आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरने सरकारसमोर नमते घेतलेले नाही:27 हजार कोटींची वार्षिक कमाई करते ट्विटर, यापैकी 14 हजार कोटी एकट्या अमेरिकेतून येतात; एकूण कमाईत 86% वाटा जाहिरातींचा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्विटरने सरकारपुढे झुकते माप न घेल्याची दोन मोठी कारणे आहेत : मोठा यूजर बेस आणि उत्पन्नाचा स्त्रोत

भारतात ट्विटरचे कायदेशीर संरक्षण मागे घेण्यात आले आहे. आता यावर IPC ची प्रकरणे नोंदविली जाऊ शकतात. पोलिसही चौकशी करू शकतात. नवीन माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या नियमांचे पालन न केल्याने केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे. ट्विटर आणि सरकार यांच्यात फेब्रुवारी 2021 पासून वाद सुरू आहे.

फेब्रुवारीमध्ये सरकारने ट्विटरकडे 1178 नावांची यादी सोपवली होती. या ट्विटर हँडल्समुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी समस्या निर्मात होत आहेत, म्हणून त्यांना त्वरित सस्पेंड करावे. तसेच आदेशाचे पालन न केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत कारवाई केली जाईल, असे सरकारने म्हटले होते.

सरकारच्या या आदेशाचा ट्विटरवर कोणताही परिणाम झाला नाही. ट्विटरने निवेदनात म्हटले आहे की, आम्ही मीडिया ग्रुप, पत्रकार, यूजर्स आणि नेत्यांच्या खात्यावर कारवाई करीत नाही. आम्ही आमच्या यूजर्सचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. यानंतर सरकार आणि ट्विटर यांच्यात लढाई सुरु झाली. ट्विटर किंवा सरकार दोघेही झुकण्यास तयार नव्हते.

ट्विटरची भूमिका घेण्याचे मोठे कारण हे आहे की, त्यांचे सुमारे 55% उत्पन्न अमेरिकेतून येते. येथे जाणून घेऊयात ट्विटरचा संपूर्ण लेखा-जोखा... जगभरात दरवर्षी ट्विटरचे यूजर्स कसे वाढले? ट्विटरचे दरवर्षीचे उत्पन्न किती असते? त्याचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत? ते जाणून घेऊयात...

ट्विटर विरुद्ध सरकारः या 6 गोष्टींमुळे तणाव वाढला

  • 2021 फेब्रुवारीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारने ट्विटरला अनेक अकाउंट बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र ट्विटरने व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही, असे सांगत या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला.
  • फेब्रुवारीमध्येच ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांना शेतक-यांच्या चळवळीला पाठिंबा देणा-या ट्विट्सला लाइक केले. सरकारी सूत्रांनी या प्लॅटफॉर्मच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
  • 18 मे रोजी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक स्क्रीनशॉट काँग्रेसचे टूककिट असल्याचे सांगून ट्विट केले. 20 मे रोजी ट्विटरने त्याला 'मॅन्युपुलेटेड मीडिया' म्हणून टॅग केले. सरकारने सांगूनही ते ट्विटरने ते हटवले नाही.
  • 25 मे रोजी पोलिसांनी गुरुग्राममधील ट्विटरच्या कार्यालयावर छापा टाकला. टूलकिट प्रकरणात चौकशीची नोटीसही पोलिसांनी तिथे चिकटवली.
  • 4 जून रोजी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गजांच्या हँडलची ब्लू टिक हटवले. मात्र, नंतर त्यांच्या अकाउंटसमोर ब्लू टिक पुन्हा लावण्यात आली. भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात नवीन सोशल मीडिया नियमांमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादातून ट्विरटने ही कारवाई केल्याचे म्हटले गेले होते.
  • 25 मेपासून लागू झालेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान कायद्याचे नियम ट्विटरने अजूनही पूर्णपणे लागू केले नाहीत. यासंदर्भात सरकारने तीन वेळा नोटिसा बजावल्या आहेत.

अखेर सरकारने ट्विटरचे माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 79 अन्वये कायदेशीर संरक्षण मागे घेतले आहे, तर गुगल, फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामसारख्या इतर प्लॅटफॉर्मवर अजूनही ही सुरक्षा आहे.

ट्विटरने सरकारपुढे झुकते माप न घेल्याची दोन मोठी कारणे आहेत : मोठा यूजर बेस आणि उत्पन्नाचा स्त्रोत

हे असे यूजर्स आहेत, जे ट्विटरवरुन कमाई करतात. मंथली अ‍ॅक्टिव यूजर्सविषयी सांगायचे झाल्यास जगभरात हा आकजा 35 कोटींहून अधिक आहे.
हे असे यूजर्स आहेत, जे ट्विटरवरुन कमाई करतात. मंथली अ‍ॅक्टिव यूजर्सविषयी सांगायचे झाल्यास जगभरात हा आकजा 35 कोटींहून अधिक आहे.

11 मार्च 2006 रोजी ट्विटर लाँच झाले होते. त्यानंतर त्याची लोकप्रियता सतत वाढत आहे. 2019 नंतर ट्विटरच्या युजर बेसमध्ये एक मोठी उडी बघायला मिळाली. 2020 पर्यंत, ट्विटरवर दररोज 18.6 कोटी डेली अ‍ॅक्टिव यूजर्स होते, जे 2021 च्या पहिल्या तिमाहीत वाढून 19.2 कोटींवर गेले आहेत. मंथली अ‍ॅक्टिव यूजर्सविषयी बोलायचे झाल्यास, हा आकडा 35 कोटींपेक्षा अधिकचा आहे. ट्विटरचे भारतात दररोज सुमारे 1.75 कोटी डेली यूजर्स आहेत.

2020 मध्ये ट्विटरने 27.1 हजार कोटींचा महसूल मिळवला. हे मागील वर्षाच्या तुलनेत 7.4% जास्त होते. ट्विटरने त्याचे उत्पन्न दोन भागात विभागले. पहिले म्हणजे जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न आणि दुसरे म्हणजे परवाना आणि इतर सेवांमधून झालेली कमाई.

2020 मध्ये ट्विटरने जाहिरातींमधून 86% म्हणजेच सुमारे 23.4 हजार कोटींची कमाई केली आहे. यात प्रॉडक्ट्स, ट्वीट्स आणि अकाऊंट्सच्या प्रमोशनचा समावेश होता. याशिवाय डेटा परवाना आणि इतर सेवांमधून 14% म्हणजेच 3.7 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न ट्विटरला मिळाले.

जगभरात 10% सोशल मीडिया यूजर्स ट्विटर वापरतात. यात जगभरातील सेलिब्रिटी, राजकारणी, व्यापारी आणि ब्रँड्सचा समावेश आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत 6.87 कोटी फॉलोअर्ससह 12 व्या क्रमांकावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...