आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक उपाय सुचवले आहेत. संसर्ग झाला तर डाॅक्टर आहेच. पण होऊ नये यासाठी आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्येचा वापर केला तर प्रतिकारशक्ती वाढेल आणि सगळे रोग दूर राहतील, असे आयुषचा सल्ला आहे. कोरोनावर अद्याप लस, औषध नाही. मात्र, प्रतिकारशक्ती वाढवण्याचा सल्ला सर्वच क्षेत्रातून दिला जात आहे. आता आयुष आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खेर यांनी सर्व राज्यांना पाठवलेल्या एका अध्यादेशात आयुर्वेदाच्या माध्यमातून फिट राहण्याचा सल्ला दिला आहे. अध्यादेशात ते म्हणतात,आयुर्वेदात माणसाची दिनचर्या आणि ऋतुचर्या कशी असावी हे सांगितले आहे. ही नैसर्गिक पद्धत असून वनस्पतीच्या वापराने कोरोनापासून बचाव करता येवू शकतो. आजारी पडल्यावर डॉक्टर आहेच. पण आजारीच पडू नये म्हणून आयुर्वेद आहे. अध्यादेशात योग आणि ध्यानधारणा करण्याचा सल्ला देण्यात आहे.
कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक उपाय सुचवले आहेत. संसर्ग झाला तर डाॅक्टर आहेच. पण होऊ नये यासाठी आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्येचा वापर केला तर प्रतिकारशक्ती वाढेल आणि सगळे रोग दूर राहतील, असे आयुषचा सल्ला आहे. कोरोनावर अद्याप लस, औषध नाही. मात्र, प्रतिकारशक्ती वाढवण्याचा सल्ला सर्वच क्षेत्रातून दिला जात आहे. आता आयुष आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खेर यांनी सर्व राज्यांना पाठवलेल्या एका अध्यादेशात आयुर्वेदाच्या माध्यमातून फिट राहण्याचा सल्ला दिला आहे. अध्यादेशात ते म्हणतात, आयुर्वेदात माणसाची दिनचर्या आणि ऋतुचर्या कशी असावी हे सांगितले आहे. ही नैसर्गिक पद्धत असून वनस्पतीच्या वापराने कोरोनापासून बचाव करता येवू शकतो. आजारी पडल्यावर डॉक्टर आहेच. पण आजारीच पडू नये म्हणून आयुर्वेद आहे. अध्यादेशात योग आणि ध्यानधारणा करण्याचा सल्ला देण्यात आहे.
किंचित आजारी असाल तर हे करा
> नाक चोंदले असेल तर दोन्ही नाकपुडीत शिसम अथवा खोबऱ्याचे तेल लावा > तोंडात एक चमचा शिसम अथवा खोबऱ्याचे तेल १ ते २ मिनिटे ठेवा. ते नंतर थुंकून टाका. मग कोमट पाण्याने गुळणी करा. याला ऑइल पिलिंग थेरपी असे नाव आहे > घसा बसला असेल तर पुदिन्याचे पान किंवा ओव्याच्या बिया पाण्यात टाकून वाफ घ्या > लवंग पावडर आणि मधाचे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्या > हे करूनही बरे वाटले नाही तर डॉक्टरांना दाखवा
आजारीच पडू नये म्हणून हे करा
> दररोज दिवसभर थोडे कोमट पाणी प्या > जेवणात हळद, तुळस, जिरे, धणे, लसूण, अद्रकचा वापर करा > सकाळी १० ग्रॅम च्यवनप्राश खा > दिवसभरात अनेक वेळा हर्बल टी प्या. तुळस, दालचिनी, काळीमिरी, सुंठ, मनुका, लिंबू, गूळ यांचा वापर करून आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करा > दीडशे मिलिलीटर दुधात हळद टाकून सुवर्ण दूध तयार करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.