आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • USA Sanctions Vs India Russia Oil Trade । India Importing Crude Oil In Cheap Rates From Russia । Worlds Top Oil Producing Countries

दिव्य मराठी एक्सप्लेनर:निर्बंध असतानाही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू शकतो का भारत? कशा कमी होणार इंधनाच्या किमती? येथे जाणून घ्या सर्व

लेखक: नीरज सिंह2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

युक्रेनवर रशियाच्या आक्रमणानंतर कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्याचा भारतावरही परिणाम झाला आहे. लवकरच दर कमी न झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात, असे मानले जात आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरे जात असलेल्या रशियाने भारताला कमी किमतीत कच्चे तेल देण्याची तयारी दर्शवली आहे. भारतही या कराराबद्दल खूप गंभीर आहे. रशियातून स्वस्त दरात कच्च्या तेलाची आवक झाल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी कमी होतील, असे मानले जात आहे. यासोबतच अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा बूस्टर डोसही मिळेल.

अशा परिस्थितीत जाणून घेऊया की, भारत आता रशियाकडून किती कच्चे तेल खरेदी करतो? रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यात काय अडचण आहे? रशियातून स्वस्त कच्च्या तेलाच्या आगमनामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील का?

भारत सध्या कोणत्या देशांकडून तेल आयात करतो?

 • ओपेक ही क्रूड तेल उत्पादक देशांची संघटना आहे. ते जगभरात विकल्या जाणार्‍या कच्च्या तेलाच्या 60% उत्पादन करतात.
 • रशिया हा ओपेक देशांचा सदस्य नाही, परंतु 2017 पासून तो तेल उत्पादनावर मर्यादा निश्चित करण्यासाठी ओपेकसोबत काम करत आहे जेणेकरून कच्च्या तेलाच्या किमती अवाजवी वाढू नयेत.
 • तसे पाहिले तर जगातील कच्च्या तेलाचे 12% उत्पादन रशियात, 12% सौदी अरेबियात आणि 16-18% अमेरिकेत होते.
 • भारत आपल्या गरजेच्या 85% कच्च्या तेलाची आयात करतो. यापैकी 60% आखाती देशांमधून घेतले जाते. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारत सौदी अरेबिया आणि अमेरिकेवर अधिक अवलंबून आहे.
 • याशिवाय भारत इराक, इराण, ओमान, कुवेत आणि रशियाकडूनही तेल घेतो आणि काही स्पॉट मार्केट म्हणजेच खुल्या बाजारातूनही खरेदी करतो.

भारत रशियाकडून किती तेल आयात करतो?

 • भारत सध्या रशियाकडून केवळ 2% कच्चे तेल आयात करतो. यासोबतच रशियाकडून दरवर्षी 3 अब्ज डॉलरची पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. भविष्यात त्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
 • त्याच वेळी भारत रशियाकडून कच्च्या तेल आणि इतर वस्तू सवलतीच्या किमतीत घेण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या निर्बंधांदरम्यान भारत रशियाकडून अधिक कच्चे तेल खरेदी करू शकेल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
 • याचे उत्तर होय असेच आहे, कारण अमेरिकेनेही अलीकडेच म्हटले आहे की, भारताने रशियाकडून कच्चे तेल घेतले तर त्यांना हरकत नाही. तसेच, ते कोणत्याही निर्बंधाचे उल्लंघन ठरत नाही.
 • दरम्यान, देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइलनेही रशियाकडून 3 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची स्वस्त दरात खरेदी केल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. 20 ते 25 डॉलरच्या सवलतीत एका व्यापाऱ्याच्या माध्यमातून ही डील झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रशियाकडून तेल खरेदी करणे कठीण का आहे?

 • रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. त्याचबरोबर अमेरिका पहिल्या क्रमांकावर, तर सौदी अरेबिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 • यासोबतच रशिया दररोज 10.7 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन करतो. यातील निम्म्याहून अधिक भाग युरोपात जातो.
 • अशा परिस्थितीत, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जेव्हा रशिया युरोपच्या तेल आणि वायूच्या गरजा पूर्ण करतो, तेव्हा भारताचा सर्वात महत्त्वाचा भागीदार असूनही, तो रशियाकडून केवळ 2% तेल खरेदी करतो.
 • याचे उत्तर रशियाच्या भूगोलात दडलेले असल्याचे ऊर्जा तज्ज्ञ नरेंद्र तनेजा यांनी स्पष्ट केले. रशियाचे प्रदेश जेथे क्रूड तेलाचे उत्पादन केले जाते ते पूर्वेकडील प्रदेशापासून थोडे दूर आहेत. यासोबतच उत्तरेकडील भाग आर्क्टिक प्रदेशाजवळ आहेत. अशा परिस्थितीत येथे बर्‍याच वेळा बर्फ गोठलेला असतो, त्यामुळे तेल आणणे कठीण होते.
 • तिसरा मार्ग काळ्या समुद्राचा आहे, जो सध्या रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे बंद आहे.
 • नरेंद्र तनेजा सांगतात की, क्रूड खरेदी करण्यापूर्वी अनेक बाबींचीही काळजी घ्यावी लागते. जसे आपण कच्चे तेल मागवतो तेव्हा ते शुद्ध करतो. प्रत्येक ठिकाणचे कच्चे तेल थोडे वेगळे असते. यानंतर हे क्रूड कुठे रिफाइन करता येईल हे पाहिले जाते. त्यामुळे कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करतानाही हे प्रमाण पाहिले जाते.
 • दरम्यान, रशियाची सर्वात मोठी तेल कंपनी रोसनेफची गुजरातमधील जामनगरमध्ये रिफायनरी आहे. रोसनेफदेखील फक्त 2% तेल ऑर्डर करते. खरे तर भारत रशियाकडून फक्त 2% तेल घेतो कारण ते इतर ठिकाणांहून आणणे जास्त सोपे आहे.
 • उदाहरणार्थ, भारत आखाती देशांमधून 60% कच्चे तेल घेतो. तसेच हे तेल समुद्रातील जहाजाने अवघ्या 15 दिवसांत भारतात पोहोचते. त्यामुळे भाडेही कमी लागते. त्याच वेळी, मार्गाबाबत रशियामध्ये समस्या आहेत, ज्याबद्दल आपण वर उल्लेख केला आहे.
 • अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांचा परिणाम तेथील तेल आणण्यावरही होणार आहे. त्यामुळे आगामी काळात टँकर मिळणे कठीण होणार आहे, कारण कोट्यवधी रुपयांचे तेल टँकरमध्ये आणताना त्याचा विमाही काढावा लागतो. या टँकरचा विमा उतरवणाऱ्या कंपन्या पाश्चिमात्य देशांतील आहेत. अशा परिस्थितीत बंदी लागू झाल्यावर ते टँकरचा विमा उतरवणार नाहीत. अशा स्थितीत रशिया स्वस्तात तेल देण्याची चर्चा करत असताना ते कितपत व्यावहारिक ठरेल, हेही पाहावे लागेल.
 • गेल्या 10 वर्षांत भारताने कच्च्या तेलाच्या आयातीतील एका देशावरील अवलंबित्व दूर करण्यासाठी आणखी अनेक देशांकडून क्रूड खरेदी सुरू केली आहे. यात अमेरिका आणि रशियाचाही समावेश आहे.
 • भारताने रशियामध्ये तेल आणि नैसर्गिक वायूच्या क्षेत्रात 16 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे, पण भारत ते तेल खरेदी करत नाही, तर ते इतर देशांना विकतो.

अमेरिकेच्या निर्बंधांवर काही उपाय आहे का?

 • केवळ अमेरिकेत रशियाकडून तेल खरेदी करण्यावर निर्बंध आहेत. भारत सध्या रशियाकडून तेल खरेदी करू शकतो, परंतु पेमेंटमध्ये अडचण येऊ शकते. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारत आणि रशिया रुपया आणि रुबलमध्ये व्यापार करण्याऐवजी वस्तु विनिमय पद्धतीच्या धर्तीवर व्यापार करू शकतात, जसे भारताने इराणवरील निर्बंधांच्या वेळी केले होते.
 • इराणवर निर्बंध घालताना दोन्ही देशांनी वस्तु विनिमय पद्धतीचा अवलंब केला होता. म्हणजे भारत जेवढे तेल इराणकडून खरेदी करत होता, तेवढेच इराण भारताकडून गहू विकत घेत असे, म्हणजे पैशाच्या व्यवहाराची गरज भासणार नाही.

रशियाकडून तेल खरेदी केल्याने किंमत कमी होईल का?

 • अशा परिस्थितीत जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत, तेव्हा भारत आपल्या पारंपरिक निर्यातदारांना सांगू शकतो की, रशिया आम्हाला स्वस्त तेल देत आहे, त्यांनीही त्यांची किंमत कमी करावी. म्हणजेच, किमतींमध्ये थोडीशी बार्गेनिंग करावी.
 • दुसरीकडे नरेंद्र तनेजा म्हणतात की, रशियातून कच्च्या तेलाचे दोन-चार टँकर आणूनही आमचा फायदा होणार नाही. भारत दररोज 5.2 दशलक्ष बॅरल तेलाचा वापर करत असल्याने किमती कमी होणार नाहीत. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेलाचा ग्राहक आहे. भारताने रशियाकडून एक लाख किंवा दोन लाख बॅरल तेल आयात केले तरी भारतातील तेलाच्या किमतींवर त्याचा परिणाम होणार नाही.
 • ते म्हणाले की, जर रशिया खरोखरच आमचा मित्र असेल आणि तेथे तेल इतके स्वस्त असेल तर आपण तेथे जाऊन तेल आणि वायूच्या साठ्यात भागभांडवल विकत घेतले पाहिजे. जर रशिया स्वस्त तेल देत असेल तर आम्हाला वाटा देण्यास मागेपुढे पाहू नये.
 • त्यांनी सांगितले की, आपाण् तिथे 16 अब्ज डॉलरच्या तेल विहिरी विकत घेतल्या आहेत. हे तेल आपण तिथे विकतो. सध्या रशियन तेलाच्या किमती 40% पर्यंत खाली आल्या आहेत. अशा परिस्थितीत तेथील तेल आणि वायूच्या साठ्यातील भागभांडवल खरेदी करणे स्वस्त ठरेल. तसेच ते आपल्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करेल. असे झाले तर आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.
 • यासोबतच रशिया आणि युक्रेनमधील कराराच्या बातम्या आणि तेलाचा तुटवडा भासणार नसल्याचे अमेरिकेचे आश्वासन यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात करार झाल्यास किमती आणखी खाली येऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...