आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चीनमधून पसरलेल्या कोरोनामुळे जगभरात मोठे संकट निर्माण झाले आहे. सर्वाधिक परिणाम अमेरिकेवर झाला आहे. येथे १६ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून १ लाखाहून जास्त मृत्यू झाले आहेत. अमेरिकेच्या दुर्दशेला चीन आणि जागतिक आरोग्य संघटना जबाबदार असल्याचा ठपका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला आहे. कोरोनाला महामारी घोषित करण्यात विलंब आणि चीनची मदत करून जगाची दिशाभूल केल्याचा आरोप ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओवर केला आहे. यामुळे नाराज झालेल्या ट्रम्प यांनी आधी निधी रोखला आणि आता डब्ल्यूएचओसोबतचे संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेकडून डब्ल्यूएचओला वर्षाला ३३५७ कोटींचा निधी दिला जातो, तर चीनकडून ३०० कोटी रुपये दिले जातात. यामुळे अमेरिकेच्या निधीशिवाय जगातील सर्वात मोठ्या आरोग्य संघटनेवर दारिद्र्याचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे अशा महामारीच्या संकटात अमेरिकेने निधी बंद केल्याने डब्ल्यूएचओवर किती मोठा परिणाम होणार आहे.
ग्रिफिथ विद्यापीठातील आरोग्य विभागातील तज्ञ डॉ. सारा डेव्हिस सांगतात, डब्ल्यूएचओला विविध अभियानांवर मोठे निर्णय घ्यावे लागतील. अनेक देशांकडून मिळणाऱ्या निधीतही कपात होऊ शकते. दुसरीकडे, सिडनी विद्यापीठात डब्ल्यूएचओ कोलॅबोरेटिंग सेंटर फॉर फिजिकल अॅक्टिव्हिटी व न्यूट्रिशनचे उपसंचालक प्राध्यापक अॅड्रियन बाउमननुसार अमेरिकेचा निर्णय सद्यस्थितीत घातकी ठरु शकतो.
गरीब व कमकुवत आरोग्य सुविधा असणाऱ्या देशांचे नुकसान
> तज्ञांनुसार, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सर्वाधिक नुकसान कमकुवत आरोग्य यंत्रणा असलेल्या आणि गरीब देशांचे होईल.
> निधी कमी झाल्याने महामारी रोखण्यासाठी किंवा लसीकरण अभियानांमध्ये निधीची कमतरता भासू शकते.
> डब्ल्यूएचओ ट्रिपल बिलियन टार्गेटवर काम करत आहे. १०० कोटी लोकांना युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज, १०० कोटी लोकांना आपतकालीन आरोग्य सुविधा आणि १०० कोटी लोकांना चांगली आरोग्य सुविधा देणे. मात्र निधी थांबल्याने या ३०० कोटींवर लोकांवर परिणाम होऊ शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.