आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Neither The Explosion, Nor The Death Of The Innocent; How Exactly Is The R9X Hellfire? Read In Detail

दिव्य मराठी एक्सप्लेनरअमेरिकेचे गुप्त क्षेपणास्त्र:ना स्फोट, ना निष्पापांचे मृत्यू; R9X हेलफायर नेमके आहे तरी कसे? वाचा सविस्तर

नीरज सिंह/ अनुराग आनंद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेने काबूलमध्ये दोन क्षेपणास्त्रे डागून अल-कायदाचा मोरक्या अयमान अल-जवाहिरीला ठार केले. मात्र, त्या ठिकाणी स्फोटाचे कोणतेही चिन्हे दिसत नाही किंवा इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही. तेव्हापासून अमेरिकेने कोणते क्षेपणास्त्र डागले, ज्याचा स्फोटही झाला नाही आणि जवाहिरीही मारला गेला, अशी चर्चा आहे.

तर या चर्चेचे उत्तर आहे R9X हेलफायर क्षेपणास्त्र, ज्याला निंजा असेही म्हणतात. या क्षेपणास्त्रामध्ये स्फोटकांऐवजी 6 रेझरसारखे ब्लेड बसवण्यात आले आहेत, जे लक्ष्याचे तुकडे करतात. याच गुप्त हत्याराने किंवा क्षेपणास्त्राने जवाहिरीचाही खात्मा करण्यात आला आहे.

आजच्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आम्ही तुम्हाला अमेरिकेच्या R9X Hellfire Ninja Missile ची संपूर्ण माहिती देत आहोत.

सर्वात आधी R9X हेलफायर निंजा मिसाईल बद्दल माहिती वाचा खालील ग्राफिक्समध्ये...

किती धोकादायक: 6 धारदार ब्लेड इमारतींचे छत कापून हल्ला करतात

बायडेन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी 6.18 च्या सुमारास जवाहिरी काबूलच्या शेरपूरमध्ये बाल्कनीत चकरा मारत होता. त्यावेळी 2 R9X हेलफायर क्षेपणास्त्रांनी येऊन जवाहिरीला ठार केले. ही क्षेपणास्त्रे ड्रोनमधून डागण्यात आली. या हल्ल्यात कोणताही स्फोट झाला नाही, कुटुंबातील कोणताहीी सदस्य मारला गेला नाही आणि जवळपासच्या इमारतींचे कोणतेही नुकसानही झाले नाही.

वास्तविक, R9X हेलफायर हे जगातील सर्वात प्रगत क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. हे डोळ्याची पापणी लवायच्या आत शत्रूला मारते. त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्फोट होत नाही, परंतु 45 किलो वजनाच्या या क्षेपणास्त्राला 6 तीक्ष्ण ब्लेड आहेत. यामुळे स्फोट न होता लक्ष्यावर किंवा टार्गेटवर मारा करता येतो. या क्षेपणास्त्राने जवाहिरी मारला गेला. यादरम्यान जवाहिरीच्या कुटुंबातील इतर सदस्यांना किरकोळ दुखापत झाली.

2019 मध्ये, वॉल स्ट्रीट जर्नलने प्रथम R9X क्षेपणास्त्राच्या हल्ल्याची माहिती देण्यात आली होती. अफगाणिस्तान, लिबिया, इराक, येमेन आणि सोमालियामधील प्रमुख दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. R9X ला ‘फ्लाइंग गिंसु’ असेही म्हणतात. 1980 च्या दशकात टीव्ही जाहिरातींमध्ये पाहिलेला हा जपानी चाकू आहे. टिनचे डबे वगैरे कापण्यासाठी हा चाकू वापरला जातो आणि तरीही तो अत्यंत धारदार आणि धारदार राहतो, असे या जाहिरातीत दाखवण्यात आले होते.

अचूकता : क्षेपणास्त्र कारमध्ये बसलेल्या लक्ष्यला मारेल पण ड्रायव्हर सुरक्षित राहिल

R9X क्षेपणास्त्र पूर्ण अचूकतेने आपल्या लक्ष्यावर मारा करते, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ, कारमध्ये एखादे टार्गेट असेल तर क्षेपणास्त्र फक्त टार्गेटवर आदळते आणि गाडीच्या ड्रायव्हरला कोणतीही इजा होणार नाही. क्षेपणास्त्राचे ब्लेड इतके तीक्ष्ण आहेत की, ते इमारत किंवा कारचे छत कापू शकतात.

वैशिष्ट्य : एकही निष्पाप मारला जात नाही

R9X हेलफायर क्षेपणास्त्र टार्गेट किलिंगसाठी प्रसिद्ध आहे. आजूबाजूला फारच कमी जीवितहानी होते, म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितहानीचा धोका नाही.

केव्हा बनवले गेले : 11 वर्षांपूर्वी ओबामाच्या काळात

हे क्षेपणास्त्र 2011 मध्ये बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना बनवण्यात आले होते. ओबामा यांनी हे क्षेपणास्त्र मध्यपूर्वेतील ड्रोन हल्ल्यांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी बनवण्याचे आदेश दिले होते. स्फोटके नसल्यामुळे त्याला निंजा क्षेपणास्त्र असेही म्हणतात.

