आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव यांना घेरण्यात पवारांची भूमिका?:भाजपने आधी राज्यसभा, नंतर MLC निवडणूक जिंकली; आमदार रात्रीत सुरतला कसे गेले?

प्रेम प्रताप सिंह2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवरील संकट दाटले आहे, ते पाहता पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाकारता येणार नाही. हा विभाग राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येतो आणि राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हा विभाग आहे. याप्रकरणी वळसे यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे 36 आमदारांना सोबत घेऊन मुंबईहून सुरतला गेले आणि कुणाला याची खबर देखील लागली नाही, असे कसे शक्य झाले.

उद्धव यांना वेळीच हे कळाले असते तर त्यांनीही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याप्रमाणे अटकाव करुन सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला असता. विशेष म्हणजे, गेल्या 8 वर्षांत अशोक गहलोत हे एकमेव नेते आहेत ज्यांनी सत्तापालटाचा प्रयत्न हाणून पाडला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव यांना कमकुवत करण्याचा खेळ राज्यसभा निवडणुकीपासून सुरू झाला. आधी राज्यसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले, त्यात शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. त्यानंतर एमएलसी निवडणुकीत देखील शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही निवडणुकांमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याचे सांगण्यात आले होतं.

या संपूर्ण घटनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न का उपस्थित करण्यात आले, ते खालील 5 मुद्दांच्या माध्यमातून समजून घ्या......

1. महाराष्ट्र सरकारचे गृह खाते राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री असले तरी शिंदे गटाच्या बंडखोरीमध्ये पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कुठेही दिसून आली नाही. बंडखोरीच्या एका दिवसानंतरही काही आमदार गुवाहाटीला पोहोचले, त्यांनाही रोखण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही मात्र, या मुद्द्यावर शरद पवार यांनी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

2. राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे भाष्य केले. आता प्रश्न हा आहे की पवार हे का बोलले? पवारांना या संपूर्ण योजनेची आधीच माहिती होती का?

3. राष्ट्रवादीचे दोन मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात आहेत. त्यामुळे राजकीय तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीत आपल्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपशी गुप्त करार करू शकते. या सर्व पार्श्वभूमीवर फुटीमुळे शिवसेना कमकुवत होणार असून, त्याचा फायदा भविष्यात राष्ट्रवादीला होऊ शकतो.

4. 2019 साली राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केली होती आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. त्या वेळी भाजपने राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, त्यावर पवारांनी मध्यस्थी करत तीन दिवसांत तोडगा काढला. पण यावेळी ते फारसे सक्रिय दिसत नाही. त्यांना स्वतःचे सरकार वाचवण्यात रस का नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.

5. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील मैत्री जगजाहीर आहे. पवार यांना केंद्राकडून पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

कमलनाथांच्या कथेची पुनरावृत्ती

9 मार्च 2020 रोजी ज्योतिरादित्य सिंधिया यांना पाठिंबा देणारे सुमारे 22 आमदार मध्य प्रदेशातून अचानक बेपत्ता झाले. दुसऱ्या दिवशी या आमदारांची बंगळूरू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यादरम्यान गुप्तचर विभागाने कमलनाथ सरकारला योग्य माहिती दिली नसल्याचेही सांगण्यात आले.

बंडखोर आमदारांमध्ये सहा मंत्री गोविंद सिंग राजपूत, प्रद्युम्न सिंग तोमर, इमरती देवी, तुलसी सिलवत, प्रभुराम चौधरी आणि महेंद्रसिंग सिसोदिया यांचा समावेश होता. नाराज सिंधिया यांचे मन वळवण्यासाठी काँग्रेसने त्यांच्या मित्रांची मदत घेतली. मिलिंद देवरा आणि सचिन पायलट यांना सिंधिया यांचे मन वळवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, सिंधिया कोणालाही भेटले नाहीत.

आमदारांचे मन वळवण्यासाठी दिग्विजय सिंह बंगळुरूलाही गेले, पण काही उपयोग झाला नाही आणि कमलनाथ सरकार पडले.

राजस्थान सरकारला तारले

जुलै 2020 मध्ये राजस्थान सरकारमध्ये बंडखोरी झाली होती. याची माहिती सीएम गेहलोत यांना आधीच लागली होती. बंडखोर आमदारांनी राजस्थानची सीमा ओलांडण्याची तयारी सुरू करताच राजस्थान पोलिसांनी प्रत्येक आमदाराला घरातून उचलून ताब्यात घेतले आणि बंदिस्त केले.

सरकारला वाचवण्यासाठी प्रत्येक संशयिताचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला. भाजपने आपल्या सर्व आमदारांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. भारतीय आदिवासी पक्षाच्या आमदारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पोलिसांनी आमदारांच्या गाडीच्या चाव्याही काढल्या होत्या.

बंडखोर आमदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांशिवाय एसीबी आणि एसओजी यांनाही मैदानात उतरवलेले गेले. त्यावेळी राजस्थान सरकारने आपल्या सीमाही सील केल्या होत्या. विमानतळावर सुरक्षा कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते. आमदारांना 450 किमी दूर बंदिस्त करण्यात आले, जिथे कोणीही पोहोचू शकत नाही, तसेच इंटरनेटही बंद करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...