आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टप्रेम, बलात्कार नंतर जिवंत जाळले:पुतण्या 2 वर्षांपासून बेपत्ता, नोकरीही मिळाली नाही; 4 आरोपी जामिनावर बाहेर

रवी श्रीवास्तव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूपीच्या उन्नावमधील ही कथा प्रेमापासून सुरू झाली आणि बलात्कारापर्यंत पोहोचली. आरोपींना अटक करण्यात आली, नंतर ते जामिनावर बाहेर आले आणि त्यानंतर 5 डिसेंबर 2019 रोजी सकाळी सार्वजनिकरित्या मुलीला जिवंत जाळण्यात आले. कथित प्रियकरासह 5 जणांना पुन्हा अटक झाली, 3 वर्षे उलटून गेली असून 4 जण जामिनावर बाहेर आहेत.

गेल्या 3 वर्षांपासून जळालेल्या मुलीच्या घराबाहेर पोलिस तैनात आहेत. पीडितेची धाकटी बहीण आपला अभ्यास आणि स्वप्ने सोडून हा खटला लढत आहे.

दुसरीकडे, आरोपींच्या बाजूने खटला लढण्याची जबाबदारी त्यांच्या बहिणी आणि मुलींनी घेतली आहे. वडील आणि भावांना वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या स्वप्नांचाही त्याग केला. या प्रकरणाचे असे रूपांतर झाले आहे, ज्यात मुलीच्या हत्येनंतर न्यायासाठी फक्त मुलीच लढत आहेत. मृत्यूपूर्वीचे शेवटचे शब्द वाचा...

मी 4 डिसेंबरला सकाळी रायबरेलीला जाण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्टेशनवर जात होते. तेव्हा शिवम त्रिवेदी, शुभम त्रिवेदी आणि काही लोकांनी मला घेरले. माझ्या डोक्यावर काठीने अनेक वार करण्यात आले, माझ्या गळ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यांनी डब्यात काहीतरी आणले होते, ते माझ्यावर ओतले आणि आग लावली. मी जीव वाचवण्यासाठी पळू लागले...' हा जबाब मुलीने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिला होता.

पीडितेला एअरलिफ्ट करून यूपीहून दिल्लीला पाठवण्यात आले. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितेच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचे सांगितले होते. 6 डिसेंबर रोजी तिचे निधन झाले.
पीडितेला एअरलिफ्ट करून यूपीहून दिल्लीला पाठवण्यात आले. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितेच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचे सांगितले होते. 6 डिसेंबर रोजी तिचे निधन झाले.

या पुढील घटना मी तुम्हाला सांगतो. जळत असलेल्या अवस्थेत मुलगी 1 किलोमीटर धावत होती. तेथे उपस्थित असलेल्या रवींद्र प्रकाश या प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले की, एका जळत्या मुलीला अशा रस्त्यावरून धावताना पाहून आपला डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. अशा स्थितीत पीडितेने 100 नंबर डायल करून पोलिसांना फोन केला.

पोलिस आले आणि 90 टक्के भाजलेल्या मुलीला जिल्हा रुग्णालयात नेले. यानंतर तिला कानपूर येथील हॅलत रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिथेही मुलीची अवस्था पाहून डॉक्टरांनी हात वर केले. यानंतर तिला एअरलिफ्ट करून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले. उपचार करण्यात आले, पण ती वाचू शकली नाही. मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्यांसह गावातील पाच जणांना अटक करण्यात आली.

सरकारी आश्वासने, संघर्ष आणि पीडित कुटुंबे

त्या दिवसाला 3 वर्षे उलटून जात आहेत. सरकारने नुकसान भरपाई तसेच कुटुंबातील एका सदस्याला घर आणि नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. यापैकी केवळ घर देण्याचे आश्वासन पूर्ण झाले. काही आरोपी आता जामिनावर बाहेर आले आहेत. बलात्कार पीडितेचा सहा वर्षांचा भाचा ऑक्टोबर 2020 पासून घरातून बेपत्ता आहे. पोलिसांकडे मदत मागितली, पण ती मिळाली नाही. आरोपी कुटुंबीयांनी त्याचे अपहरण केले असावे, अशी भीती व्यक्त होत आहे.

