आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Tourism | Hotel taxi Will Be Booked Only With The Certificate Of Coronation Release, Transactions Will Be Cashless

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर एक्सक्लुझिव्ह:कोरोनामुक्त झाल्याच्या प्रमाणपत्रानेच हॉटेल-टॅक्सी बुक होईल, व्यवहार होतील कॅशलेस

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंत्रालयाने बनवला मसुदा, जूनपासून सुरू होऊ शकते पर्यटन

(प्रमोदकुमार)

कोरोना संकटामुळे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने २२ मार्चपासून बंद असलेला पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी मसुदा तयार केला आहे. भास्करकडे उपलब्ध असलेल्या या मसुद्यानुसार हॉटेलचे रिसेप्शन आणि टूर व ट्रॅव्हल्स ऑफिस हे अगदी हॉस्पिटलच्या काउंटरसारखेच असेल. केवळ कोरोना नसलेले पर्यटकच हॉटेल किंवा टॅक्सी बुक करू शकतील. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक केले जात आहे. मसुद्यामध्ये अधिकाधिक डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यावर आणि टच पॉइंट्स कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पर्यटन उद्योग जूनपासून सशर्तपणे सुरू केले जात आहेत. सरकार हा मसुदा किरकोळ बदल करून अमलात आणू शकेल असे सूत्रांनी सांगितले.

विशेष बाब म्हणजे आता हॉटेल्स आणि ट्रॅव्हल एजन्सींना प्रवाशाच्या संपूर्ण ट्रॅव्हल हिस्ट्रीची नोंद ठेवावी लागेल. मसुदा भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे. धोका कमी करण्यासह ट्रेसिंग सुलभ करण्यावर भर दिला आहे. काही अनिवार्य नियमांव्यतिरिक्त, सूचनादेखील दिल्या जातील, ज्या आवश्यकतेनुसार राज्य व केंद्रशासित प्रदेश राबवतील. जगातील अनेक देशांमध्ये पर्यटन व्यवसाय सुरू झाला आहे.

> का आवश्यक : १.०८ कोटी विदेशी पर्यटक २०१९ मध्ये भारतात आले, २.२ लाख कोटी मिळाले

> आणि आता : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या क्षेत्राला १० लाख कोटींचे नुकसान

पर्यटन आणि हॉटेलविषयी हे महत्त्वाचे बदल होतील

1 आता पर्यटकांचे लॉग बुक बनेल, अॅलर्जीची नोंद असेल

हॉटेल आणि पर्यटनासंबंधित बुकिंग करताना पर्यटकाला कोरोना आहे की नाही सांगावे लागेल. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मागितले जाईल. प्रवाशाची संपूर्ण नोंद, ट्रॅव्हल हिस्ट्रीची एक लॉगबुक तयार करणे अनिवार्य असेल. प्रत्येक प्रवाशाचे वय, हेल्थ हिस्ट्री, अॅलर्जीची नोंद ठेवली जाईल. प्रत्येक प्रवाशाच्या निघण्याचे ठिकाण, नाव आणि पत्ता, मुक्काम इत्यादींची नोंद ठेवणे आवश्यक असेल. हे हॉटेल आणि ट्रॅव्हल बुकिंग या दोन्ही संस्थांना लागू होईल.

2 पर्यटकांच्या निगराणीसाठी प्रत्येक दिशेला सीसीटीव्ही

पर्यटन सेवा देणारे कार्यालय व हॉटेल परिसर सतत सॅनिटाइझ केले जावेत. आठवड्यातून दोनदा व्यवस्थित सॅनिटाइझ करावे. प्रत्येक कोनात एक सीसीटीव्ही कॅमेरा असेल, म्हणजे संसर्ग झालेल्या व्यक्तीची हालचाल दिसून येईल. कार्यालयीन कर्मचारी किंवा व्हिजिटर आजारी पडल्यानंतर त्याला दाखल करण्यासाठी तेथे एक स्वतंत्र जागा असावी.

3 हॉटेलमध्ये प्रवेशापूर्वी स्क्रीनिंग-सॅनिटायझेशन

हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची व्यवस्थित स्क्रीनिंग केली जाईल व सॅनिटायझेशन झाल्यानंतरच हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाईल. हॉटेलमधील व्यवहार पूर्णपणे कॅशलेस असतील. बुकिंग केवळ ऑनलाइन करता येईल. टॅक्सी बुक करण्यासाठी, भाडे देण्यासाठी ऑनलाइन माध्यमांचाच वापर करावा लागेल.

4 लहान गटात पर्यटन, आयडीचे प्रिंट गरजेचे नाही

पर्यटकांची माहिती फक्त डिजिटल घेतली जाईल. आयडी वगैरेची फोटो कॉपी प्रिंट लागणार नाही. फिजिकल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने १० ते १५ लोकांपेक्षा लहान समूहालाच परवानगी दिली जाईल. ट्रॅव्हल एजन्सीशी संबंधित चालकाकडे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल. चालक, मदतनिसांनी नेहमी मास्क, हातमोजे घालणे आवश्यक. प्रत्येक नवीन असाइनमेंटपूर्वी थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतुकीचा किमान वापर करावा.

5 वाहनांमध्ये डिस्पोझेबल सीट कव्हर आवश्यक

डिस्पोझल सीट कव्हर व हँड रेस्ट रेस्ट कव्हर पर्यटकांच्या वाहनांमध्ये वापरणे आवश्यक असेल. चालक व प्रवासी यांच्यात फायबर ग्लासचे विभाजन करण्याचा प्रयत्न करावा. वाहनात हँड सॅनिटायझर व मास्क अनिवार्य असेल. दर आठवड्याला एसी बसची एअर डक्ट साफ करणे आवश्यक असेल. वाहनात आपत्कालीन क्रमांक असणे आवश्यक.

...आणि या तीन बाबीही गरजेच्या

> हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि आरोग्य विमा आवश्यक आहे. आरोग्य सेतू अॅप सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाइलमध्ये असावे.

> नमस्ते करून पर्यटकांचे स्वागत केले जावे. हस्तांदोलन टाळावे. वाहनात चढण्यापूर्वी मास्क आणि तपमान तपासणे अनिवार्य आहे. वाहनात चढण्यापूर्वी सर्वांचे सॅनिटायझेशन केले जावे.

> गाइड आणि पर्यटकांनी मायक्रोफोनचा वापर करावा. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होईल. शक्य असल्यास ऑडियो गाइडचा वापर करावा. 

बातम्या आणखी आहेत...