवताना त्यात बी टाकले असेल तर असे करा विसर्जन

 • मूर्तीच्या आकारानुसार एक कुंडी घ्या
 • यात स्वच्छ पाणी घेऊन मूर्तीचे विसर्जन करा
 • मूर्ती विरघळल्यानंतर पाण्यात बी दिसून येईल
 • हे बी कुंडीत तसेच राहू द्या आणि त्यात आणखी माती टाका व वेळोवेळी पाणी द्या
 • काही दिवसांनंतर त्यात रोपटे उगल्याचे दिसून येईल

हल्ली काही ठिकाणी फिटकरीच्या मूर्ती तयार केल्या जातात. हे पर्यावरणासाठी चांगले आहे. ही नवी पद्धत आहे. फिटकरी सल्फेट पाण्यात सहजतेने मिसळते आणि वॉटर प्युरिफायरचेही काम करते.
असे करा फिटकरीच्या गणपतीचे विसर्जन

 • गणपतीच्या पूजेनंतर टब, कुंडी किंवा बादलीत स्वच्छ पाणी घ्या
 • यात मूर्तीचे विसर्जन करा आणि पाण्यात विरघळू द्या
 • विरघळ्यानंतर या पाण्याचा आपल्या गरजेनुसार वापर करा

जाता-जाता
गणपती विसर्जनापूर्वी आणि विसर्जनानंतर या बाबी लक्षात ठेवा

 • विसर्जनापूर्वी गणपतीची पूजा करताना, त्यांची आवडीचे पदार्थ, वस्तू अर्पण करा
 • गणपतीचे विसर्जन शुभ मूहूर्तावर करा
 • गणपती विसर्जनासाठी गेल्यावर या सर्व वस्तू गणपतीसोबतच विसर्जित करा
 • गणपतीच्या पूजेदरम्यान झालेल्या चूक-भुलीविषयी बाप्पाकडे क्षमायाचना करा
 • गणपतीची मूर्ती पाण्यात हळूहळू विसर्जित करा, एकदम सोडू नका किंवा आदळू नका
 • विसर्जनाच्या वेळी श्री गणेश मंत्रांचा जप करा
 • घरीच विसर्जनानंतर पाणी कुठेही फेकू नका, किंवा ते कुणाच्या पायाखाली येऊ देऊ नका. याकडे लक्ष द्या
 • गणपतीचे विसर्जन नदी किंवा तलावात करत असाल तर ते पाणी एखाद्या नाल्यात तर जात नाही ना हे आधी तपासून घ्या
बातम्या आणखी आहेत...