आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरअमेरिका-चीनमध्ये एकदाच झाली थेट लढत:कोरियन युद्धात लाखो चिनी सैनिकांसमोर अमेरिकेने काढला पळ

अनुराग आनंद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर 1950 मध्ये कोरियन युद्ध सुरू होऊन चार महिने उलटले होते. यूएस एअर फोर्सचे बी-29 आणि बी-51 बॉम्बर उत्तर कोरियामध्ये हल्ला करत होते. उत्तर कोरियाच्या सैन्याला मागे ढकलत अमेरिकन सैन्य यालू नदीच्या काठापर्यंत पोहोचले होते.

चीनच्या सीमेवर पोहोचण्याची ही अमेरिकन लष्कराची खेळीच होती. यानंतर सुरू झाली या युद्धाची खरी कहाणी. जेव्हा चीनचे सर्वात मोठे नेते माओ त्से तुंग यांच्या सांगण्यावरून एकाच वेळी 2 लाखांहून अधिक चिनी सैनिकांनी युद्धात उडी घेतली. यानंतर युद्धाचे संपूर्ण चित्र बदलले आणि अमेरिकेला पळ काढावा लागला.

आज चीन आणि अमेरिका तैवानच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. याआधी या दोन महासत्तांमध्ये एकदाच युद्ध झालेले आहे. आजच्या 'दिव्य मराठी एक्स्प्लेनर'मध्ये आम्ही त्या 72 वर्षांपूर्वाच्या भयंकर युद्धाची संपूर्ण कहाणी सांगत आहोत…

प्रथम हे छायाचित्र पाहा...

हे छायाचित्र ऐतिहासिक आहे. केवळ जुन्या पद्धतीचे किंवा 'ब्लॅक अँड व्हाइट' असल्याने नव्हे तर हे छायाचित्र एका युद्धाची संपूर्ण कथा सांगणारे असल्यामुळे ते महत्त्वाचे आहे. दुसर्‍या महायुद्धात जपानच्या पराभवानंतर जेव्हा सोल शहराच्या मध्यभागी असलेला जपानचा ध्वज कोरियाने हटवला होता. हे छायाचित्र त्यावेळचे म्हणजे 9 सप्टेंबर 1945 रोजीचे आहे. (फोटो क्रेडिट्स: @nytimes.com)

कोरियन युद्धात अमेरिकेची थेट चीनशी टक्कर

25 जून 1950 रोजी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला केला. या हल्ल्याने जगातील बलाढ्य देश दोन गटात विभागले गेले. एका बाजूला चीन आणि सोव्हिएत रशिया उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट सरकारच्या पाठीशी उभे होते. तर दुसरीकडे अमेरिका आणि युरोपीय देश दक्षिण कोरियाच्या पाठीशी होते.

Encyclopdia Britannica नुसार, या तीन वर्षांच्या युद्धात दोन्ही बाजूंनी 2.8 दशलक्षाहून अधिक नागरिक आणि सैनिक मारले गेले किंवा नंतर त्यांचा ठिकाणा लागला नाही.

तुम्ही विचार करत असाल की, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये लढाई झाली होती, मग चीन आणि अमेरिका या देशांनी युद्धात उडी का घेतली?

ही गोष्टही सांगेन, पण त्याआधी हे युद्ध कसे सुरू झाले ते वाचा…

1904 पूर्वी, एका बेटावर कोरियन साम्राज्याचे राज्य होते. लोक त्याला कोरिया म्हणून ओळखत होते. जपान आणि चीन यांच्यात 1894-95 आणि 1904-05 मध्ये कोरियाच्या ताब्यासाठी भयानक युद्धे झाली. या युद्धानंतर कोरियावर जपानने ताबा मिळवला.

1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला. युद्ध संपल्यानंतर तेथील जनतेला न विचारता जगातील दोन बलाढ्य देशांमध्ये कोरियाची विभागणी करण्यात आली. या दोन भागासाठी, 38 अंश अक्षांश ही विभाजक रेषा म्हणून मान्य करण्यात आली. उत्तरेकडील भाग सोव्हिएत संघाच्या ताब्यात गेला आणि दक्षिणेकडील भाग अमेरिकेच्या ताब्यात गेला.

युद्धानंतर कोरियाचे दोन भाग कसे झाले, या नकाशावरून समजून घ्या.

