आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरात डावे आता विरोधी पक्षही नाही:2018 मध्ये सत्ता गेली, 2023 मध्ये विरोधी पक्षाचा दर्जा; BJP नव्हे महाराजांनी हिरावला दर्जा

लेखक: संध्या द्विवेदी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मला माहिती आहे की मी सत्याच्या मार्गावर होतो. मला जे करायचे होते ते केले. बाकी सर्व देव आणि मतपेटीवर सोडले. ज्या गोष्टी माझ्या हातात नाही, त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न मी का करू'

त्रिपुरातील सर्वात नवा राजकीय पक्ष टिपला मोथाचे प्रमुख प्रद्युत किशोर मानिक देब बर्मा हे बोलताना जितके आनंदी दिसतात तितकेच निश्चिंतही.

शाही कुटुंबातील प्रद्युत किशोर यांना हा आनंद दिला आहे 2 मार्च रोजीच्या निवडणूक निकालांनी. दोन वर्षांपूर्वीच बनलेला त्यांचा पक्ष आता त्रिपुरातील मुख्य विरोधी पक्ष आहे. पक्षाने पहिल्यांदा निवडणूक लढवली, 42 जागांवर उमेदवार उभे केले. यापैकी 13 जणांना विजय मिळाला.

निवडणुकीच्या आधी मानले जात होते की टिपरा मोथा सरकार चालवणाऱ्या भाजपला नुकसान पोहोचवू शकते. याचा फायदा काँग्रेस आणि माकपला होईल. पण याच्या उलट झाले. भाजपला केवळ 3 जागांचे नुकसान झाले आहे, तर माकपचा मुख्य विरोधी पक्षाचा दर्जा हिरावला गेला आहे. त्यांना टिपला मोथापेक्षा 2 जागा कमी म्हणजेच 11 जागा मिळाल्या आहेत. 2018 मध्ये माकपला 16 जागा मिळाल्या होत्या.

निकालांत भाजप आणि काँग्रेससाठी काही नवीन नाही. मात्र टिपरा मोथा थेट विरोधी पक्षाच्या दर्जात येणे डाव्यांसाठी उध्वस्त होण्यासारखे आहे. त्रिपुरा माकपचा गड आहे, त्यांच्याकडे अस्तित्वसाठी विरोधी पक्षाचा दर्जा होता, तोही टिपरा मोथाने हिरावला आहे.

रॅलीत भाजपला आव्हान, निकालांत डाव्यांचे नुकसान

टिपरा मोथाचे प्रमुख प्रद्युत किशोर मानिक देब बर्मा निवडणूक प्रचारांत भाजपवर निशाणा साधत होते. भाजपने हातमिळवणीसाठी दबाव टाकल्याचे ते प्रचारात म्हणत होते. पूर्ण निवडणुकीत त्यांनी त्यांचा सामना भाजपशी असल्याचे सांगितले. काँग्रेसविषयी बोलताना ते म्हणाले की राहुल आणि प्रियंका गांधींशी आपले चांगले संबंध आहेत. डाव्यांविरोधात कोणतेही विधान आले नाही. मात्र निकाल आल्यावर भाजपऐवजी डाव्यांचे जास्त नुकसान दिसले.

त्रिपुराचे ज्येष्ठ पत्रकार शेखर दत्त म्हणतात, 'आदिवासींमध्ये टिपरा मोथाची पकड होती. ते काही जागा जिंकतील हे निश्चित होते. पण 13 जागा जिंकून डाव्यांचा दर्जा हिरावतील हा अंदाज लावणे कठीण होते. काँग्रेस त्यांच्यासोबत असूनही.'

ते म्हणतात, 'डाव्यांनी या निवडणुकीत पूर्ण ताकद लावली होती. आदिवासी नेते जितेंद्र चौथरींना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवले. पण ते आधी मिळालेल्या जागाही निवडून आणू शकले नाही. जागांतील फरक किती आहे याने काहीही फरक पडत नाही. फरक केवळ याने पडतो की तुम्ही प्रमोट झाले की डिमोट.'

माकपने 3 फेब्रुवारी रोजी जाहिरनामा प्रकाशित केला होता. यात जुनी पेंशन बहाल करणे आणि अडीच लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन होते. पण निवडणुकीत याचा फायदा मिळाला नाही.
माकपने 3 फेब्रुवारी रोजी जाहिरनामा प्रकाशित केला होता. यात जुनी पेंशन बहाल करणे आणि अडीच लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन होते. पण निवडणुकीत याचा फायदा मिळाला नाही.

