आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सप्लेनर:भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतात नेझल स्प्रे व्हॅक्सीन; जाणून घ्या नेमके काय आणि कसे काम करतात!

17 दिवसांपूर्वीलेखक: रवींद्र भजनी
 • कॉपी लिंक
 • नेझल स्प्रे व्हॅक्सीन इंजेक्शनपेक्षा चांगले कसे? भारतात कधी येणार?

देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा कित्येक पट भयंकर दुसरी लाट सुरू आहे. देशभर रोज दोन लाखांहून अधिक नवे रुग्ण समोर येत आहेत. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा आकडा सुद्धा 1 लाख 80 हजारांच्या पुढे गेला आहे. रोज कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत भारत पुन्हा क्रमांक एकचा आणि ब्राझील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. या बाबतीत अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून 1 मे पासून आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाचे लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यातच ब्रिटनमध्ये कोरोनावर नेझल स्प्रे अर्थात नाकातून घेतला जाणारा स्प्रे कोरोना रोखण्यात यशस्वी सिद्ध होताना दिसत आहे. भारतात सुद्धा या नेझल स्प्रेचा प्रयोग फास्ट ट्रॅकवर आणण्याची गरज आहे. असे झाल्यास निश्चितच कोरोना लवकरात लवकर रोखण्यात खूप मदत होऊ शकते.

आता हे नेझल स्प्रे नेमके काय आणि कसे काम करते यावर एक नजर टाकूया...

नेझल स्प्रे म्हणजे काय? ते कुणी बनवले?

 • वँकोवर येथील बायोटेक कंपनी सॅनोटाईज (SaNOtize) ने हे नायट्रिक ऑक्साइड नेझल स्प्रे (NONS) विकसित केले आहे. नेझल स्प्रे कोरोना रुग्ण स्वतः आपल्या नाकात टाकू शकतात. एकदा हा स्प्रे नाकात टाकल्यास व्हायरसचे प्रमाण कमी होते. या स्प्रेमुळे व्हायरस वाढत नाही तसेच फुफुसांना देखील काहीच नुकसान होत नाही.
 • कॅनडा आणि UK (युनायटेड किंगडम) मध्ये याच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यात 79 कोरोना व्हायरस संक्रमित लोकांवर दोन टप्प्यांमध्ये प्रयोग करण्यात आले. हा नेझल स्प्रे 24 तासांच्या आत व्हायरस 95% कमी करत असल्याचे समोर आले आहे. तर 72 तासांत 99% टक्के व्हायरस नष्ट होत असल्याचे प्रयोगातून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, हा स्प्रे कोरोनाच्या UK व्हॅरिएंटवर प्रभावी ठरला आहे.
 • कॅनडामध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रयोगात 103 लोकांना सहभागी करून घेण्यात आले. सर्वांच्या नाकात हा स्प्रे टाकण्यात आला. त्यानंतर कुणाचीही चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली नाही. UK च्या फेझ-2 NHS क्लिनिकल ट्रायल्समध्ये 70 सहभागी झाले होते. ते सगळेच कोरोना पॉझिटिव्ह होते. पण, ज्यांच्या नाकात स्प्रे टाकण्यात आले, त्यांच्या तुलनेत इतर रुग्णांमध्ये 16 पट अधिक कोरोना व्हायरसचे प्रमाण सापडले आहे. तत्पूर्वी कॅनडामध्ये झालेल्या प्रयोगात 7 हजार रुग्णांची चाचणी घेण्यात आली. यातील कुठल्याही रुग्णाला गंभीर साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागला नाही.

भारतात येऊ शकतो का नेझल स्प्रे?

