आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Traveling Thousands Of Kilometers, Workers Reach Mumbai, Allahabad And Mumbai 1,375 Kilometers By Rickshaw

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:ना नाेंदणी, ना तपासणी; हजाराे किलाेमीटर प्रवास करत परप्रांतीय गाठताहेत मुंबापुरी, अलाहाबाद ते मुुंंबई 1,375 किलाेमीटरचे अंतर रिक्षात बसून पार

सचिन जैन | नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नियमांचे सर्रास उल्लंघन करीत उदरनिर्वाहासाठी नाशिकमार्गे प्रवास
  • मन:स्थिती : अलाहाबाद ते मुुंंबई १,३७५ किलाेमीटरचे अंतर रिक्षात बसून पार

काेराेनाचा फैलाव लक्षात घेता राज्यात एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी स्थानिक नागरिकांना प्रशासनाने ई-पास बंधनकारक केले असताना दुसरीकडे लाॅकडाऊन व मुंबईत काेराेनाच्या प्रकाेपामुळे मूळ गावी गेलेले परप्रांतीय हजाराे किलाेमीटरचा प्रवास बिनदिक्कतपणे रिक्षाने करत मुंबई गाठत आहेत. दाेन राज्यांतील रिक्षाच्या या प्रवासात नियमांचे उल्लंघन करत येणाऱ्या या परप्रांतीयांची काेणत्याही प्रकारची तपासणी वा विचारणा केली जात नसल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे. शहरातून माेठ्या संख्येने परप्रांतीय एम ०३ किंवा एम ४३ या क्रमांकाच्या रिक्षा, टॅक्सीने मुंबईकडे जात आहेत.

मार्चमध्ये लाॅकडाऊनमुळे सर्व उद्याेगधंदे-व्यवसाय ठप्प झाल्याने तसेच मुंबई काेराेनाचा हाॅट स्पाॅट बनल्याने मुंबई व परिसरात राहणाऱ्या लाखाे नागरिकांनी गावाची वाट धरली हाेती. मिळेल त्या वाहनाने ते उत्तर प्रदेश, बिहारकडे रवाना झाले हाेते. आता तीन-साडेतीन महिने उलटल्यानंतर उदरनिर्वाहासाठी ते पुन्हा मुंबईकडे परतू लागले आहेत. उत्तर प्रदेशच्या विविध शहरांतून परप्रांतीय राेजंदारी अथवा रिक्षा-टॅक्सी चालवण्यासाठी मुंबईकडे जात आहेत. अलाहाबाद ते मुुंंबई हे तब्बल १३७५ किलाेमीटरचे अंतर एका रिक्षात चार-पाच परप्रांतीय बसून काेणत्याही अडथळ्याशिवाय अथवा तपासणीशिवाय प्रवास करत आहेत. मुंबई, नाशिकमध्ये काेराेनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनासमाेर चिंता निर्माण करत असताना दुसरीकडे हे परप्रांतीय चिंतेत भर टाकत आहेत.

राज्यात प्रवासासाठी ई-पास बंधनकारक

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी ई-पास गरजेचा आहे. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे आहे. संबंधित संकेतस्थळावर प्रवासाची माहिती, आधार कार्ड, पॅन कार्डची झेराॅक्स माहिती देणे गरजेचे आहे.

शेतीची कामे केली

लाॅकडाऊन व नंतरच्या काळात त्यांनी गावात शेती, मशागतीची कामे केली. आता पावसाळा असल्याने शेतीची कामे पूर्ण झाल्याने पैसे कमावण्यासाठी मुंबईला परत जात आहेत.

काेराेना संसर्गाची भीती

या नागरिकांची वैद्यकीय तपासणी अथवा नाेंदणी केलेली नाही. िकत्येक किलाेमीटरचा प्रवास करत जाणाऱ्या या परप्रांतीयांमुळे मुंबईसह अन्य परिसरात पुन्हा काेराेना संसर्ग पसरण्याची भीतीही यामुळे निर्माण झाली आहे.

  • काेराेना का डर है, मगर पैसे कमाने पडेंगे. काेराेनामुळे मनात थाेडी भीती आहे. तीन महिने गावालाच हाेताे. आता पैशाची गरज आहे. पुन्हा मुंबईत रिक्षा चालवणार आहे. काही साेबती कंपनीत कामे करणार आहेत. - रमेशचंद, रिक्षाचालक
  • आता कंपनी सुरू झाली असून कामासाठी बाेलावले आहे. आमच्यासाेबत १२ ते १५ नागरिक अलाहाबाद येथून रिक्षाने येत आहेत. - अमितसिंग, कामगार
  • परप्रांतीय नागरिक रिक्षाने शहरात येत असल्याबाबत यासंदर्भात अधिक माहिती घेताे. तसेच याबाबत शासनाच्या प्रचलित धाेरणानुसार याेग्य ती कारवाई केली जाईल.-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

पेट्राेलच्या कॅन रिक्षात; धाेकादायक प्रवास

अनेक लाेक पेट्राेलच्या कॅन रिक्षात ठेवत प्रवास करत आहेत. दुर्दैवाने अपघात झाल्यास माेठी दुर्घटना हाेण्याची भीती आहे. याकडे पाेलिसांनीदेखील गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...