पीडित कुटुंबाच्या सुरक्षेसाठी दोन सशस्त्र पोलिस कर्मचारी कायम पिडितेच्या घराबाहेर तैनात असतात.
पीडित कुटुंबाच्या सुरक्षेसाठी दोन सशस्त्र पोलिस कर्मचारी कायम पिडितेच्या घराबाहेर तैनात असतात.

लखनौपासून सुमारे 70 किमी आणि बिहार पोलिस ठाण्यापासून सुमारे 8 किमी अंतरावर हिंदूनगरमध्ये जाळण्यात आलेल्या मुलीचे घर आहे. गावात प्रवेश केल्यावर डाव्या हाताला एक मंदिर दिसते. येथून सुमारे 50 पावलावर डाव्या हाताला पीडितेचे घर आहे. बंदूकधारी दोन पोलिस कर्मचारी समोरच बसले दिसतात. शेडखाली बलात्कार पीडितेचे वृद्ध वडील आपल्या नातवासह हातोडा आणि छिन्नीने लोखंडी सळई सरळ करण्यात व्यस्त आहेत.

या कुटुंबातील मोठा मुलगा, जो पूर्वी बाहेर कुठेतरी मजूर म्हणून काम करत होता, तो गावी आला आहे. या प्रकरणी बलात्कार पीडितेची लहान बहीण बाजू मांडत आहे. घरात छोटे अंगण असून तुळशीचे रोप लावलेले आहे. मागे पक्के घर आहे. उरलेल्या तिन्ही बाजू छपराने झाकलेल्या आहेत.

एकीकडे बलात्कार पीडितेची वहिनी पाट्यावर चटणी वाटत आहे. मला आत जाताना पाहताच कुटुंबाच्या सुरक्षेत तैनात असलेला एक पोलिस येऊन आत बसतो. बलात्कार पीडितेची धाकटी बहीणही येते आणि माहिती सांगू लागते-

'वडील शेतात तर भाऊ परेदशात मजूरी काम करात होते. आपणही मदत केली पाहिजे, यासाठी आम्ही दोन्ही बहिणींनी अभ्यासात बराच वेळ घालवला. मला आणि माझ्या बहिणीला पोलिसात भरती व्हायचे होते. तशी शारीरिक तयारीही करत होतो. हे सर्व 2017 पासून सुरू झाले.

शिवम त्रिवेदी आमच्या घरी यायचा. त्याचे दीदी सोबत प्रेमसंबंध होते. हा प्रकार त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आम्हाला धमकावले. तरी शिवमने माझ्या बहिणीशी बोलणे सोडले नाही. डिसेंबर 2017 मध्ये लग्नाचे आश्वासन देऊन शिवम दीदीला रायबरेलीला घेऊन गेला. तेथे त्याने दीदीवर बलात्कार केला.

घरच्यांचा दबाव वाढल्यावर दोघेही गावी परतले. यानंतर शिवमने दीदीशी बोलणे बंद केले. माझी पाठ सोडली नाही तर तुझे अश्लील व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी तो देऊ लागला. वडिलांनी बहिणीला रायबरेलीत मावशीच्या घरी पाठवले.

तरी शिवम शांत झाला नाही त्याने दीदीला रायबरेलीतील एका मंदिरात भेटायला बोलावले. येथे गावप्रमुखाचा मुलगा शिवम आणि शुभम यांनी दीदीवर सामूहिक बलात्कार केला. आम्ही 2018 मध्ये रायबरेलीच्या लालगंज पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. ज्या दिवशी तिला जिवंत जाळण्यात आले, त्याच दिवशी ती याच केसची बाजू मांडण्यासाठी रायबरेलीला जात होती.

