आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Union Minister Smriti Irani's Reaction To The Nationwide Outcry Over The Incident Of Girl Abuse In Hathras, Uttar Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाखत:उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये मुलीवरील अत्याचाराच्या घटनेवरून देशभरातील आक्रोशाबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे उत्तर, म्हणाल्या...

मुकेश काैशिक | नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात मुद्दा काहीही असो, निशाण्यावर मीच राहणार हे विजयी झाल्यापासून ठाऊक होते - स्मृती इराणी

उत्तर प्रदेशात हाथरस येथील मुलीवरील अत्याचार प्रकरण उजेडात आल्यानंतर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणींवर टीका केली जात आहे. साेशल मीडियावरही त्यांचा पाठलाग केला जाताेय. त्या आता गप्प का, असा प्रश्न केला जाताेय. निर्भया प्रकरणानंतर त्यांनी आवाज बुलंद केला हाेता. मात्र, आता एक छाेटा संदेशही दिला नाही. त्यामुळेच ‘भास्कर’ने याबाबत त्यांच्याशी थेट चर्चा केली. त्यावर स्मृती म्हणाल्या, मी निशाण्यावर येईल याचा अंदाज हाेता. स्मृतीला नवी कृषी कायद्याच्या विराेधातील आक्राेश, चीनच्या मुद्द्यावरील विराेधकांचे आराेप याबाबत प्रश्न विचारण्यात आले. या मुलाखतीमधील मुख्य अंश-

> अत्याचाराच्या विराेधात तुम्ही आवाज उठवला. आता हाथरसच्या मुलीबाबत गप्प का आहात?

उत्तर : राष्ट्रीय महिला आयाेग व उत्तर प्रदेश सरकार सातत्याने पीडितेच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. तपास सुरू आहे. त्यामुळे मी सार्वजनिक वक्तव्य करत नाही. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. गृह विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनदेखील माहिती घेतली. याप्रकरणी तत्काळ एफआयआर दाखल झाला हाेता. जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल. यूपी सरकारने एसआयटी स्थापनेची घाेषणा केली.

> निर्भया केसच्या वेळी तुम्ही तत्कालीन पंतप्रधान मनमाेहन सिंग यांना बांगड्या भेट देऊ केल्या हाेत्या. आता बांगड्या काेणाला भेट द्याल?

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधातील जनतेचा आक्रोश समजू शकते. साेशल मीडियावर मला ट्राेल करणाऱ्यांसाठी माझा काहीही संदेश नाही. देशात काहीही मुद्दा असला तरी मी निशाण्यावर असेल. अमेठीतील विजयानंतर हे स्वाभाविक हाेते. अमेठीमध्ये लढताना याची मला कल्पना हाेती.

> पीडितेवर बळजबरी अग्निसंस्कार करण्याचे वृत्त आहे?

मी तपास प्रक्रियेचा भाग नाही. मुख्यमंत्र्यांनी न्याय देण्याचा संकल्प केला आहे. पकडण्यात आलेल्या लाेकांवर त्वरित कारवाई व्हावी. निर्भया केसमध्ये न्यायासाठी अनेक वर्षे लागली. या केसमध्ये असे हाेऊ नये.

> भाजप नेतृत्वाखालील सरकारच्या काळात मुली सुरक्षित नसल्याचा राहुल गांधींचा आराेप आहे?

छत्तीसगडमध्ये पत्रकार व राजस्थानमध्ये महिलांचा छळ हाेताे तेव्हा राहुल गांधी बाेलत नाहीत. अत्याचाराच्या प्रकरणात मृत्युदंडाची तरतूद करणारे हेच सरकार आहे याची राहुल यांना कल्पना नसावी.

> कृषी विधेयक पारित करताना संसदीय प्रक्रियांचे पालन झाले नाही असा विराेधी पक्षाचा आराेप आहे?

संसदीय प्रक्रियेअंतर्गत विधेयक सभागृहात मांडण्यात आले. संख्येच्या आधारे ते पारित झाले. तेव्हा राहुल गांधी व सोनिया गांधी संसदेत नव्हते. काँग्रेसने २०१९ च्या जाहीरनाम्यात एपीएमसी अॅक्ट हटवण्याचा मुद्दा नमूद करण्यात आला हाेता.

> पंतप्रधान चीनला घाबरले असे राहुल म्हणतात. चीनचे नावही घेत नाहीत?

संसदेत विराेधी नेत्यांनी जबाबदारीने आपली भूमिका मांडली. ही गोष्ट लक्षात घेतली असती तर काँग्रेसचे हाल झाले नसते.

> चीनला काही कडक संदेश?

हा पंतप्रधान, परराष्ट्र मंत्रालयाचा विषय आहे.

> निर्भया प्रकरणानंतर कायदा कडक करण्यात आला आहे. त्यानंतरही पशुवत वागणे बंद झालेले नाही. असे का?

पाॅक्साे कायदा मांडताना देखील या मुद्द्यावर चर्चा झाली हाेती. जबाबदारी केवळ प्रशासनाची नव्हे तर कुटुंबाची, समुदाय व जागरूकतेचा प्रसार करणाऱ्या संस्थांचीदेखील आहे.

बातम्या आणखी आहेत...