आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • US India Population; What Is CDC Mask New Guidelines? All You Need To Know | When You've Been Fully Vaccinated

एक्सप्लेनर:अमेरिकेत 37% नागरिकांचे लसीकरण होताच लोकांची मास्कपासून झाली सुटका; भारतात असे झाल्यास यंदा दिवाळी मास्कशिवाय होऊ शकेल साजरी

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • भारत कधीपर्यंत मास्क फ्री होऊ शकेल, जाणून घ्या यासह बरंच काही...

अमेरिकेत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना मास्कपासून मुक्ती मिळाली आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) म्हटल्यानुसार, अमेरिकेतील ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना मास्क वापरण्याची आणि सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. मात्र लस न घेतलेल्या नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे निर्देश सीडीसीने दिले आहेत. सीडीसीच्या घोषणेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील मास्कविना माध्यमांसमोर आले होते. बायडेन यांनी त्या दिवसाचे मैलाचा दगड म्हणून वर्णन केले आणि ते म्हणाले की, अमेरिकेने वेगाने लसीकरण केल्याचा हा परिणाम आहे. अमेरिकेतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लस घेतल्याने आपली कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले. एका वर्षाची कठोर मेहनत आणि अनेकांचा प्राण गमावल्यानंतर आपण मास्क फ्री दिशेने वाटचाल करत असल्याचेही ते म्हणाले.

भारत सरकार ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान 216 कोटी लसीचे डोस आणणार असल्याचे म्हणत आहे. जर देशात लसीकरणाने अपेक्षेनुसार वेग पकडला तर दिवालीपर्यंत आपल्याकडेही लसीकरण झालेल्या लोकांना अशी सूट दिली जाऊ शकेल.

CDC ने हा निर्णय का घेतला, यामुळे अमेरिकेत काय बदलणार आहे आणि अमेरिकेत अद्याप कुठे-कुठे मास्क घालणे बंधनकारक आहे? भारतात लसीकरण केलेल्या लोकांना मास्क न घालण्याची कधी व कोणत्या परिस्थितीत सूट दिली जाऊ शकते? एखाद्या देशाने नागरिकांना मास्क न घालण्याची पूर्ण सूट दिली आहे का? जर भारताला हे करायचे असेल तर ते कधीपर्यंत होऊ शकेल?, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात...

CDC च्या नवीन मार्गदर्शक सूचना काय सांगतात?
CDC च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, जर आपल्याला लसीचे दोन्ही डोस मिळाले असतील तर मग मास्क घालण्याची आणि सामाजिक अंतराचे पालन करण्याची आवश्यकता नाही. अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करायचा असल्यास आपल्याला कोरोना चाचणी करुन घेण्याचीदेखील आवश्यकता नाही. जर आपण कोरोना संक्रमित लोकांच्या संपर्कात आले असाल, पण जर आपल्याला कोणतीही लक्षणे नसतील तर मग चाचणी करुण घेण्याची आवश्यकता नाही.

कोरोना महामारीपूर्वी ज्याप्रकारे आपण आपले दैनंदिन काम काज करत होते, ते अगदी पुर्वीसारखे करु शकाल. म्हणजेच, सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसणे, लोकांना भेटणे आणि ते देखील सामाजिक अंतर आणि मास्कशिवाय करता येईल.

व्हाईट हाऊसमध्ये मीडियाला मास्कशिवाय संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते त्यांनी मास्क घालण्याची गरज नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती.

CDC ने हा निर्णय का घेतला?
अमेरिकेत गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. यासह, अॅक्टिव केस आणि मृत्यू दरातही घट झाली आहे. सध्या दररोज कोरोनाची सुमारे 36,000 नवीन प्रकरणे समोर येत आहेत, सप्टेंबरनंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे.

यासह, अमेरिकेत लसीकरण देखील वेगाने होत आहे. अवर वर्ल्ड इन डेटानुसार अमेरिकेच्या सुमारे 47 टक्के लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस मिळाला आहे आणि सुमारे 37 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. अमेरिकेत, 12 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना सरकारने भेट दिली आहे. हे अधिक लोकांना लसीकरण करण्यास प्रवृत्त करेल जेणेकरून ते मास्कपासून मुक्त होऊ शकतील.

जर भारताला असे करायचे असेल तर ते कधीपर्यंत शक्य होऊ शकेल?
अमेरिका आणि भारत यांची तुलना करायची झाल्यास, 16 मे पर्यंत, जिथे अमेरिकेत 27 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे तर भारतात ही संख्या 18 कोटी इतकी आहे. आकडेवारीला लोकसंख्येनुसार बघितले असता, अमेरिकेतील 47% आणि भारतातील 11% लोकांना लस मिळाली आहे. अमेरिकेच्या 37% लोकसंख्येचे दोन्ही लस देऊन लसीकरण झाले आहे. तर भारतातील एकुण लोकसंख्येपैकी केवळ 3% लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. भारतातील 37% लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी 51 कोटी लोकांना संपूर्ण लसी द्यावी लागेल.

आतापर्यंत भारतात 18 कोटींहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे. म्हणजेच 120 दिवसांपासून सुरु असलेल्या या मोहिमेत दररोज सरासरी 15 लाख डोस देण्यात येत आहेत. म्हणजेच जर ही सरासरी कायम ठेवली गेली तर 51 कोटी लोकांना पूर्ण लस देण्यास 21 महिने लागतील. परंतु लसीच्या अभावामुळे सध्या लसीकरणाच्या वेगाला ब्रेक लागला आहे.