हे सांगताना पीडितेच्या बहिणीचा चेहरा स्थब्ध झालेला दिसतो. कदाचित तिने ही गोष्ट इतक्या वेळा आणि इतक्या लोकांना सांगितली असेल की, आता तिचा राग आणि भावना तिच्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी खुंटल्या असतील.

काही उध्वस्त झालेले आयुष्य आणि हरवलेले मूल ज्याला कोणीच शोधत नाही

मला हे सर्व सांगताना, पीडितेची बहीण डिसेंबर 2019 च्या त्या सकाळी पोहोचते, जेव्हा तिने तिच्या मोठ्या बहिणीचा जळालेला मृतदेह पहिल्यांदा पाहिला असेल. ती पुन्हा भानावर येते, आणि बालू लागते, 'जेव्हापासून माझ्या बहिणीचा खून झाला, तेव्हापासून माझं आयुष्य बदललं. कधी उन्नाव तर कधी रायबरेलीला जावे लागते केसची बाजू मांडण्यासाठी. दर महिन्याला पाच ते आठ वेळा कोर्टात तारीख असते.

येता-जाता कधी-कधी वाटते कुणीतरी पाठलाग करत आहे. यावर पोलिसांचा विश्वास बसत नाही. पोलिसही आता माझ्या भाच्याला शोधत नाहीत. मी ग्रॅज्युएशन केले आहे. पोलिस दलात भरती होण्याचे माझे स्वप्न होते. आता ते कधीच पूर्ण होणार नाही. आरोपींना जलदगती न्यायालयाकडून लवकरच शिक्षा होईल, असे सरकारने म्हटले होते. तीन वर्षे उलटून गेली आणि अजूनही माझी साक्ष चालू आहे.

आरोपी तर जामिनावर बाहेरही आले. मला माझ्या आई-वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तीन वर्षांत घरात तीन मोठे अपघात झाले. माझ्या बहिणीला मारले गेले. पुतण्या अजून जिवंत आहे की नाही, याची शाश्वती नाही. या त्रासात माझा धाकटा भाऊ आजारी पडला. त्याचाही मृत्यू झाला. मी प्रत्येकाला गमावत आहे आता माझ्या आयुष्याचे एकच उद्दिष्ट आहे दोषींना शिक्षा करणे.

पोलित तर विसरलेही, आम्ही किती शोधणार

पीडितेची बहीण गप्प बसली तर मागून वहिनीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ही तीच आई आहे जिचे 6 वर्षाचे मूल बेपत्ता झाले आहे. आता त्याला कोणी शोधत नाही. निळ्या साडीत बसलेली, आई रडते आणि म्हणते- 'आता माझ्या मुलाला जिवंत पाहण्याची सर्व आशा संपली आहे.

2 ऑक्टोबर 2020 रोजी तो दुपारचे जेवण करून खेळण्यासाठी बाहेर गेला. संध्याकाळचे 4 किंवा 5 वाजले होते. खेळता खेळता तो घरापासून काही अंतरावर असलेल्या दुकानात गेला. तेव्हापासून त्याला कोणीही पाहिले नाही. दोन वर्षे झाली. पोलिसांनी शोध घेणे थांबवले आहे, फक्त आम्ही शोध घेत आहोत. किती दूर शोधायचे आता कुठे असेल माहीत नाही.'' एवढे बोलून ती पुन्हा रडायला लागते, मग उठते आणि घरात जाते.

पीडितेची वहिनी तिच्या बेपत्ता मुलाचा फोटो पाहत राहते. तिचा मुलगा बेपत्ता होऊन दोन वर्षे झाली आहेत, असे त्या सांगतात. आता त्याला भेटण्याची आशाही संपली आहे.
पीडितेची वहिनी तिच्या बेपत्ता मुलाचा फोटो पाहत राहते. तिचा मुलगा बेपत्ता होऊन दोन वर्षे झाली आहेत, असे त्या सांगतात. आता त्याला भेटण्याची आशाही संपली आहे.

