आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुछ दिल ने कहा:दुर्दैवी नियती... सुदैवी तारा

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२६ जुलै १९८२ रोजी दुपारी कुलीच्या शूटिंगदरम्यान, बॉबच्या व्यक्तिरेखेतील पुनीत इस्सार यांचा एक ठोसा इक्बाल कुली बनलेल्या अमिताभ बच्चन यांना असा लागला की, संपूर्ण देशाला धक्का बसला. नंतर काय झाले, काही व्यक्त, काही अव्यक्त गोष्टी...

दिनांक : २६ जुलै १९८२ ठिकाण : बंगळुरूपासून सुमारे १५-१६ किमी. म्हैसूर रोडवरील बंगलोर युनिव्हर्सिटी कॅम्पस प्रयोजन : हिंदी चित्रपट दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी या विद्यापीठात तयार केलेल्या सेटवरील शूटिंग. वेळ : जेवणाच्या सुटीनंतर दुपारी ३ ते ४ दरम्यान.

स्टंट दिग्दर्शक : जेम्स बार्ला समन्वयक : भिखू वर्मा, पप्पू वर्मा आणि टिनू वर्मा (वर्मा बंधू) दृश्य : बॉब (पुनीत इस्सार) आणि इक्बाल कुली (अमिताभ बच्चन) यांच्यातील भांडणाचे दृश्य. ‘कु ली’ चित्रपट सुरू झाल्याच्या जवळपास ०१ तास २३ मिनिटे ०६ सेकंदाने हा शॉट येतो. ज्यामध्ये खलनायक बॉब भांडणादरम्यान इक्बाल कुलीला जोरदार ठोसा मारतो. या ठोशाने भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली होती. आपला आवडता नायक अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाला असून, मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती जगभरातील हिंदी चित्रपट रसिकांना मिळाली. या घटनेचे आता इंटरनेटवर बरेच तपशील उपलब्ध आहेत, परंतु असे बरेच काही आहे आणि जे अनाकलनीय आहे ते मी आज तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन.

ठिकाण, वेळ आणि तारीख वर दिलेले आहे. हा अॅक्शन शॉट स्टंट समन्वयक पप्पू वर्मा यांनी तयार केला आहे. पहिल्यांदा पुनीत इस्सार कॅमेऱ्यााच्या उजव्या बाजूला आहेत. त्यानंतर ते अमिताभ बच्चनना फिरवतात आणि कॅमेऱ्याच्या उजव्या बाजूला आणतात आणि त्यांच्या पोटावर ठोसा मारतात. त्यानंतर दोघेही कॅमेरा अँगलच्या प्रोफाइलमध्ये येतात. मला एक सांगावेसे वाटते की, चित्रपटातील भांडण किंवा स्टंट ही एक कला आहे, एक अतिशय जोखीमपूर्ण तंत्र आहे. पुनीत इस्सार हे मार्शल आर्टमधील प्रशिक्षित कलाकार होते. जिथे या पद्धतीच्या शिक्षणादरम्यान शरीराचे अवयव, मन आणि हृदय नियंत्रित करण्याची कला अवगत असावी लागते. हा शॉट त्यांच्यासाठी चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचा पहिला शॉट होता.

शूट सुरू झाल्यावर हा प्रोफाइल शॉट असल्यानेे, मेहनती आणि लढवय्ये अमिताभ बच्चन म्हणाले की, ठोसा मला लागू दे, अन्यथा खोटे मारतो आहे असे वाटून पकडले जाऊ शकतो. त्यामुळे कदाचित अमिताभ बच्चन यांना पाठीमागे असलेल्या बोर्डामुळे तोल सांभाळता आला नसेल आणि ते एक इंच पुढे आले असतील (हा माझा अंदाज आहे). त्यानंतर जे घडले ते खूप भयंकर होते. पोटावर पुनीत इस्सार यांच्या मुष्टीचा प्रहार होताच अमिताभ जमिनीवर कोसळले. सर्वजण अवाक् आणि स्तब्ध झाले, पण काही वेळाने उठल्यावर आपल्याला तीव्र वेदना होत असल्याचे त्यांनी सांगितले. मनमोहन देसाईंनी त्यांना तातडीने हॉटेलमध्ये पाठवले. डॉक्टरही आले. जुनाट आजारांमुळे त्यांना अनेक औषधांची अ‍ॅलर्जी होती, त्यामुळे वेदना कमी करण्यासाठी त्यांना मोजकी औषधे अतिशय विचारपूर्वक दिली जात होती, परंतु त्यांचा परिणाम फारसा अनुकूल नव्हता. दुसरीकडे, प्रकरण गंभीर नसून अमिताभ लवकरच बरे होतील, या आशेने आणि विश्वासाने मनमोहन देसाईंंनी शूटिंग सुरू ठेवले. पण, २६ जुलैची संपूर्ण रात्र अमिताभ बच्चन यांना असह्य वेदना होत राहिल्या. दुसऱ्या दिवशी या वेदना आणखी असह्य होऊ लागल्यावर त्यांना ५-६ किलोमीटरवरील विवेकनगर येथील सेंट फिलेमिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी काँग्रेसची सत्ता होती. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी, अमिताभ आणि मुख्यमंत्री गुंडूराव हे बालमित्र होते. अमिताभ अशा सर्वांचे आवडते होते.