कोरियाची फाळणी सोप्या भाषेत स्पष्ट करण्यासाठी आम्ही या ग्राफिक्सचा वापर केला आहे. हा नकाशा प्रतीकात्मक आहे.
कोरियाची फाळणी सोप्या भाषेत स्पष्ट करण्यासाठी आम्ही या ग्राफिक्सचा वापर केला आहे. हा नकाशा प्रतीकात्मक आहे.

यानंतर दक्षिण भागात 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या, पण उत्तर भागात निवडणुका घेण्यास नकार दिला. यामुळे प्रदेशांमध्ये स्वतंत्र कोरियन सरकारे निर्माण झाली.

डाव्यांविरुद्ध विचारांची लढाई बनले युद्धाचे कारण

दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या दिवसांमध्ये, मित्र राष्ट्रांमध्ये असे ठरले होते की, जपानी शरणागतीनंतर, सोव्हिएत सैन्याने उत्तर कोरियाच्या उत्तरेकडे राहायचे, तर संयुक्त राष्ट्रांचे सैन्य या रेषेच्या दक्षिणेकडे लक्ष राहिल.

यानंतर उत्तर कोरियामध्ये कोरियन कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाचे सरकार स्थापन झाले. त्याच वेळी, दक्षिण कोरियामध्ये लोकशाही मार्गाने नेते सिंगमन री यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. सिंगमन री यांचा साम्यवादी विचारांना विरोध होता. त्यांना ही विचारधारा आपल्या देशात पसरण्यापासून रोखायची होती. त्यामुळे 25 जून 1950 रोजी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला केला.

हातात दुर्बीण घेतलेल्या या चित्रात दिसणार्‍या लष्करी अधिकाऱ्याचे नाव होते जनरल डग्लस मॅकआर्थर. दुसऱ्या महायुद्धानंतर ते त्यांचा देश अमेरिकेत हिरो बनले होते. कोरिया युद्धाची कमानही त्यांच्या खांद्यावर दिली गेली होती.

अमेरिकन सैन्यातील अधिकारी जनरल मॅकआर्थर यांचे नेतृत्त्व

कोरियात युद्ध सुरू होताच आता जगाच्या नजरा संयुक्त राष्ट्रांवर खिळल्या. अमेरिकेने यूएनमधील मतदानावर दबाव आणला आणि दक्षिण कोरियाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली.

दुसऱ्या महायुद्धात जपानला शरणागती पत्करायला लावणारे अमेरिकन जनरल मॅकआर्थर यांच्या नेतृत्वाखालील सैन्यदल कोरियात पोहोचले. अमेरिकन लढाऊ विमाने धोकादायक नेपलम बॉम्बसह हल्ला करू लागले. या नेपलम बॉम्बमध्ये धोकादायक रसायनांचा वापर करण्यात आला होता. या रसायनामुळे माणसाचे शरीर हवेत विरघळल्यासारखे नष्ट होते.

अमेरिकन सैन्याच्या उग्र रूपाने चीनला घाबरला, ड्रॅगनने घेतली युद्धात उडी

सुरुवातीच्या टाळाटाळानंतर चीनने उघडपणे उत्तर कोरियाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांनी अद्याप अमेरिकेविरुद्ध सैन्य उतरवले नव्हते. सोव्हिएत युनियनही उत्तर कोरियाला शस्त्रे पुरवत होता.

यूएस आर्मी बी-29 आणि बी-51 बॉम्बरने उत्तर कोरियातील गावे उद्ध्वस्त करत होती. जानेवारी 1951 पर्यंत, अमेरिकन सैन्याने उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट सैन्याला केवळ 38 पॅरललच्या मागे ढकलले नाही तर अमेरिकेचे सैन्य यालू नदीच्या काठावरही पोहोचले. यालू नदी चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेवर आहे. अशा स्थितीत जनरल डग्लस मॅकआर्थर आपल्या सैन्यासह चिनी हद्दीत घुसू शकतो अशी भीती ड्रॅगनला वाटू लागली.

कोरियन युद्धात B-29 बॉम्बरने केलेला विध्वंस जग कधीही विसरणार नाही. या विमानांमधून नापाम सारखे धोकादायक बॉम्ब टाकले जात होते.
कोरियन युद्धात B-29 बॉम्बरने केलेला विध्वंस जग कधीही विसरणार नाही. या विमानांमधून नापाम सारखे धोकादायक बॉम्ब टाकले जात होते.