पीडितेचे वडील शेजारीच बसले आहेत. कदाचित बाहेरील लोखंडी सळई सरळ करण्याचे काम संपले असेल. किंवा सुनेला रडताना पाहून ते आत आले असतील. ते नाराजीने सांगतात- 'सरकारने सांगितले होते की शिक्षा लवकरच होईल, पण ते बाहेर आले आहेत. माझ्या नातवाचे अपहरण झाले आहे. हे सगळं संपल्यावर मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. ती गेली तर हा खटला कोण लढवणार.

शेजारी बसलेल्या पीडितेची आई म्हणते- 'सरकारने आश्वासने दिली होती, पण आजतागायत मुलीला नोकरी मिळाली नाही. आमचा नातूही आमच्यापासून दूर गेला. निदान पोलिसांनी तरी त्याचा शोध घ्यावा. त्यांच्याही डोळ्यात अश्रू येऊ लागतात. त्यानंतर सगळे शांत होतात, जणू त्यांची कहाणी इथपर्यंतच होती. आता सांगायला दु:ख उरले नाही. मी निघालो तेव्हा मला म्हणाले की, तुम्ही आमची मागणी वरपर्यंत घेऊन जा. मी त्यांना दिलासा देत घरातून बाहेर पडलो.

दुसरे जग आणि दुसरे दु:ख म्हणजेच दुसरी बाजू

बलात्कार पीडितेचे घर सोडल्यानंतर मी आरोपींच्या घराकडे वळतो. पीडितेच्या घरापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर उजव्या हाताला रस्त्यावर गेल्यावर एका रांगेत शेजारी आरोपींची घरे आहेत. पीडितेला जाळून मारल्याचा आरोपी हरिशंकर त्रिवेदी यांना मी प्रथम भेटतो. ते या गावाचे प्रमुखही राहिले असल्याची माहिती चर्चेदरम्यान मिळाली. ही घटना घडली तेव्हा त्यांची पत्नी गावाची प्रमुख होती.

आमच्यावर आरोप करणाऱ्या कुटुंबाला आम्ही बरीच मदत केल्याचे हरिशंकर सांगतात. 5 डिसेंबर 2019 रोजी सकाळी मी घरी झोपलो होतो. त्यानंतर पोलिस घरात घुसले आणि माझा मुलगा शुभमला घेऊन गेले. आम्ही पोलिस ठाण्यात पोहोचलो तेव्हा आम्हाला काहीही सांगण्यात आले नाही.

दुपारी आम्हाला सांगण्यात आले की तुम्हा लोकांवर मुलीला जाळून मारल्याचा आरोप आहे. यानंतर आम्हांला, आमचा मुलगा, शेजारी उमेश बाजपेयी आणि शिवम, जो आधीच बलात्कार प्रकरणात आरोपी आहे, त्याचे वडील रामकिशोर यांना तुरुंगात टाकण्यात आले. काही दिवसांपूर्वी शिवमला सोडल्यानंतर 29 महिन्यांनी आम्हाला जामीन मिळाला.

मुलीची हत्या झाली, आता दोन्ही बाजूंनी फक्त मुलीच लढतायेत खटला

मी आरोपी हरिशंकर यांच्याशी बोलत असताना त्यांची मोठी मुलगी ऋचा त्रिवेदी आणि उमेश बाजपेयी यांची बहीण प्रीतीही तेथे आल्या. घरातील सर्व पुरुष तुरुंगात गेल्यावर घर चालवण्याची, खटले लढवण्याची जबाबदारी या मुलींनी सांभाळली हे मला इथे कळलं.

हत्येप्रकरणी आरोपी उमेश बाजपेयी यांची बहीण प्रीती आणि हरिशंकर यांची मोठी मुलगी ऋचा त्यांच्या भाऊ आणि वडिलांची बाजू मांडत आहेत.
हत्येप्रकरणी आरोपी उमेश बाजपेयी यांची बहीण प्रीती आणि हरिशंकर यांची मोठी मुलगी ऋचा त्यांच्या भाऊ आणि वडिलांची बाजू मांडत आहेत.

