आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:अमेरिका : वय, वंश, उत्पन्नानुसार काेराेनाचा प्रादुर्भाव, न्यूयाॅर्क-ब्रुकलिनमध्ये गरिबांचे मृत्यू झाले जास्त!

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • मृतांमध्ये लॅटिन अमेरिकी लाेक जास्त, न्यूयाॅर्कची ३० टक्के लाेकसंख्या गरीब

(मायकल श्वात्झ / लिंडसे राेजर्स कूक)

अमेरिकेत काेराेना संसर्ग, त्यामुळे हाेणारे मृत्यू व रुग्णालयांत भरती रुग्णांच्या संख्येला भाैगाेलिकदृष्ट्या पाहिल्यास त्यात वेगळी माहिती समाेर येते. श्रीमंत भाग असलेल्या वसाहतीत प्रादुर्भाव तसेच मृतांची संख्याही कमी आहे. गरीब लाेक असलेल्या वसाहतींमध्ये मृत्यूसंख्या मात्र दुप्पट आहे. एवढेच नव्हे तर वंश, जातीच्या समुदायाच्या पातळीवरही काेराेनाचा फटका बसल्याचे दिसून येते.

न्यूयाॅर्कच्या आराेग्य विभागाने न्यूयाॅर्कमधील विविध वसाहतींबद्दल जिप काेडच्या आधारे एक अहवाल तयार केला आहे. त्यात सर्व गाेष्टींचा ऊहापाेह केला आहे. जिप काेडच्या आधारे नवीन डेटानुसार न्यूयाॅर्कमध्ये काेराेनाबद्दल सर्वात माेठा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानुसार सर्वाधिक मृत्यू काेणत्या वसाहतीमध्ये हाेत आहेत असा ताे प्रश्न आहे. गरीब वसाहतीत एक लाख लाेकांच्या मागे २३२ जणांचा मृत्यू हाेत आहे. समृद्ध मानल्या जाणाऱ्या भागात मृतांची संख्या १०० एवढी आहे. म्हणजेच तुलनेने श्रीमंतांची वसाहत असलेल्या भागातील संख्या निम्मी आहे. त्यातही न्यूयाॅर्क, ब्रुकलिनमध्ये काेराेनाचा परिणाम प्रचंड विषमता दर्शवणारा आहे. ब्राँक्समध्ये काेराेनाचे रुग्ण, रुग्णालयात भरती लाेक व मृत्यूदर सर्वात जास्त आहे. वंश व समुदायाच्या दृष्टीने न्यूयाॅर्कमध्ये लॅटिन अमेरिकी लाेकांना काेराेनामुळे सर्वात जास्त संख्येने प्राण गमवावे लागले. त्याव्यतिरिक्त वय हादेखील एक माेठा घटक मृत्यूमागील कारणांपैकी एक आहे. सर्वात जास्त मृृत्यू झालेल्या भागात एक माेठा समुदाय ६५ वर्षांहून जास्त वयाचा असल्याचे दिसून आले. कृष्णवर्णीय व लॅटिन अमेरिकीबहुल भागांत मृत्यू झाले. येथे अनेक आफ्रिकी व अमेरिकी लाेकांची जुनी घरे आहेत. हा समुदाय कमी उत्पन्न गटातील व मध्यमवर्गीय आहे. हा परिसर गरिबांची वसाहत म्हणून परिचित आहे. जिप काेड डेटामध्ये केवळ काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आलेल्यांचा समावेश केलेला आहे.

सर्वात जास्त मृत्यू ब्रुकलिनमध्ये, सर्वात कमी मॅनहॅटनमध्ये

ब्रुकलिनच्या स्टारेट सिटीच्या नावे प्रसिद्ध स्प्रिंग क्रिक टाॅवर्समध्ये मृत्यूदर सर्वात जास्त आहेत. प्रती लाख लाेकांत ६१२ जणांचा मृत्यू झाला. क्विन्स-४४५, ब्राॅक्स-४२९ आहे. मॅनहॅटन या उच्चभ्रू वसाहतीत मृतांची संख्या नगण्य आहे. सर्वात कमी मृत्यू या भागात आहेत. येथील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न सहाअंकी आहे.

बातम्या आणखी आहेत...