आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • After MLAs, Now 8 To 9 MPs Are Also Upset, Due To Legal Issues, They Can Leave Uddhav's Side, Not The Party.

शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर:आता 8 ते 9 खासदारही नाराज, कायदेशीर अडचणीमुळे पक्ष नव्हे तर उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकतात

आशिष रायएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना आता फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. जनतेला भावनिक साद घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता त्यांचे शासकीय निवासस्थान म्हणजेच वर्षा बंगल्यातून सर्व सामान गुंडाळून मातोश्रीवर पोहोचले आहेत. दरम्यान, आमदारांप्रमाणेच शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी 8-9 खासदारही उद्धव यांची साथ सोडू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, पक्षांतरविरोधी कायद्यामुळे शिवसेनेत राहणे ही त्यांची मजबुरी ठरणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, यापैकी बहुतांश खासदार कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पत्र लिहून बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार करून या नेत्यांवर कारवाई करू नये, असे आवाहन उद्धव यांना केले आहे.

बाळासाहेबांसारखे निर्भीड नव्हे तर घाबरलेले दिसले उद्धव ठाकरे:नेत्यांची पोल खोलण्याऐवजी परत येण्याची केली विनंती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सत्ता परिवर्तनाची वाट पाहत असून, शिंदे यांच्याकडे शिवसेनेची पूर्ण कमान येताच ते उद्धव यांच्यापासून वेगळे उभे राहतील. याशिवाय आज आणखी काही नावे समोर येऊ शकतात. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, ठाण्याचे लोकसभेचे खासदार राजन विचारे आणि नागपूरचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने हेही पक्षावर नाराज आहेत.

भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत युती करण्याची विनंती केली आहे.
भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत युती करण्याची विनंती केली आहे.

बंडखोरांवर कारवाई करू नये, गवळी यांचे पत्र

शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, 'हिंदुत्वाच्या बाजूने असलेल्या बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार करण्यात यावा. बंडखोर आमदारांवर कारवाई करू नये’, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. मात्र, भावना यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे उद्धवसमर्थित नेत्यांचे म्हणणे आहे. त्यांना ईडीने तीन वेळा समन्स बजावले आहे. गवळी यांच्या विरोधात महिला प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणी तपास सुरू आहे. या ट्रस्टमधील मनी लाँड्रिंग प्रकरण खूप जुने आहे.

ठाकरेंची बंडखोरांना भावनिक साद:मुख्यमंत्री म्हणून मी नको असेल तर समोर येऊन सांगा, माझा राजीनामा तयार!

कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने खासदारांमध्ये नाराजी

ठाण्यातील खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावाचाही यामध्ये समावेश आहे. त्यांच्यासह मराठवाड्यातील काही खासदारही उद्धव यांच्या निर्णयांवर नाराज आहेत. लोकसभेत 19 खासदारांसह भक्कम स्थितीत उभे असतानाही उद्धव हे केवळ मुंबईपुरतेच मर्यादित आहेत आणि अनेकदा सांगूनही त्यांच्याशी संबंधित कार्यकर्त्यांची पक्षात सातत्याने उपेक्षा होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हे खासदार शिवसेनेपासून नव्हे तर उद्धवपासून वेगळे होतील

पक्षांतर विरोधी कायदा हा आमदार किंवा खासदारांना पक्ष बदलण्यापासून रोखतो. वास्तविक, एखाद्या आमदाराने निवडणुकीपूर्वी पक्ष बदलला तर हरकत नाही, परंतु कोणत्याही एका पक्षातून विजयी झाल्यानंतर त्याने तसे केल्यास त्याला आधी लोकसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्याच्या जागेवर पुन्हा निवडणूक होईल, असा नियम आहे.

शिवसेनेतील मोठा वर्ग एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहे.
शिवसेनेतील मोठा वर्ग एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहे.

या नियमामुळे निवडणुकीची गरज भासणार नाही!

या कायद्यात अशीही तरतूद आहे, ज्यानुसार पक्षाच्या 2/3 खासदारांनी एकाच वेळी पक्ष सोडल्यास त्यांना राजीनामा देण्याची गरज नाही किंवा त्यांच्या जागेवर निवडणूकही होणार नाही आणि या काळात ते ज्या पक्षाला पाठिंबा देतील, त्यांचे सरकार कोणत्याही अडचणीशिवाय सत्तेवर येईल. मात्र, खासदारांच्या स्थितीचा महाराष्ट्र विधानसभेवर परिणाम होणार नाही.

खासदारांनी बाजू बदलल्यास राष्ट्रपती निवडणुकीवर परिणाम

2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत, जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा नसल्यामुळे प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य 700 पर्यंत खाली आले आहे. अशा स्थितीत शिंदे गटाकडे अधिक खासदार असतील आणि ते शिवसेनेचे खरे वारसदार ठरले तर त्याचा फटका विरोधकांना सहन करावा लागू शकतो.