हरिशंकर त्रिवेदी यांचे वय सुमारे 52 वर्षे आहे. घरात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा शुभम आहे. शुभम हा बलात्कार आणि जिवंत जाळण्याच्या प्रकरणातील आरोपी आहे. हरिशंकर हे स्वतः जाळपोळ प्रकरणातील आरोपी आहेत. बोलता बोलता ऋचा रडायला लागली. मग अश्रू पुसत ती म्हणते-

'माझे वडील आणि भाऊ तुरुंगात गेल्यानंतर मी घरात सर्वात मोठी होते. मला स्वतःची काळजी घ्यावी लागली, मला माझ्या आईची काळजी घ्यावी लागली, मला माझ्या बहिणींना शिकवावे लागले. वकिलांनी आमची बाजू मांडण्यास नकार दिला. तेव्हा मी माजी आमदार हृदय नारायण दीक्षित यांच्याकडे गेले होते. त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली, पण आमचे कोणीही ऐकत नव्हते. सगळे म्हणायचे, तुझा भाऊ बलात्कारी आहे. तुझा बाप गुन्हेगार आहे. मला अभ्यास करून शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती.

मी बेसिक ट्रेनिंग सर्टिफिकेट (BTC) केले आहे. TET परीक्षा द्यायची होती, पण देता आली नाही. याआधी मी कधीच एकटी गावाबाहेर गेले नव्हते, पण वडिलांसाठी आणि भावासाठी गावातून लखनऊ, उन्नाव आणि रायबरेलीला एकटीच गेले. धरणे आंदोलन देखील करावे लागले. मला इतके सहन करावे लागेल असे कधीच वाटले नव्हते. आता माझ्या भावाची आणि वडिलांची सुटका झाल्यामुळे मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेन, हे सांगताना ऋचा आपले अश्रू पुसते.

प्रीतीही जवळच आहे. ऋचानंतर ती सांगते की, भाऊ उमेश बाजपेयीलाही बलात्कार पीडितेला जाळून मारल्याबद्दल तुरुंगात पाठवण्यात आले होते. कुटुंबातील सर्व पुरुष तुरुंगात गेल्याने तीने देखील ऋचा सोबत त्यांची बाजू मांडली.

ती सांगते- आम्ही सकाळी घरातून निघायचो आणि कधी 10 पर्यंत परतायचो, तर कधी रात्री 11 पर्यंत. भाऊ तुरुंगात गेल्याने घरात आर्थिक अडचण निर्माण झाली होती. घरात कमावणारा तो एकटाच होता, त्यामुळे लोकांसमोर हात पसरावे लागले.

शिवमला जामीन मिळाला नाही, कुटुंबीयांनी बोलण्यास दिला नकार

या दोन्ही प्रकरणातील मुख्य आरोपी शिवम त्रिवेदीला अद्याप जामीन मिळालेला नाही. हरिशंकर यांच्या घरापासून त्यांचे घर दहा पावलांच्या अंतरावर आहे. मी शिवमच्या आईला भेटलो. आम्हाला याबाबत कोणाशीही बोलायचे नाही, असे त्यांनी सांगितले. मी प्रयत्न केला तरी, त्यांनी पुन्हा ठामपणे नकार दिला.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मला पोलिसांकडून याबाबत जाणून घ्यायचे आहे. दोन्ही प्रकरणे आपापल्या जागी आहेत, पण पोलिस पीडितेच्या भाच्याचा शोध का घेत नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात होता. मी एसपी सिद्धार्थ शंकर मीणा यांना विचारले असता त्यांनी कॅमेऱ्यावर काहीही बोलण्यास नकार दिला.

ही दोन्ही प्रकरणे न्यायालयात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलाबाबत त्यांचे म्हणणे आहे की, हिंदुनगरमधून एक मूल बेपत्ता असल्याची त्यांना माहिती आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पथके त्याचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...