आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सप्लेनर:नॅकची मान्यता नसल्यास 2022 पासून विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षण बंद

​​​​​​​लोकेंद्रसिंह तोमर (बिकानेर)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कठोर निर्णय नॅक मानांकन उच्च शिक्षण संस्थांसाठी आवश्यक, विद्यापीठ असतील मेंटर

पुढील सत्र २०२२ पासून २.५ किंवा त्यापेक्षा जास्त नॅक मानांकन असलेले विद्यापीठ व महाविद्यालयातच शिकवणे सुरू राहील. नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत यूजीसीने उच्च गुणवत्ता सुधारण्यासाठी कठोर नियम केले आहेत. देशभरात ९३६ विद्यापीठे व सुमारे ५१ हजारांपेक्षा जास्त महाविद्यालयांना एक वर्षाच्या आत राष्ट्रीय मू्ल्यांकन व मान्यता परिषदेची (नॅक) मान्यता घ्यावी लागेल. शिक्षण संस्थेकडे २.५ वा त्यापेक्षा जास्त नॅक मूल्यांकन नसल्यास संस्थेला पुढील वर्षापासून शिकवता येणार नाही. याबाबत यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी सर्व राज्ये व उच्च शिक्षण संस्थांना पत्र पाठवले आहे. यूजीसी नियमन २०१२ अंतर्गत उच्च शिक्षण संस्थांसाठी नॅक मान्यता अनिवार्य करण्यात आली होती. दर सहा वर्षांनी पुन्हा मान्यता घ्यावी लागते. नॅक मान्यतेसाठी अर्ज न करणाऱ्या संस्थांसाठी १६५ विद्यापीठांना मेंटर करण्यात आले आहे.

टॉप ५०० मध्ये भारतातील फक्त आठ
क्यूएस जागतिक क्रमवारी २०२१ मध्ये जगातील ५०० शिक्षण संस्थांमध्ये भारतातील फक्त ८ संस्था आहेत. आयआयटी मुंबई, २०२० च्या तुलनेत घसरण झाली. क्यूएस यादीत १७२ वे स्थान मिळाले आहे, २०२० मध्ये १५२ व्या क्रमांकावर होते. आयआयएससी बंगळुरू १८५, आयआयटी दिल्ली १९३, आयआयटी खरगपूर ३१४ व्या क्रमांकावर आहे. दिल्ली विद्यापीठाला ५०१ ते ५१० दरम्यान जागा मिळाली.

स्कोअर कार्ड, ग्रेडमधून समजा स्थिती
सात बिंदूंच्या १००० गुणांच्या आधारे स्काेअर कार्ड तयार होईल. उच्च स्काेअर ३.५१ ते ४ पर्यंत असेल आणि अशा महाविद्यालयांना ए++ ग्रेड मिळेल. ३.२६ ते ३.५० दरम्यान ए+, ३.०१ ते ३.२५ दरम्यान ग्रेड ए, २.७६ ते ३.०० दरम्यान बी++, २.५१ ते २.७५ दरम्यान बी+, २.१ ते २.५० दरम्यान ग्रेड बी, १.५१ ते २.०० दरम्यान गुण मिळवणाऱ्यांना सी ग्रेड प्राप्त होईल आणि १.५० पर्यंत स्कोअर असणाऱ्यांना डी ग्रेड दिली जाईल.

मान्यतेसाठी ७ आधार, १००० गुण
एखादे महाविद्यालय वा विद्यापीठात चांगल्या सोयी असतील तेव्हाच नॅक तेव्हाच ग्रेड देते. चांगल्या सुविधांसाठी ए++ प्राप्त होईल. ज्यांच्याकडे चांगल्या सोयी नसतील त्यांना ग्रेड चांगला मिळणार नाही. यूजीसीचा निर्णय चांगला आहे. जर महाविद्यालयाकडे चांगला ग्रेड असेल तर निधी चांगला मिळेल. यामुळे आगामी दशकात चांगले शैक्षणिक वातावरण तयार होईल. ज्यांच्याकडे ग्रेड नसेल ते पिछाडीवर जातील. विद्यार्थी तिकडे जाणार
नाहीत. -राजीव जैन, कुलगुरू, राजस्थान विद्यापीठ जयपूर

आतापर्यंत उच्च शिक्षण संस्थांना नॅक अधिस्वीकृती आवश्यक नव्हती. भारतात नॅक उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यमापन व पडताळणी करून गुण जाहीर करते. सध्या यूजीसी विविध विद्यापीठांची मिळून एक समिती स्थापन करते, ती विद्यापीठ व महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी संख्या, निकाल, संशोधनासह इतर मापदंडांच्या आधारे नॅक मूल्यांकन करायची. आता आयआयएम, आयआयटीचाही समावेश करण्यात येत आहे. यूजीसीच्या वतीने नॅक मान्यतेसाठी सात बिंदू ठरण्यात आले आहेत. यात अभ्यासक्रम, शिकणे-शिकवणे, संशोधन विस्तार, पायाभूत सुविधा, विद्यार्थी समर्थन, प्रशासकीय नेतृत्व व इनोव्हेशन बेस सरावाचा समावेश आहे. अभ्यासक्रमासाठी १५०, शिकणे-शिकवण्यासाठी २००, संशोधन विस्तारासाठी २५० गुण ठरवण्यात आहेत. उर्वरित चार बिंदूंसाठी प्रत्येकी १०० गुण ठरवण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...