ही सगळी राजकारणी मंडळी अमिताभ यांच्या जवळची असल्यामुळे वैद्यकीय पथकाला प्रचंड तणाव आला होता. ज्याला आपण भारतीय ‘वरून येणारा दबाव’ म्हणतो. असो... तेव्हा भारत वैद्यकशास्त्रात खूप मागे होता. अल्ट्रासाउंड सोनोग्राफी प्राथमिक अवस्थेत होती. माहितीनुसार, पोटासाठीचे सीटी स्कॅन तंत्र १९९३ मध्ये भारतात आले. बराच काळ गंभीर परिस्थितीमुळे वैद्यकीय पथकाला अमिताभ यांच्या दुखण्याचे मूळ कारण समजू शकले नाही. अनेक चाचण्या करूनही नेमके निदान होऊ शकले नाही. इकडे अमिताभ यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यानंतर वेल्लोरचे डॉ. भट्ट यांना बोलावण्यात आले. क्ष-किरण अहवालात त्यांना आतड्यांमध्ये छिद्र आढळून आले आणि अमिताभ यांच्या पोटातील अंतर्गत रक्तस्रावामुळे जखमेत पस होत असल्याचे स्ूक्ष्म तपासात दिसून आले. जी शस्त्रक्रिया ७-८ तासांच्या आत व्हायला हवी होती, तिला खूप उशीर झाला असल्यामुळे होणारे परिणाम हे घातक होते. अमिताभ यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया झाली. संपूर्ण देश आपल्या लाडक्या हीरोच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत होता. अमिताभ यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ‘कोमा’त गेल्याचे समजले. संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला होता. मंदिरे, मशिदी, दर्गा, चर्च, गुरुद्वारा या ठिकाणी प्रार्थना सुरू होत्या.

नियतीच्या मनात काही वेगळेच होते. वेळ आली होती, पण काळ नव्हता आला. २ ऑगस्ट १९८२ या दिवशी वैद्यकीय पथकांच्या अखेरच्या प्रयत्नांना यश येताना दिसत होते. त्यांच्या आयुष्याची दोरी पुन्हा बळकट होत असल्याची चिन्हे दिसत होतीे. हळूहळू अमिताभ यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. संपूर्ण जगभरात आनंदाची लाट उसळली. पंतप्रधान इंदिरा गांधी भेटायला आल्या तेव्हा अमिताभ बोलू शकत नव्हते. त्यांनी बोर्डवर लिहून दाखवले, ‘माफ करा, मला बोलता येत नाहीय..’ तेव्हा इंदिराजी म्हणाल्या, ‘काही हरकत नाही बेटा, मी बोलू शकते. तू लवकर बरा होशील आणि पूर्वी जसा तुझ्या भारदस्त आवाजाने लोकांची मन जिंकायचास, अगदी तसाच बोलू लागशील.’

अपघातानंतर मनमोहन देसाई यांनी दोन दिवस बंगळुरूमध्ये शूटिंग सुरू ठेवले, परंतु नंतर संपूर्ण शेड्यूलच पॅक केले. पूर्णपणे बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी शूटिंगची तारीख दिली. मुंबईतील चांदिवली स्टुडिओमध्ये कला दिग्दर्शक ए. के. रंगराज यांनी बंगळुरूसारखाच सेट लावला आणि अमिताभ बच्चन यांनी ७ जानेवारी १९८३ पासून पुन्हा शूटिंग सुरू केले आणि आपले काम पूर्ण केले. प्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी या चित्रपटाचे संकलक होते. त्यांंनी मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेल्या या भीषण अपघाताचा ‘तो’ शॉट फ्रीझ केला होता. या लेखातील सूक्ष्म तपशिलासाठी ‘महाभारत’मध्ये दुर्योधनाची व्यक्तिरेखा साकारून प्रसिद्ध झालेले अभिनेते आणि दिग्दर्शक पुनीत इस्सार यांचा मी खूप आभारी आहे. वाचक, लेखक आणि या लेखात उल्लेख केलेले सगळे जण निरोगी, आनंदी राहोत, अशा शुभेच्छा! जय हिंद! वंदे मातरम!

बातम्या आणखी आहेत...