आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Untold Unlock | Neither Knew The Word Lockdown, Nor Corona ... The Doctor's Big Fear; All They Knew Was That The Vehicles Were Closed

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:ना लॉकडाऊन शब्द माहीत होता, ना कोरोना... त्यातच डॉक्टरची मोठी भीती; वाहने बंद आहेत एवढेच त्यांना ठाऊक होते

प्रदीप राजपूत2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊसतोडीला परराज्यात, परजिल्ह्यात स्थलांतरित होणारे येथील छगनसारखे आदिवासी यंदा होळीला गावी आले ते कोरोनाची हाळी घेऊनच. मनमुरादपणे हसत छगन बारेला म्हणाले ‘काेराेना से काेन डरता हैं, बस डरताे कुदरत से लगता हैं’ असे म्हणत त्यांनी पठारावर नुकतेच पेरणी केलेले शेत इशाऱ्यानेच दाखवले.

नुकत्याच झालेल्या वादळाने त्यांचा मका काेसळून पडला हाेता. त्यावरच आता शेळ्या चरत हाेत्या. गेल्या आठवड्यात ज्वारी, भुईमूग, उडीद, मूग, कापसाची पेरणी केलेल्या शेतात जमिनीतून मातीची खपली डाेक्याने बाहेर लाेटणारे अंकुर पाण्याची प्रतीक्षा करीत होते.

वाहने बंद आहेत एवढेच त्यांना ठाऊक होते

गावातल्या आदिवासींना ना कोरोना शब्द माहीत होता, ना लॉकडाऊन. आजारामुळे शेजारच्या गावापर्यंत येणारी वाहने बंद आहेत एवढेच त्यांना ठाऊक होते. शेजारच्या गावात येऊ देत नाहीत अशा तक्रारी ते रामसिंगकडे करीत होते.

गंभीर रुग्णांचा झोळीतून प्रवास

रुग्णाची प्रकृती गंभीर झाली तर झोळीतूनच दवाखान्यात न्यावं लागते. अशा संकटात असतानाच सध्या डॉक्टर उभंच करीत नसल्याचे हे सांगतात. थेट शहरात पाठवतात. तिथे पंधरा दिवस डांबून ठेवतात, मरेपर्यंत सोडत नाहीत असा यांचा समज. परिणामी घरीच उपचार करण्यावर भर. पहाटे साडेपाच वाजताच एक महिला तीन वर्षांच्या लेकराला घेऊन रूपसिंगकडे आली होती. तिला रात्रभर जुलाब उलट्या सुरू होत्या.

मुलाला घेऊन थेट घराचा रस्ता

फाटून जाळी झालेली बनियन घातलेला मन्नू बारेला ९ वर्षांच्या मुलाला शालमध्ये गुंडाळून घेऊन आला. तापात झटका आल्याने ताे खाली पडून जखमी झाला हाेता, हाताच्या मुठी बांधून त्याची दातखिळी बसली हाेती. रूपसिंगने मन्नूला तातडीने डाॅक्टरकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. परंतु मन्नूच्या मनात दवाखान्याची आणि डॉक्टरांची भीती होती. गस्तीवर आलेल्या वनरक्षकाने शेजारच्या अहिरवाडीत काेराेनाचा रुग्ण सापडल्याची माहिती दिली. मन्नूने मुलाला खांद्यावर घेऊन थेट घराचा रस्ता धरला.  

बातम्या आणखी आहेत...