निवडणुकीत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहिले, विजयानंतर कोणतीही प्रतिक्रिया नाही

अपेक्षेच्या अगदी उलट 2 मार्च रोजी निवडणूक निकाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशीही प्रद्युत यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. त्यांनी जनतेचे आभार मानले नाही आणि विजयावर ट्विटही केले नाही. कदाचित त्यांना हे दाखवायचे होते की जय-पराजयाने त्यांना काहीही फरक पडत नाही.

मी त्यांना विचारले की तुम्ही राज्यातील दुसरा मोठा पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष आहात. हे मोठे यश आहे कारण पक्ष अगदी नवा आहे. ट्विटरवर जनतेचे आभार नाही, विजयाचा जल्लोष नाही. तेव्हा निश्चिंत अंदाजात उत्तर मिळाले, 'मी माझे ट्विटर हँडल स्वतः चालवतो, कोणतीही टीम नाही. मी पूर्ण दिवस व्यस्त होतो.'

सभागृहात ग्रेटर त्रिपरालँडची मागणी उचलून धरणार

प्रद्युत देब बर्मांना मी विचारले की, आताही तुम्ही वेगळ्या प्रदेशाच्या जुन्या मागणीवर कायम राहाल? उत्तर मिळाले - 'भावनिक मागण्या जुन्या होत नाही. मला त्याच लोकांनी निवडून दिले आहे, ज्यांच्यासाठी मी मागणी केली आहे. मी ग्रेटर त्रिपरालँडची मागणी विधानसभेत उचलून धरेन.'

मतगणनेच्या दिवशी प्रद्युत किशोर संगीतकारांसोबत राहिले

प्रद्युत किशोर देब बर्मांचा अंदाज संपूर्ण निवडणुकीत दिसला. ते प्रकाशझोतात तेव्हा आले, जेव्हा गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना दिल्लीला बोलावले आणि त्रिपुरात एकत्र निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. वास्तविक प्रद्युत त्रिपुरात आदिवासींसाठी वेगळ्या ग्रेटर त्रिपरालँडची मागणी करत आहेत.

याविषयी त्यांनी भाजपकडून लेखी वचन मागितले. भाजप तयार न झाल्याने त्यांनी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. यापुढे जात त्यांनी टिपरा मोथा एकट्याने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

मतगणनेच्या दिवशी त्यांनी 12 वाजून 48 मिनिटांनी काही नव्या संगीतकारांसोबतचा एक फोटो ट्विट केला. 'संगीतकारांसोबत सायंकाळ घालवणे हा या अनुभूतीचा अचूक मार्ग आहे की तुमच्या आत्म्याविषयी सच्चे राहणे राजकीय प्रकाशझोतात राहण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे.'

2 मार्च रोजी प्रद्युत किशोर देब बर्मांनी हा फोटो ट्विट केला होता. यात ते संगीतकारांसोबत आहेत.
2 मार्च रोजी प्रद्युत किशोर देब बर्मांनी हा फोटो ट्विट केला होता. यात ते संगीतकारांसोबत आहेत.

हा 'बुबाग्रा' विकाऊ नाही

त्रिपुराच्या राजघराण्यातील प्रद्युत यांची स्टाईल चर्चेत असते. गडद चष्मा आणि कुर्ता-पायजमा. सोशल मीडियावर विरोधकांना आव्हान देत राहतात. ते हेही म्हणतात की जय-पराजय होत राहिल. मात्र मी आपल्या लोकांसाठी कायम लढत राहीन. त्रिपुराच्या स्थानिक भाषेत राजांना नाते बुबाग्रा म्हटले जाते. ते सभांमध्ये म्हणत राहिले, 'हा बुबाग्रा केवळ तुमचा आहे, कधीही विकणार नाही.'

दोन वर्षांपूर्वी टिपरा मोथाचे संघटनेतून राजकीय पक्षात रुपांतर

5 फेब्रुवारी 2021 रोजी प्रद्युत यांनी आपल्या सामाजिक संघटनेचा राजकीय पक्षात बदल करण्याची घोषणा केली होती. त्याच वर्षी आदिवासी ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिल निवडणुकीत टिपरा मोथा उभी राहिली आणि बहूमत मिळवले होते. केवळ दोन वर्षांतच पक्षाने विधानसभा निवडणूक लढवत विरोधी पक्षाचा दर्जा मिळवला.

