आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Today History (Aaj Cha Itihas) 14 May Israel Became The Only Jewish Country In The World 73 Years Ago | Marathi News

आजचा इतिहास:73 वर्षांपूर्वी इस्रायल हा जगातील एकमेव ज्यू देश बनला, निर्मितीनंतर पहिले युद्ध 24 तासांच्या आत लढावे लागले

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायल हा असा देश आहे की, शत्रूंनी घेरल्यानंतरही हे शत्रूला सळो की पळो करून सोडतात. क्षेत्रफळात हा देश भारताच्या केरळपेक्षा लहान असून आज प्रत्येक बाबतीत जगातील मोठ्या देशांच्या पुढे आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचा उल्लेख होताच शत्रूंना घाम फुटतो. 1948 मध्ये आजच्या दिवशी इस्रायलने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.

आज जगाच्या नकाशावर इस्रायल ज्या आकारात आहे यामागे मोठा इतिहास आहे. कधीकाळी इस्रायलच्या जागी तुर्की हे ओटोमान साम्राज्य असायचे, पण पहिल्या महायुद्धात तुर्कस्तानचा पराभव झाल्यानंतर हा भाग ब्रिटनच्या ताब्यात गेला. त्यावेळी ब्रिटन ही मोठी शक्ती होती आणि दुसऱ्या महायुद्धापर्यंत हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन दोन नवीन शक्ती म्हणून उदयास आले. या युद्धात ब्रिटनचे खूप नुकसान झाले. 1945 मध्ये ब्रिटनने हा परिसर संयुक्त राष्ट्रांकडे सुपूर्द केला.

1947 मध्ये संयुक्त राष्ट्राने या क्षेत्राचे दोन भाग केले. एक अरब राष्ट्र आणि एक इस्रायल. जेरुसलेम शहर आंतरराष्ट्रीय सरकारच्या व्यवस्थापनाखाली ठेवण्यात आले. पुढच्याच वर्षी इस्रायलने आपले स्वातंत्र्य घोषित केले. याच्या मदतीने 1948 मध्ये या दिवशी जगातील एका शक्तिशाली देशाची निर्मिती झाली.

इस्रायलने आपले स्वातंत्र्य घोषित करताच 24 तासांतच अरब देशांच्या संयुक्त सैन्याने त्यावर हल्ला केला. ही लढाई इस्रायलसाठी निश्चितच अवघड होती, पण त्याने हिंमत गमावली नाही. पुढील एक वर्ष हा लढा सुरू राहिला. परिणामी अरब देशांच्या सैन्याचा पराभव झाला.

युद्ध समाप्त होताच, 25 जानेवारी 1949 रोजी इस्रायलच्या 120 सदस्यांच्या संसदेसाठी पहिली निवडणूक झाली, ज्यामध्ये नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला आणि डेव्हिड बेन गुरियन देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडले गेले. सध्या, जगातील एकूण ज्यू लोकसंख्येपैकी 40% पेक्षा जास्त इस्रायलमध्ये राहतात. इस्रायल हा जगातील एकमेव ज्यू देश आहे.

1955: वॉर्सा करार

1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या दोन नवीन शक्ती जगासमोर होत्या. या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले होते. दोन्ही देशांना स्वत:ला शक्तिशाली सिद्ध करायचे होते. त्यासाठी दोघांनी लॉबी तयार करण्यास सुरुवात केली. 1948 मध्ये, सोव्हिएत युनियनने पूर्व युरोपमधून आपले सैन्य मागे घेण्यास नकार दिला आणि बर्लिनची नाकेबंदी लागू केली.

सोव्हिएत युनियनच्या या हालचालीने अमेरिकेसह युरोपातील देशांना धक्का बसला आणि त्यांनी सोव्हिएत युनियनला रोखण्यासाठी एक संघटना स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनसह अनेक देशांचा समावेश होता. आज ही संघटना नाटो म्हणून ओळखली जाते.

जेव्हा सोव्हिएत युनियनने पाहिले की देश आपल्या विरोधात संघटित होत आहेत, तेव्हा त्यांनीही अशीच संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सोव्हिएत युनियनने 1955 मध्ये पूर्व युरोपातील काही देशांना सोबत घेऊन वॉर्सा करारावर स्वाक्षरी केली. अमेरिकेच्या नाटोला प्रत्युत्तर म्हणून ही सोव्हिएत युनियनची स्वतःची संघटना होती. त्यात सोव्हिएत संघाशिवाय इतर ७ देशांचा समावेश होता. संघटनेच्या कोणत्याही देशावर हल्ला झाल्यास उर्वरित देश मदत करतील, असे या करारात म्हटले होते. यादरम्यान, नाटो आणि सोव्हिएत युनियन यांच्यात शीतयुद्ध सुरूच होते. 25 फेब्रुवारी 1991 रोजी हंगेरी येथे झालेल्या बैठकीत हा करार संपुष्टात आला.

1984: फेसबुकच्या जनकाचा जन्म

हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने 4 फेब्रुवारी 2004 रोजी वेबसाइट सुरू केली. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी जोडले पाहिजे, हा त्यामागचा हेतू होता. ही कल्पना कामी आली. दुसऱ्याच दिवशी हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी त्या साइटवर नोंदणी केली. ही तर सुरुवात होती. आज त्या वेबसाइटवर 2 अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत. त्या विद्यार्थ्याचे नाव होते - मार्क झुकेरबर्ग, ज्याचा आज वाढदिवस आहे.

पुढील 4 महिन्यांत 2.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी फेसबुकवर नोंदणी केली. परिणामी, फेसबुक ताब्यात घेण्यासाठी झुकेरबर्गला विद्यापीठाचा अभ्यास अर्धवट सोडावा लागला. त्याच वर्षाच्या अखेरीस फेसबुकवरील सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 1 दशलक्ष ओलांडली होती.

2006 मध्ये, फेसबुक 13 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकासाठी खुले करण्यात आले. यानंतर फेसबुकने रॉकेट वेगाने प्रगती केली. 2012 मध्ये, फेसबुक ही जगातील पहिली सोशल मीडिया साइट बनली ज्यावर सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 10 दशलक्षच्या पुढे होती. आज फेसबुक ही जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया साइट असून आणि झुकरबर्ग जगातील 5 व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे.

इतिहासात, 14 मे इतर कारणांसाठी लक्षात ठेवला जातो-
2013
: ब्राझीलने समलिंगी विवाहाला मान्यता दिली.
2010: भारत आणि रशिया यांच्यात संरक्षण, अणुऊर्जा, अंतराळ यासह अनेक क्षेत्रात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी 22 करार झाले.
1991: दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांच्या पत्नी विनी मंडेला यांना चार तरुणांचे अपहरण केल्याप्रकरणी सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
1981: भारतीय संशोधक आणि संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म झाला.
1981: नासाने स्पेस व्हेईकल S-192 लाँच केले.
1973: यूएस सर्वोच्च न्यायालयाने सैन्यात महिलांना समान अधिकार दिले.
1973: स्कायलॅब, अमेरिकेचे पहिले अंतराळ स्थानक प्रक्षेपित करण्यात आले.
1923: भारतीय चित्रपटांच्या प्रसिद्ध निर्मात्या आणि दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म.
1796: एडवर्ड जेनरने स्मॉल पॉक्स लसीचा पहिला डोस दिला.

बातम्या आणखी आहेत...