भारतात 16 मे रोजी सुमारे 7 लाख लोकांना लस देण्यात आली. जर या वेगाने लसीकरण सुरू ठेवले तर 51 कोटी लोकांचे लसीकरण करण्यास 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागेल. म्हणजेच, या परिस्थितीत, मास्कपासून मुक्त होण्यासाठी देशातील लोकांना तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल.

पण सरकार ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान 216 कोटी लस डोस आणण्याचा दावा करीत आहे, त्याचे काय? लसीकरणाच्या बाबतीत मे महिना खूपच वाईट गेला आहे. लसीकरणाची गती निरंतर कमी होत आहे, परंतु पुढील महिन्यापासून ती वाढण्याची शक्यता आहे. हैदराबादमध्ये रशियन लस स्पुतनिक व्ही 14 मेपासून देण्यास सुरुवात झाली आहे. पुढील एक किंवा दोन आठवड्यात या लसीचा डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

सरकारने ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान भारतीय लस कोव्हॅक्सिनचे 55 कोटी डोसचे उत्पादन होईल, असे म्हटले आहे. कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्यासाठी तीन सरकारी कंपन्यांनी भारत बायोटेकच्या तंत्रज्ञानाने त्याच्या उत्पादनात भर टाकण्याची तयारी केली आहेत.

असे झाल्यास, जूनपासून पुन्हा लसीकरणाची गती वाढू शकते. सरकारच्या म्हणण्यानुसार, जर आणखी काही कंपन्यांची लस देशात मिळू लागली तर ही गती लक्षणीय वाढेल. एप्रिलमध्ये एकाच दिवसात 43 लाख लोकांना लस देण्यात आली होती. म्हणजेच आमची पायाभूत सुविधा अशी आहे की, एका दिवसात आपण सहजपणे 50 लाख लोकांना लस देऊ शकतो. जर सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाले तर ऑक्टोबरपर्यंत देशातील 37% लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले असेल. म्हणजेच, लसीकरण केलेल्या लोकांना दिवाळी मास्कशिवाय साजरी करता येऊ शकेल.

ब्रोकरेज फर्म यश सिक्युरिटीजच्या मते, नोव्हेंबरपर्यंत देशातील 40% लोकसंख्या संपूर्ण व्हॅक्सिनेटेड असेल. म्हणजेच, जर सीडीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे भारतात पालन केले गेले तर नोव्हेंबरपर्यंत लसीकरण केलेले लोक मास्क मुक्त होतील. तसेही यंदा दिवाळीचा सण 4 नोव्हेंबरला आहे. म्हणजेच, लसीकरण केलेल्या लोकांसाठी दिवाळी मास्कविना असू शकते.

एखाद्या देशाने मास्क न लावण्याची पूर्णपणे सूट दिली आहे का?
इस्राइल हा जगातील पहिला असा देश आहे, जिथे मास्क न घालण्याची पूर्ण सूट देण्यात आली आहे. हे पाऊल उचलण्यापूर्वी इस्राइलने 80 टक्के लोकांना कोरोनाची लस दिली होती. इस्राइलकडे कोरोना विषाणूंविरूद्धच्या लढ्यातील हे मोठे यश म्हणून पाहिले जात आहे.

भारतात हे चित्र कधीपर्यंत दिसू शकेल?
ब्रोकरेज फर्म यश सिक्युरिटीजच्या एका अहवालानुसार, देशातील 60 ते 70% लोकसंख्येचे जानेवारीपर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाईल. तोपर्यंत भारत हर्ड इम्युनिटी प्राप्त करेल. यानंतर, लोकांना मास्क न घालण्याची पूर्णपणे सूट दिली जाऊ शकते.

तर आता अमेरिकन लोकांच्या चेह-यावरुन मास्क कायमचा गायब होईल का?
नाही. सीडीसीने दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना काही परिस्थितीत सावधगिरी म्हणून मास्कचा वापर करण्यास सांगितले आहे. मास्क कधी आणि कुठे घालायचा हे जाणून घेऊया...

मास्क कधी आणि कुठे घालायचा

 • आपण लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत.
 • लसीचा दुसरा डोस घेऊन 2 आठवडे पूर्ण झालेले नाहीत.
 • प्रवास करताना विमान, बस, ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहतुकीचे साधन वापरताना मास्क घालावा लागेल.
 • रुग्णालयात जाताना, अनाथाश्रम, आश्रमशाळांमध्ये आणि तुरूंगात असलेल्या कैद्यांना अजूनही मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 • सार्वजनिक ठिकाणांच्या नियमांनुसार, जर मास्क घालणे बंधनकारक असेल, तर आपल्याला मास्क घालावा लागेल. म्हणजेच, अमेरिकेतील एखादे राज्य, शहर, रेस्तराँ किंवा ऑफिसमध्ये मास्क घालणे आवश्यक असेल, तर आपल्याला मास्क घालावा लागेल.
 • एखाद्या कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर जर आपल्याला कोरोनाची लक्षणे आढळली तर मास्क घालावा लागेल आणि चाचणीही करावी लागेल.
 • गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण किंवा रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मास्क घालावा लागेल.
बातम्या आणखी आहेत...