आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरचीनच्या धमकीनंतर अमेरिकेची माघार?:पॅलोसी यांच्या दौऱ्यात तैवानचा उल्लेखही नाही

आदित्य द्विवेदी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सभापती नॅन्सी पॅलोसी यांच्या आशिया दौऱ्यात तैवानचा उल्लेख नाही. या दौऱ्याच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, त्या केवळ उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जपानला भेट देतील. पॅलोसी तैवानला जात असल्याच्या वृत्तानंतर चीनने त्यांचे विमान हवेतूनच खाली पाडण्याची धमकी दिली होती.

नॅन्सी पॅलोसी या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात शक्तिशाली राजकारणी मानल्या जातात. चीनच्या धमकीनंतर तैवानमध्ये न जाण्याचा पॅलोसी यांच्या निर्णयामुळे अमेरिकेवरील विश्वासाला तडा देणारा ठरू शकतो.

सर्वप्रथम जाणून घेऊया या संदर्भात तज्ञांचे मत…

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर अ‍ॅडवर्ड जोसेफ यांच्या मते, 'पॅलोसी यांनी स्पष्ट केले आहे की, त्या तैवानला जाणार नाही, मात्र या संपूर्ण प्रकरणात चीनची प्रतिक्रिया मान्य केली जाऊ नये. माझ्या मते अमेरिकन अधिकाऱ्यांनी तैवानमध्ये जाऊन अमेरिका आपला मित्र असल्याचे दाखवून द्यावे.

प्रोफेसर हर्ष पंत यांच्या मते, 'जर पॅलोसी तैवानला गेल्या नाहीत, तर भविष्यात अमेरिकेवर विश्वास ठेवावा की नाही, यावर तैवानसाठी संकेत असतील. अमेरिकेने माघार घेतल्याने तैवानकडे कोणताही पर्याय उरणार नाही.

दैनिक दिव्य मराठी एक्सप्लेनमध्ये आम्ही तुम्हाला तैवानची संपूर्ण कहाणी सांगत आहोत आणि 23 दशलक्ष लोकसंख्या असलेले हे बेट जगातील दोन महासत्तांमधील भांडणाचे कारण का बनत आहे? तेही सांगणार आहोत.

चीनच्या मते तैवान हा त्यांचाच एक प्रांत आहे. तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो. हा लढा समजून घेण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जावे लागेल. त्यावेळी चीनच्या मुख्य भूमीवर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना आणि कुओमिंतांग यांच्यात युद्ध सुरू होते.

1949 मध्ये माओ झेडोंग यांच्या नेतृत्वाखाली चिनी कम्युनिस्ट पक्षाचा विजय झाला आणि कुओमिंतांग लोक मुख्य भूभाग सोडून तैवानमध्ये गेले. कम्युनिस्टांची नौदल ताकद नगण्य होती. त्यामुळे माओच्या सैन्याला समुद्र ओलांडून तैवानवर ताबा मिळवता आला नाही.

चीनचा दावा आहे की, 1992 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना आणि तैवानच्या कुओमिंतांग पार्टीमध्ये एक करार झाला होता. त्यानुसार, दोन्ही बाजू वन चायनाचा भाग आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी एकत्र काम करतील. तथापि, कुओमिंतांगचा मुख्य विरोधक, डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, 1992 च्या करारास कधीच सहमत झाला नाही.

शी जिनपिंग यांनी 2019 मध्ये तैवानचे चीनमध्ये विलीनीकरण करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी त्यांनी 'एक देश दोन व्यवस्था'चे सूत्र दिले. तैवानला हे मान्य नाही आणि त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व हवे आहे.

अमेरिका-चीन संबंधातील तैवान सर्वात मोठा फ्लॅश पॉइंट

अमेरिकेने 1979 मध्ये चीनशी संबंध पूर्ववत केले आणि तैवानशी राजनैतिक संबंध तोडले. मात्र, चीनच्या आक्षेपानंतरही अमेरिकेने तैवानला शस्त्रपुरवठा सुरूच ठेवला. अमेरिकेनेही अनेक दशकांपासून एक चीन धोरणाचे समर्थन केले आहे, परंतु तैवानच्या मुद्द्यावर अस्पष्ट धोरण स्वीकारले आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन सध्यातरी या धोरणातून बाहेर पडताना दिसत आहेत. चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका त्यांच्या मदतीला येईल, असे त्यांनी अनेक प्रसंगी सांगितले आहे. शस्त्रास्त्रांची विक्री सुरू ठेवत बायडेन यांनी तैवानशी अमेरिकन अधिकाऱ्यांचे संबंध वाढवले.

याचाच परिणाम असा झाला की, चीनने तैवानच्या हवाई आणि जलक्षेत्रात आक्रमकपणे घुसखोरी सुरू केली. NYT मधील अमेरिकन विश्लेषकांवर आधारित अहवालानुसार, चीनची लष्करी क्षमता इतकी वाढली आहे की, तैवानच्या संरक्षणात अमेरिकेच्या विजयाची शाश्वती नाही. चीनकडे आता जगातील सर्वात मोठे नौदल आहे आणि अमेरिका तेथे मर्यादित प्रमाणात जहाजे पाठवू शकते.

जर चीनने तैवानवर कब्जा केला तर तो पश्चिम पॅसिफिक महासागरात आपले वर्चस्व दाखवू लागेल. यामुळे गुआम आणि हवाई बेटांवरील अमेरिकन लष्करी तळालाही धोका निर्माण होऊ शकतो.

नॅन्सी पॅलोसी यांची नेहमीच चीनवर टीका, यावेळी काय होणार?

थियानमेन स्क्वेअर येथे पॅलोसी आणि सहकाऱ्यांनी बॅनर फडकवले होते.
थियानमेन स्क्वेअर येथे पॅलोसी आणि सहकाऱ्यांनी बॅनर फडकवले होते.

नॅन्सी पॅलोसी आधीपासूनच चीनच्या टीकाकार होत्या. 1991 च्या बीजिंगच्या भेटीदरम्यान, पॅलोसी, सहकारी राजकारण्यांसोबत तसेच काही पत्रकारांसह, थियानमेन स्क्वेअर येथे गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी हातात एक बॅनर फडकवले. ज्यावर लिहिले होते- चीनमध्ये लोकशाहीसाठी बलिदान देणाऱ्यांसाठी.

त्यानंतर पॅलोसी टॅक्सीने निघून गेल्या, पण पोलिसांनी पत्रकारांना अटक केली. थियानमेन स्क्वेअर हे तेच ठिकाण आहे, जिथे 1989 मध्ये लोकशाहीच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत असतांना चीनी लष्कराने त्यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.

नॅन्सी पॅलोसी या दलाई लामा आणि तिबेटच्या अधिकारांच्या समर्थक देखील आहेत. 2015 मध्ये त्या तिबेटची राजधानी ल्हासा येथेही चिनी अधिकाऱ्यांच्या परवानगीने गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या अधिकृत दौऱ्यात तैवानचा उल्लेख नसला तरी त्या अचानक तेथे पोहोचल्या तर फार आश्चर्य वाटणार नाही. तैवानला भेट देण्याच्या प्रश्नावर नॅन्सी पॅलोसी यांनी अद्याप स्पष्टपणे नकार दिलेला नाही.

सहयोग: सौमित्र शुक्ला

बातम्या आणखी आहेत...