चीनच्या या भीतीने त्याला उघडपणे युद्धात उतरण्यास भाग पाडले. अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी चिनी हवाई दलाने मिग-15 लढाऊ विमाने युद्धात उतरवली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, मिग लढाऊ विमानांनी अमेरिकन सैन्याचे दिवसाचे हल्ले जवळपास थांबवले होते.

चिनी सैन्याच्या हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याला माघार घ्यावी लागली

या युद्धात लढण्यासाठी चीनकडे आधुनिक शस्त्रे नव्हती. अवघ्या वर्षभरापूर्वी तिबेट आणि चीनमधील युद्ध संपले होते. मॅकआर्थरच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सैन्य चीनच्या दिशेने जात होते, त्यामुळे चीनचे सर्वात मोठे नेते माओ यांनी संकेत मिळताच 2 लाखांहून अधिक चिनी सैनिकांनी अचानकपणे अमेरिकन सैनिकांवर हल्ला केला. त्यांचा हल्ला इतका आक्रमक होता की अमेरिकन सैन्याला माघार घ्यावी लागली.

यानंतर, यूएस आर्मी 38 पॅरलल येथे थांबली, जी दोन्ही देशांची सीमा होती. तेव्हापासून 10 जुलै 1951 रोजी युद्धविरामाची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यावेळी त्यात यश आले नाही.

कोरियन युद्धाच्या काळात नापाम सारखे धोकादायक बॉम्ब टाकल्यानंतरचे हे छायाचित्र आहे. हे कृष्णधवल चित्र बघूनही तुम्ही त्या भयानक युद्धाची आणि त्याचा मानवतेवर होणारा परिणाम याची कल्पना करू शकता.
कोरियन युद्धाच्या काळात नापाम सारखे धोकादायक बॉम्ब टाकल्यानंतरचे हे छायाचित्र आहे. हे कृष्णधवल चित्र बघूनही तुम्ही त्या भयानक युद्धाची आणि त्याचा मानवतेवर होणारा परिणाम याची कल्पना करू शकता.

चिनी सैन्याच्या प्रत्युत्तरावर डग्लस मॅकआर्थर संतापले

चिनी सैन्याच्या या प्रत्युत्तरामुळे अमेरिकन लष्कराचे सर्वोच्च अधिकारी डग्लस मॅकआर्थर हे संतापले होते. चीन अचानक एवढी कडवी झुंज देईल, असे त्यांना वाटले नव्हते. दुसऱ्या महायुद्धानंतर डग्लस मॅकआर्थर अमेरिकेत नायक म्हणजेच हिरो बनले होते. त्यामुळेच मॅकआर्थरने चीनच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अणुबॉम्ब वापरण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेच्या राष्ट्रपतींना याची माहिती मिळताच त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

यानंतर जनरल मॅकआर्थर यांना अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रूमॅन यांनी युद्धादरम्यान राष्ट्रपतींना न विचारता मोठे निर्णय घेतल्याबद्दल बडतर्फ केले.

हे छायाचित्र युद्धादरम्यान शरण आलेल्या कोरियन सैनिकांचे आहे, ज्यांना युद्धकैदी बनवण्यात आले होते. तसेच दोन्ही बाजूंच्या लाखो सैनिकांना युद्धकैदी बनवण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वाखाली युद्धकैद्यांची सुटका करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पर्यवेक्षण पथकाची जबाबदारी भारतीय लष्करातील एक अधिकारी जनरल थिमय्या यांच्यावर सोपवण्यात आली होती.

1953 मध्ये अमेरिकेला नवे राष्ट्रपती मिळताच युद्ध संपले

जुलै 1953 मध्ये ड्वाइट डेविड आयजनहावर हे अमेरिकेचे राष्ट्रपती झाले. युद्ध संपवण्यासाठी अण्वस्त्रांचा वापर करावा लागला तरी करू असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यानंतर सर्व पक्षांनी 27 जुलै 1953 रोजी करारास सहमती दर्शविली. पुन्हा एकदा युद्धापूर्वी असलेली 38 पॅरलल ही सीमा निश्चित झाली.

बातम्या आणखी आहेत...