 • होय. सध्या कंपनीने ब्रिटन आणि कॅनडामध्ये आपातकालीन मंजुरी मागितली आहे. इस्रायल आणि न्यूझीलंडने या स्प्रेला उपचारात आधीच मंजुरी दिली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात इस्रायलमध्ये स्प्रेचे उत्पादन देखील सुरू केले आहे. त्या ठिकाणी पुढच्या महिन्यात 30 अमेरिकन डॉलर एवढ्या किमतीत एक नेझल स्प्रे बॉटल मिळेल.
 • सॅनोटाईजच्या सीईओ आणि सह-संस्थापक डॉ. गिली रेगेव यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या भारतात स्प्रे प्रॉडक्शनसाठी पार्टनरच्या शोधात आहेत. भारतात या स्प्रेला मेडिकल डिव्हाइस म्हणून मंजुरी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी भारतातील काही मोठ्या औषध कंपन्यांसोबत चर्चा देखील सुरू आहे. परंतु, भारत सरकार किंवा नियामकांशी अद्याप संपर्क झालेला नाही.
 • सॅनोटाइजला तिसऱ्या टप्प्यात 4 ते 5 हजार लोकांवर एकत्रित चाचणी घ्यायची आहे. रेगेव यांनी सांगितल्याप्रमाणे, फेझ-3 चे काही ट्रायल भारतात सुद्धा घेतले जाऊ शकतात. यासाठी फंडिंगचा शोध सुरू आहे. फंडिंग मिळताच कंपनी पुढील प्रक्रिया सुरू करेल.

भारत बायोटेक सुद्धा बनवत आहे नेझल स्प्रे?

 • भारतात कोव्हॅक्सीन कंपनी बनवणारी कंपनी भारत बायोटेक सुद्धा नेझल व्हॅक्सीन कोरोनाफ्लूचे ट्रायल घेत आहे. कंपनीने जानेवारी महिन्यातच याच्या चाचण्या सुरू केल्या होत्या. भारत बायोटेकचे संस्थापक डॉ. कृष्णा एल्ला यांनी सांगितल्याप्रमाणे, नेझल व्हॅक्सीन एकदाच घ्यावी लागेल. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार व्हॅक्सीनला हे चांगला पर्याय म्हणून सिद्ध झाले आहे. यासाठी कंपनीने वॉशिंग्टन विद्यापीठासोबत करार केला आहे.
 • क्लिनिकल ट्रायल्स रेजिस्ट्रीनुसार, चार शहरांमध्ये 175 लोकांना नेझल स्प्रे व्हॅक्सीन देण्यात आला होता. काही दिवसांतच फेझ-1 चे निकाल समोर येतील. विशेष म्हणजे, स्प्रे नाकातून दिला जात असल्याने व्हायरसच्या एंट्री पॉइंटलाच ब्लॉक केले जाते.

आणखी कुठे विकसित होत आहेत नेझल स्प्रे व्हॅक्सीन?

 • पुण्यातील सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया आणि कोडाझेनिक्सला UK मध्ये औषध नियामक प्राधिकरण MHRAकडून जानेवारीत चाचणी घेण्याची मंजुरी मिळाली आहे. सिंगल-डोस इंट्रानेझल लाइव्ह व्हॅक्सीनच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांना ही मंजुरी देण्यात आली. कोडाझेनिक्स कंपनीने सांगितले, की COVI-VAC प्री-क्लिनिकल स्टडीमध्ये सुरक्षित आणि प्रभावी दिसून आले आहेत. जून 2021 पासून याच्या पुढील वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या जातील.
 • अमेरिकेतील एल्टिम्यूनने नेझल स्प्रे म्हणून नाकातून दिल्या जाणारे व्हॅक्सीन AdCOVID- विकसित केले आहे. सद्यस्थितीला हा स्प्रे कोरोना रोखण्यास यशस्वी सिद्ध झाला आहे. त्यातही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये याचा वापर करून संक्रमण रोखला जाऊ शकतो असेही निष्कर्श काढण्यात आले आहेत. 180 लोकांवर या स्प्रेच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या.
बातम्या आणखी आहेत...