आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचा नवीन प्रयोग राबवण्यात आला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले. त्याचवेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, असे भविष्य वेदमूर्ती ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ अनंत पांडव गुरुजी यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले होते. यासंदर्भातले वृत्त देखील 'दिव्य मराठी'ने प्रकाशित केले होते.
आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने 'दिव्य मराठी'ने पुन्हा एकदा अनंत पांडव गुरुजी यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत येतील का? शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातून जाईल का? काय आहे उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीतील राजयोगाचा अर्थ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पांडव गुरुजींनी दिली आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीमध्ये राजयोग असला तरी राजयोग असण्याचा अर्थ केवळ सत्तेतील मोठे पद, असा होत नाही. त्यांच्या कुंडलीमध्ये राजयोग कायम आहे. मात्र, त्यांना समाजामधील प्रतिष्ठेचे पद मिळेल असे मत अनंत पांडव गुरुजी यांनी व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीतील असलेल्या राजयोगाचा नेमका अर्थ काय? शिवसेना पक्ष नेमका कोणाला मिळणार? फडणवीस यांच्या कुंडलीतील योग कसे आहेत? एकनाथ शिंदे यांचे भविष्य कसे असेल? या सर्व प्रश्नांची अनंत पांडव गुरुजींनी दिलेली सविस्तर उत्तरे पाहा 'दिव्य मराठी'च्या एक्सक्लूझिव्ह VIDEO मध्ये...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.