R9X हे क्षेपणास्त्र लॉकहीड मार्टिन आणि नॉर्थ्राप गुम्मन यांनी CIA आणि US संरक्षण विभागासाठी संयुक्तपणे विकसित केले आहे. आतापर्यंत डझनहून अधिक प्रकरणांमध्ये टार्गेट किलिंगसाठी याचा वापर करण्यात आला आहे.

R9X क्षेपणास्त्र वापरण्यात आलेले मोठे हल्ले…

2019: R9X क्षेपणास्त्राने ‘जमाल अल-बदावी’ मारला गेला

ही काही पहिलीच घटना नाही. त्यापूर्वी जानेवारी 2019 मध्येही या R9X क्षेपणास्त्राद्वारे अमेरिकेने आपला सर्वात मोठा शत्रू दहशतवादी जमाल अल-बदावीचा खात्मा केला होता. वास्तविक, 2000 मध्ये येमेन बंदरावर 17 अमेरिकन सैन्यावर झालेल्या हल्ल्यात दहशतवादी जमाल अल-बदावीचा हात होता. या हल्ल्यात अमेरिकन लष्कराचे सर्व सैनिक मारले गेले. अमेरिकेने आपल्या सैनिकांच्या निर्घृण हत्येनंतर तब्बल 19 वर्षांनंतर R9X क्षेपणास्त्राद्वारे बदला घेतला.

2017: 'अहमद हसन अबू अल-खैर अल-मसरी' देखील R9X चा बळी

तिसरी घटना फेब्रुवारी 2017 मध्ये घडली होती. जेव्हा US R9X क्षेपणास्त्राने जगातील आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. इजिप्तचा रहिवासी अहमद हसन अबू अल-खैर अल-मसरी हा या वेळी अल कायदा या दहशतवादी संघटनेचा नंबर 2 नेता होता. सीरियाच्या इदलिब प्रांतात अमेरिकेने R9X क्षेपणास्त्राने हल्ला केला. अहवालानुसार, हे अभियान अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने पार पाडले. मात्र, सीआयएने अशा हल्ल्याची कबुली देण्याचे टाळले आहे.

2017 मध्ये R9X क्षेपणास्त्राने अल मसरी याला मारले होते. तेव्हा तो कारमधून प्रवास करत होता. हल्ल्याच्या छायाचित्रांमध्ये कारच्या छताला एक मोठे छिद्र दिसून आले. हा भाग कात्रीने कापल्यासारखा दिसत होता. असे असूनही कारचा पुढील व मागील भाग शाबूत होता.
2017 मध्ये R9X क्षेपणास्त्राने अल मसरी याला मारले होते. तेव्हा तो कारमधून प्रवास करत होता. हल्ल्याच्या छायाचित्रांमध्ये कारच्या छताला एक मोठे छिद्र दिसून आले. हा भाग कात्रीने कापल्यासारखा दिसत होता. असे असूनही कारचा पुढील व मागील भाग शाबूत होता.

2021: 13 सैनिक मारले गेले तेव्हा अमेरिकेने R9X चा वापर केला

ऑगस्ट 2021 मध्ये, अमेरिकेने याच R9X क्षेपणास्त्राचा वापर अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतात दोन कुख्यात ISIS दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी केला होता. अमेरिकन लष्कराने MQ-9 रीपर ड्रोनद्वारे या क्षेपणास्त्राचा वापर केला. हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन सैनिकांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने हा हल्ला केला होता. या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिक मारले गेले.

अल-कायदा प्रमुख जवाहिरीला ठार मारण्यापूर्वी अमेरिकेने सीरियाच्या इदलिब शहरात R9X हेलफायर क्षेपणास्त्राचा वापर जून 2022 मध्ये केला होता. त्यादरम्यान या क्षेपणास्त्राने हुर्रस अल-दिनचा दहशतवादी अबू हमजा अल-यामानी याला मारले होते.
अल-कायदा प्रमुख जवाहिरीला ठार मारण्यापूर्वी अमेरिकेने सीरियाच्या इदलिब शहरात R9X हेलफायर क्षेपणास्त्राचा वापर जून 2022 मध्ये केला होता. त्यादरम्यान या क्षेपणास्त्राने हुर्रस अल-दिनचा दहशतवादी अबू हमजा अल-यामानी याला मारले होते.

अमेरिकेकडे 72 वर्षांपूर्वीपासून 'निंजा'सारखी घातक शस्त्रे

आज धोकादायक टार्गेटेड मिसाइल निंजा म्हणजेच R9X, ज्याद्वारे अमेरिकेने दहशतवादी अयमान अल-जवाहिरीला ठार मारले आहे, त्या प्रकारच्या शस्त्राचा वापर 72 वर्षांपूर्वी अमेरिकेत सुरू झाला.

1950 च्या दशकात कोरिया आणि व्हिएतनाम युद्धादरम्यान, यूएस आर्मीच्या जवानांनी 'लेझी डॉग' असेच टार्गेट किलिंग वेपन बनवले होते. त्यामुळे मोठा स्फोट न करता केवळ लक्ष्यावरच मारा करता येत होता.

युद्धादरम्यान अमेरिका हवाई दलाच्या मदतीने 'लेझी डॉग' बॉम्ब वापरत असे. मात्र, 10 वर्षांनीच अमेरिकेने 1960 मध्ये असे बॉम्ब बनवणे बंद केले.

बातम्या आणखी आहेत...