आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंटरव्ह्यू‘गोली मारो’ म्हणणारे उजळ माथ्याने फिरतात:उमर खालिदचे वडील म्हणाले- निर्दोषत्वानंतरही मुलगा तुरुंगात का?

लेखक: संध्या द्विवेदी/वैभव पळनीटकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मी अनेकदा हाच विचार करतो, हा अंधकारमय भुयार किती लांब आहे? एखादा आशेचा किरण दिसतो का? मी अंताच्या जवळ आहे की अजून मध्येच आहे? माझी परीक्षा आताच सुरू झाली आहे का? गेल्या दोन वर्षांपासून दररोज रात्री मी या घोषणा ऐकत आहे. 'नाव नोंदवून घ्या, या कैदी बांधवांची आज सुटका आहे' आणि मी रोज त्या दिवसाची वाट पाहतो ज्या दिवशी या यादीत माझे नाव मी ऐकेन'

12 सप्टेंबर 2022 रोजी तुरुंगातून लिहिलेल्या एका पत्रात उमर खालिदने ही अपेक्षा व्यक्त केली होती. वास्तविक, त्याला कैदात 2 वर्षे 3 महिने पूर्ण होत आहेत आणि अद्याप तो बाहेर येण्याची कसलीही शक्यता नाही.

बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी उमर खालिदने दोन आठवड्यांच्या अंतरिम जामिनासाठी दिल्लीतील एका न्यायालयात धाव घेतली आहे. यावर 12 डिसेंबर रोजी निर्णय दिला जाणार आहे. उमरवर दंगलीचा कट आखल्याचा आरोप आहे. या दंगलीत 53 जणांचा मृत्यू झाला होता आणि 700 हून जास्त लोक जखमी झाले होते.

हे तेच विधान आहे, ज्यामुळे जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद तुरुंगात आहे. 14 सप्टेंबर 2020 रोजी दिल्ली दंगलीशी संबंधित दोन प्रकरणांत दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने उमरला अटक केली होती. या विधानाचा उल्लेख गृहमंत्री अमित शहांनी त्यांच्या संसदेतील भाषणात केला होता. त्यांनी दावा केला की, 17 फेब्रुवारी रोजी हे भाषण देण्यात आले होते आणि 23-24 फेब्रुवारी रोजी दंगली भडकल्या.

या प्रकरणांपैकी एका प्रकरणातून उमरची 3 डिसेंबर रोजी मुक्तता करण्यात आली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात UAPA असल्याने तो तुरुंगात आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्य प्रमाचलांनी मुक्ततेचा निर्णय देताना म्हटले होते - 'उमरविरोधात पोलिसांकडे कोणताही पुरावा नाही. केवळ संशयाच्या आधारे कुणालाही अनंत काळासाठी तुरुंगात ठेवता येत नाही.'

लोकांसाठी मी देशद्रोहीचा पिता

बाटला हाऊसच्या गल्ल्यांमधून जाताना मी झाकीर नगरमध्ये पोहोचतो. जामिया मिलिया विद्यापीठाजवळचा हा भाग आधी यमुनेचा रिव्हर बेड होता. आता इथे छोट्या गल्ल्या आणि घरांमध्ये दाट लोकवस्ती आहे. हा भाग 2008 मधील बाटला हाऊस चकमकीनंतर चर्चेत आला होता. त्यानंतर शाहीन बाग आंदोलनामुळे जगात ओळखला जाऊ लागला.

उमर खालिदचे वडील कासिम रसूल इलियास यांना भेटण्यासाठी मला त्यांच्या घरी जायचे होते. पण घरी मुलीच्या लग्नाची तयारी सुरु आहे. नातेवाईक आलेले आहे. त्यामुळे ते त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी बोलावतात. म्हणतात - 'तिथेच निवांत बोलणे होऊ शकते.'

मी एका छोट्या फ्लॅटसारख्या कार्यालयात दाखल होतो. समोर रसूल इलियास बसलेले आहेत. चेहऱ्यावर थकवा आहे. उमर त्याच्या बहिणीच्या लग्नात सहभागी होऊ शकेल का याचीच त्यांना चिंता आहे.

