आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Today History (Aaj Cha Itihas) 14 May Jaipur: Terrorists Killed 71 People In 15 Minutes After 8 Blasts 14 Years Ago | Marathi News

आजचा इतिहास:14 वर्षांपूर्वी बॉम्बस्फोटांनी हादरले होते जयपूर, दहशतवाद्यांनी 15 मिनिटांत 8 स्फोट करत घेतला 71 जणांचा जीव

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

13 मे 2008. राजस्थानची राजधानी जयपूरसाठी तो एक सामान्य दिवस होता. रस्त्यावर नेहमीप्रमाणे गर्दी होती. संपूर्ण दिवस शांततेत गेला आणि आता संध्याकाळ होऊ लागली होती. नोकरदार लोक घरी परतायला लागले होते. मंगळवार असल्याने हनुमान मंदिरात सामान्य दिवसांपेक्षा जास्त भाविक होते. तेवढ्यात संध्याकाळी 7.05 वाजता जोहरी बाजारात स्फोट झाला. त्यानंतर शहराच्या विविध भागातून बॉम्बस्फोटाच्या बातम्या येऊ लागल्या. पुढच्या 12 ते 15 मिनिटांत आठ स्फोट झाले. गुलाबी शहर रक्ताने लाल झाले होते. सर्वत्र रक्त, आरडाओरडा आणि मृतदेह पडले होते. या दिवसाची व्यथा आजतागायत शहरवासीय विसरलेले नाहीत. या स्फोटात 71 जणांचा मृत्यू झाला तर 150 हून अधिक लोक जखमी झाले होते.

दहशतवाद्यांनी शहरातील गर्दीची ठिकाणे निवडली जेणेकरून जास्तीत जास्त नुकसान होऊ शकेल. स्फोटांमध्ये प्राणघातक स्फोटक RDXचा वापर करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी सायकल आणि टिफीनच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात बॉम्ब पेरले होते. स्फोटानंतरच वृत्तवाहिन्यांना मेल आला. या मेलमध्ये एक व्हिडिओ होता ज्यामध्ये एक सायकल दिसत होती. या सायकलचा वापर बॉम्बस्फोटात करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच, भारतातील प्रत्येक मोठ्या शहरात असे स्फोट होत राहतील, अशी धमकीही या मेलमध्ये देण्यात आली होती. इंडियन मुजाहिदीनने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती.

स्फोटांच्या तपासासाठी एटीएसची स्थापना करण्यात आली होती. याप्रकरणी एटीएसने 11 संशयितांना आरोपी केले. यापैकी मोहम्मद सैफ, सैफुर रहमान, सरवर आझमी आणि मोहम्मद सलमान यांना जयपूर येथील विशेष न्यायालयाने डिसेंबर 2019 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणातील 3 आरोपी अद्याप फरार आहेत तर 3 हैदराबाद आणि दिल्लीच्या तुरुंगात आहेत. उर्वरित दोन गुन्हेगार दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीत ठार झाले आहेत. दुसरा आरोपी शाहबाज हुसैन याची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. बॉम्बस्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी मेलद्वारे स्फोटांची जबाबदारी घेतल्याचा आरोप शाहबाजवर होता.

1880: एडिसनची इलेक्ट्रिक ट्रेन प्रथमच धावली

थॉमस अल्वा एडिसनचे नाव तुम्ही ऐकले असेलच. विजेच्या बल्बच्या शोधासाठी सारे जग त्यांना ओळखते, पण आज तुम्ही ज्या ट्रेनमधून प्रवास करत आहात त्याच्या यशामागेही एडिसन यांचा हात आहे. 1880 मध्ये या दिवशी थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रिक ट्रेनची पहिली चाचणी घेतली होती. दोन डब्यांची ही ट्रेन सुमारे अर्धा किलोमीटरच्या रुळावर धावली. ट्रेनचे इंजिन देखील एका डब्यासारखे होते, ज्याला "पुलमॅन " म्हटले गेले.

1882 मध्ये, एडिसनने ज्या ट्रॅकवर या चाचण्या केल्या होत्या त्याची लांबी सुमारे 3 मैलांपर्यंत वाढवण्यात आली आणि दोन नवीन इंजिने बांधण्यात आली. एक इंजिन प्रवाशांच्या डब्यासाठी आणि दुसरे सामान डब्यात नेण्यासाठी. ट्रॅक मजबूत करण्यासाठी तीन लहान पुलांसारखी रचना बांधण्यात आली. त्याच वर्षी या ट्रॅकवर 90 प्रवासी घेऊन इलेक्ट्रिक इंजिन असलेली एक पॅसेंजर ट्रेन धावली होती.

1940: पंतप्रधान झाल्यानंतर चर्चिल यांचे प्रसिद्ध भाषण
हा प्रसंग 1940 च्या दशकातील आहे. दुसरे महायुद्ध चालू होते. जर्मनी सर्व देशांवर हल्ले करत होता. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्यानंतर ब्रिटनमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नेव्हिल चेंबरलेन यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्या जागी विन्स्टन चर्चिल पंतप्रधान झाले. या दिवशी त्यांनी प्रथमच त्यांच्या मंत्रिमंडळाला संबोधित केले. हे भाषण चर्चिल यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचे भाषण होते, असे म्हटले जाते.

भाषणाला सुरुवात करून चर्चिल म्हणाले की, जर तुम्ही विचाराल की पुढे आमचे धोरण काय आहे? तर माझे उत्तर असे असेल की आपल्याला जमिनीवर, समुद्रावर आणि हवेत आपल्या सर्व शक्तीनिशी शत्रूशी लढायचे आहे. तुम्हांला देण्यासाठी माझ्याकडे रक्त, अश्रू, घाम आणि मेहनत याशिवाय काहीही नाही. तुम्ही विचाराल, आमचे ध्येय काय आहे? मी म्हणेन, जिंका, जिंका. 2003 मध्ये, टाईम मासिकाने हे भाषण जग बदलून टाकणाऱ्या 80 दिवसांच्या यादीत या दिवसाचा समावेश केला.

इतिहासात, 13 मे इतर कारणांसाठी लक्षात ठेवला जातो-
2004
: भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी सरकारचा पराभव झाला.
2001: मालगुडी डेजचे लेखक आर के नारायण यांचे निधन. 1964 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले. ते राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्यही होते.
2000: मिस इंडिया लारा दत्ताने सायप्रसमध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला.
1998: भारताने पोखरणमध्ये 2 अणुचाचण्या घेतल्या. याच्या दोन दिवस आधी 11 मे रोजी भारताने याच ठिकाणी 3 अणुचाचण्या केल्या होत्या. यानंतर अमेरिका आणि इतर देशांनी भारतावर अनेक निर्बंध लादले.
1967: झाकीर हुसेन यांची भारताचे तिसरे राष्ट्रपती म्हणून निवड झाली.
1956: आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनची स्थापना करणारे आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांचा जन्म झाला.
1952: स्वातंत्र्यानंतर भारताचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेची पहिली बैठक झाली.

बातम्या आणखी आहेत...