भाजपने गेल्या वेळच्या तुलनेत 4 जागा गमावल्या. मात्र 42 जागा मिळवून बहुमत मिळवले. डाव्यांनी 11 जागा मिळवल्या. त्यांना गेल्या वेळी 16 जागा मिळाल्या होत्या. भाजपचा सहकारी परक्ष IPFT ला यावेळी केवळ एक जागा मिळाली. गेल्या वेळी त्यांच्या 8 जागा होत्या. काँग्रेसने यावेळी 3 जागा मिळवल्या. त्यांनी गेल्या वेळी एकही जागा मिळाली नव्हती.

प्रद्युत देब बर्मांनी 7 फेब्रुवारी रोजी पेचारथलमध्ये सभा घेतली होती. इथे त्यांनी एका घरात जेवण केले आणि काहीवेळ आराम केला. जाणकारांच्या मते लोकांना प्रद्युत यांचा हाच अंदाज आवडतो.
प्रद्युत देब बर्मांनी 7 फेब्रुवारी रोजी पेचारथलमध्ये सभा घेतली होती. इथे त्यांनी एका घरात जेवण केले आणि काहीवेळ आराम केला. जाणकारांच्या मते लोकांना प्रद्युत यांचा हाच अंदाज आवडतो.

ना आयटी टीम, ना इमेज मेकिंग टीम, तरीही सोशल मीडियावर जादू

प्रद्युत देब बर्मा स्वतःचे सोशल मीडिया खाते स्वतःच हँडल करतात. त्यांचे निकटवर्तीय सांगतात की त्यांनी राजकीय इमेज मेकिंगसाठी कोणतीही टीम हायर केलेली नाही. तरीही सोशल मीडियावर त्यांची जादू कायम होती.

एका पत्रकाराने त्यांना किंग मेकर आणि महाराज म्हटल्यावर ते गमतीने म्हणाले, 'हल्ली राजासारखे कपडे तर केवळ जादूगार पीसी सरकार घालतात.' दुसऱ्या पत्रकाराने विचारले तुम्हाला काय म्हणावे, प्रद्युत की महाराज. तेव्हा त्यांचे उत्तर होते, 'महाराज तर आचाऱ्यालाही म्हणतात.'

प्रद्युत भाषण देताना कधी दिवारमधील अमिताभ बच्चन यांच्या अंदाजात दिसले तर कधी फिल्मी अंदाजात डायलॉग ऐकवताना दिसले. निवडणुकीत उतरण्यापूर्वी सभांमध्ये म्हटले, 'जिंकलो तर जिंकलो, हरलो तर हरलो. पण एक शेवटचा लढा देऊ.' हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.

दिवारच्या अमिताभ बच्चनप्रमाणे त्यांचे आणखी एक भाषण व्हायरल झाले, 'त्यांच्याकडे पैसा आहे, नेते आहेत, दिल्लीतील मोठमोठे नेते आहेत. पण आमच्याकडे उपरवाला आहे, गॉड आहे...'

प्रद्युत देब बर्मांनी आपल्या भाषणात अनेकदा फिल्मी अंदाजाच डायलॉग ऐकवले. याच अंदाजात विरोधकांना उत्तर दिले.
प्रद्युत देब बर्मांनी आपल्या भाषणात अनेकदा फिल्मी अंदाजाच डायलॉग ऐकवले. याच अंदाजात विरोधकांना उत्तर दिले.

शाही कुटुंबातील असूनही प्रद्युत यांनी लोकांकडून निवडणुकीसाठी निधी मागण्यात संकोच बाळगला नाही. त्यांनी बँक अकाऊंटचे डिटेल सोशल मीडियावर शेअर केले. कधी 6 वर्षांची मुलगी आपली पिग्गी बँक घेऊन आली, तर एखाद्या राजघराण्यातील महिलेने त्यांच्या बँक खात्यात पैसे टाकले.

डावे आणि काँग्रेसच्या B टीमचे आरोप फेटाळले

एका सभेदरम्यान गृहमंत्री अमित शहांनी प्रद्युत यांच्यावर डावे आणि काँग्रेसची B टीम असल्याचे आरोप केले. हे त्यांनी फेटाळले आणि म्हटले, 'मी देशाच्या गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की, हा माणिक्य परिवार कुणापुढेही झुकत नाही. ही कुणाचीही B टीम नाही. तुम्ही माझे आजोबा वीर विक्रम यांचे नाव घेतले तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की वीर विक्रम यांचा नातू झुकणार नाही.'

ही बातमीही वाचा...

भाजीपाला, डाळ-मसाले, कुत्र्याचे मांस एकाच मंडीत:4 हजारांचा कुत्रा, विकल्यास 10 रुपये दंड; बंदीनंतरही विकले जातेय मांस