दिल्लीतील दंगलीच्या वेळी अनुराग ठाकूर आणि कपिल मिश्रांसारखे नेते , ज्यांनी 'देश के गद्दारों को, गोली मारो, ** को' अशा घोषणा दिल्या होत्या. ते आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांच्यावर FIR ही झाला नाही. उमर खालिद CAA विरोधात उघडपणे बोलत होता. म्हणून त्याच्याविरोधात इतक्या कठोर कलमांनुसार खटला दाखल करण्यात आला'

उमरच्या केसची कहाणीः FIR आणि साक्षीदार

उमरवर लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे रसूल म्हणतात. या प्रकरणाचा FIR जेव्हा मी बघतो तेव्हा कळते की उमरला 6 मार्च रोजी दाखल FIR क्रमांक 59/2020 नुसार अटक करण्यात आली होती. त्याच्यावर दोन समुदायांत द्वेष पसरवणे, हिंसा भडल्याने झालेले मृत्यू, पैसा उकळणे आणि कट रचण्याचे आरोप आहे.

त्याच्यावर UAPA कायद्यातील चार कलमे, हत्या आणि दंगलीपासून अतिक्रमणाशी संबंधित भारतीय दंड विधानाची 18 कलमे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान निवारण अधिनियम, 1984 ची दोन कलमे, शस्त्र अधिनियम, 1959 ची दोन कलमे यानुसार आरोप लावण्यात आले आहेत.

एका अज्ञात खबऱ्याच्या जबाबावरून उमरला आरोपी बनवण्यात आले आहे. हा जबाब गुन्हे शाखेच्या नार्कोटिक्स युनिटचे सब इन्स्पेक्टर अरविंद कुमार यांना मिळाला होता. FIR मध्ये लिहिले आहे की, या अज्ञात खबऱ्याने उमर आणि दानिश नावाचा एक व्यक्ती आणि इतर दोघांची गुप्त बैठक घडवून आणली होती.

पोलिसांच्या दाव्यानुसार नार्कोटिक्स युनिटचा एक खबऱ्या या गुप्त बैठकांत सहभागी होता. ज्यात दिल्लीत दंगल भडकावण्याचा कट रचला जात होता. UAPA लावण्याचा आधार हाच आरोप आहे. 3 डिसेंबर रोजी ज्या प्रकरणात जामीन मिळाला, त्यातही एकमेव साक्षीदार दिल्ली पोलिसांतील कॉन्स्टेबल आहे.

रसूल सांगतात की उमरवर दोन केस आहेत - पहिली FIR 101, दुसरी FIR 59. ही दोन्ही प्रकरणे दिल्लीत फेब्रुवारी 2020 मध्ये भडकलेल्या दंगलींशी संबंधित आहेत. दुसऱ्या केसमध्ये UAPA आणि आर्म्स अॅक्ट लावले आहे. यामुळेच यात कनिष्ठ न्यायालय आणि हायकोर्ट दोन्ही ठिकाणी जामीन मिळाला नाही.

उमरची सुटका का होऊ शक नाही, काय अपेक्षा आहे?

रसूल न थांबता बोलतात - 'FIR 59 च्या केसमध्ये पोलिसांनी 28 कलमे लावली आहेत. यात UAPA शिवाय इतर अनेक कठोर कलमे आहेत. सामान्य कलमांत पोलिसांना सिद्ध करायचे असते की आरोपीने गुन्हा केला आहे. मात्र UAPA मध्ये आरोपीला सिद्ध करायचे असते की तो निर्दोष आहे. पोलिसांनी पहिले आरोपपत्र साडेसतरा हजार पानांचे बनवले आहे. यानंतर पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रही तयार केले आहे.'

'पहिल्या आरोपपत्रात उमरचे नावच नाही. उमर खालिदला दिल्ली दंगलीच्या सुमारे 6 महिन्यांनंतर सप्टेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली. पोलिसांनी जे साक्षीदार तयार केले, ते अटकेच्या एक महिना आधीच मिळाले होते. पोलिसांनी जे साक्षीदार उभे केले ते पूर्णपणे बनावट आहेत. पोलिसांनी अजून त्यांचे नावही सांगितले नाही. मला विश्वास आहे की, दुसऱ्या केसमध्येही कोर्ट उमरला निर्दोष मानेल. मात्र यात उमरचे आयुष्य उध्वस्त होत आहे.' असे म्हणताना रसूल अगदी निराश होतात. ते उठून पाणी पितात.

तुरुंगात 800 पुस्तके वाचली, कैद्यांना इंग्रजी शिकवत आहे

रसूल यांना उमरविषयी प्रश्न विचारल्यावर शांतता भंग होते. ते म्हणतात, 'त्याचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय राहिले आहे. त्याने झारखंडमधील आदिवासींचे अधिका आणि भेदभावाच्या मुद्द्यावर पीएचडी केली होती. भारत सोडून परदेशात शिकायला गेला नाही, कधीही पासपोर्ट तयार केला नाही.'

'त्याला परदेशातील दोन विद्यापीठांकडून शिष्यवृत्ती मिळाली, पण त्याने नकार दिला. सरकारला वाटत असेल की 2 वर्ष तुरुंगात टाकून त्याला ते पराभूत करतील तर असा विचार करणे चूकीचे आहे. उमर त्याचा आईला नेहमी म्हणतो की, त्यांनी त्रस्त होण्याची गरज नाही.'

'उमर लहानपणापासूनच असा होता. काही चुकीचे बघितल्यावर आईला येऊन सांगायचा. 2008 मध्ये बाटला हाऊस चकमकीने उमरला मोठा धक्का बसला. तो कधीही शौकीन जीवन जगला नाही. जे खायला दिले, ते खायचा. जमीनीवर झोपायला सांगा, झोपायचा. त्यामुळे तुरुंगातील जीवनाने त्याचे धैर्य कदापिही कमी होणार नाही हे आम्हाला माहिती आहे.'

'उमरने 2 वर्षांत सुमारे 800 पुस्तके वाचली आहेत. त्याने तुरुंगात दुसऱ्या कैद्यांना इंग्रजी शिकवली आणि त्यामुळे काही कैदी त्याचे मित्र बनले आहे. त्याचे तुरुंगातील कर्मचाऱ्यांशीही चांगले संबंध आहेत. आम्ही उमरसाठी कपडे, शाल पाठवतो. तर तो दुसऱ्या गरजू कैद्यांना देतो.'

'अँटी नॅशनल'च्या कुटुंबीयांसमोरची आव्हाने

रसूल सांगतात - '2016 मध्ये JNU वाद समोर आल्यावर संपूर्ण मीडिया उमरवर तुटून पडला. तो दोन वेळा पाकिस्तानला गेला आणि त्याचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप लावण्यात आले. मी प्रतिबंधित सिमी संघटनेचा म्होरक्या असल्याचे म्हटले गेले. 2016 मधील देशद्रोहाच्या प्रकरणात कोणतीही कारवाई पुढे गेली नाही. दिल्ली दंगलीच्या दुसऱ्या प्रकरणांतही असेच होईल. लोक आता मला म्हणतात, 'हे उमर खालिदचे वडील आहेत.' मला त्याच्याच नावाने ओळखतात.'

रसूल आरोप लावतात, 'उमर खालिदवर इतका कठोर खटला यासाठीच तयार करण्यात आला आहे, कारण तो एका मुस्लीम कुटुंबातील आहे. जर तो मुस्लीम नसता तर कदाचित असे झाले नसते. पूर्ण देशात हिंदू-मुस्लीमांत फूट पाडली जात आहे.'

उमर खालिदच्या वडिलांना घरी जायचे आहे. घरात लग्नाची तयारी सुरु आहे आणि मुलगाही घरी नाही. मी निघण्यापूर्वी शेवटचा प्रश्न विचारतो. उमर कधी इस्लामिक कट्टरतेविषयी बोलला होता? रसूल याचे थेट उत्तर देत नाही.

म्हणतात, 'घरी जेव्हाही चर्चा व्हायची तेव्हा त्याचा भर बहिणींच्या शिक्षणावर असायचा. उमरच्या बहिणी सेंट स्टिफन्ससारख्या चांगल्या महाविद्यालयांतून शिकल्या आहेत. मी सच्चा मुस्लीम आहे. मला वाटायचे त्यानेही असे व्हावे. पण तो ऐकायचा नाही. मात्र त्याने कधीही चुकीचे काम केले नाही.'

बातम्या आणखी आहेत...