आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंटरव्ह्यूमी अंकिताची शपथ घेतो:लोक म्हणतात की ‘मी पैसे घेऊन अंकिताचा अंत्यविधी होऊ दिला’; पण हे खोटे आहे

वैभव पळनीटकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही गावात कुणालाही विचारा अंकिता कशी मुलगी होती. शिक्षण पूर्ण करण्याचे तीने स्वप्न पाहिले होते. पैसे घेऊन मी तिच्यावर अंत्यसंस्कार करू दिला, असे लोक म्हणत आहेत. हे सर्व खोटे आहे. मी अंकिताची शपथ घेतो.

कित्येक तासांपासून रडणाऱ्या अंकिताच्या आजीला सांभाळताना तिचे वडील बिरेंद्रसिंह भंडारी हे सांगत होते. त्यांच्या घरात आता त्यांच्या व्यतिरीक्त फक्त अंकिताची आई आणि 21 वर्षांचा भाऊ आहेत. बिरेंदर सिंग आपल्या मुलीला गमवावे लागल्यामुळे दु:खी आहेत आणि त्यांना तिच्या अंतिम संस्कारासाठी देखील संघर्ष करावा लागला, याचा रागही त्यांच्या मनात आहे. ते म्हणाले- तिन्ही आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे.

ऋषिकेश येथील वनांतरा रिसॉर्टमधील रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी हिचा मृतदेह 24 सप्टेंबर रोजी चिल्ला कालव्यात सापडला होता. रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य आणि दोन व्यवस्थापकांवर तीच्या हत्येचा आरोप आहे. तब्बल साडेआठ तास चाललेल्या आंदोलनानंतर रविवारी अंकिताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आम्ही अंकिताच्या गावी डोभ श्रीकोट येथे पोहोचलो, तेव्हा तिथे काही नातेवाईकांशिवाय कोणीच नव्हते. वडिलांना शोधले तर ते त्यांची आई आणि अंकिताची आजी जवळ भेटले. तिथेच आम्ही त्यांच्याशी बोललो. आमचा पहिला प्रश्न अंकिताच्या अंत्यसंस्कारावर होता, कारण यावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत.

प्रश्न : अंकितावर अंत्यसंस्कार प्रशासनाच्या दबावाखाली झाला का?

उत्तरः नाही, हे सर्व माझ्या स्वेच्छेने घडले. मला अंकिताचे अंतिम संस्कार करायचे होते. प्रशासनाच्या दबावाखाली मी मुलीवर अंत्यसंस्कार केल्याचे अनेक लोक आणि वृत्त माध्यमे सांगत आहेत. तसं काही नाही. यासाठी मी पैसे घेतल्याचेही बोलले जात आहे. माझी मुलगी जग सोडून गेली, मी तिची शपथ घेतो, मी एकही पैसा घेतलेला नाही.

प्रश्न : तुम्ही अंकिताचा मृतदेह पाहिला का?

उत्तर : मुलीच्या मृत्यूला 5-6 दिवस झाले होते. मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली होती. ते म्हणाले की, पोस्टमॉर्टम रिपोर्ट कधीही येऊ शकतो, कदाचीत उशीर देखील होईल. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रश्नः अंकिताचा शोध घेण्यासाठी आणि आरोपीला अटक करण्यासाठी तुम्ही काय केले?

उत्तर : 18 तारखेला अंकिताचा फोन लागला नाही. त्यानंतर एका मुलाने फोन केला की, तुमची मुलगी इथे नाही. 19 तारखेला मला पुन्हा फोन आला की, अंकिता आज सकाळी कुठे गेली होती माहिती नाही. वास्तविक 18 तारखेपासूनच तिचा पत्ता नव्हता. तीचा फोनही बंद होता.

मला वाटतेय की, 19 तारखेलाच तीचा खून झाला होता. तिथे गेल्यावर कळले. रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य आणि व्यवस्थापक सौरभ भास्कर त्याच दिवशी पळून गेले. तत्पूर्वी दोघेही मला पटारी चौकीत भेटले होते. पुलकित दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता, पण मी डगमगलो नाही. माझी मुलगी बेपत्ता होती.

प्रश्न : या प्रकरणात कुठे चूक झाली, तुम्ही रिसॉर्टमध्ये गेलात, तेव्हा तुम्हाला काय कळले?

उत्तर : प्रशासनाने पूर्ण सहकार्य केले. पटवारी यांनी माझी तक्रार लिहिली नाही. मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचे नाव विवेक कुमार असे आहे. असा प्रकार घडल्याचे त्याला माहीत होते. तो 20 तारखेला रजेवर गेला आणि विनोद कुमार याच्याकडे पदभार दिला.

20 तारखेला सकाळी 11 च्या सुमारास मी त्याच्याकडे गेलो. माझ्या आधी रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, मॅनेजर सौरभ भास्कर, पुलकितची पत्नी आणि वडील विनोद आर्य तेथे होते. गेट लावलेले होते आणि ते चौकीच्या आत बसलेले होते. मला थोडे थांबायला सांगण्यात आले. मी अडीच तास बाहेर चकरा मारत राहिलो. यानंतर मला राग आला, म्हणून मी सरळ आत जाऊ लागलो. मग त्याने मला बोलावले आणि विचारले काय काम आहे.

मी अंकिता भंडारीचे वडील असून मला तक्रार करायची असल्याचे त्यांना सांगितले. यावर पटवारी विवेक कुमार यांनी तुमची तक्रार लिहू शकत नसल्याचे म्हणाले. हे तुमच्या आधी आले आहेत, त्यामुळे मला आधी त्यांची तक्रार लिहावी लागेल, असेही तो म्हणाला. त्यानंतर आमचा वाद झाला. मी म्हणालो- ठीक आहे. तीन आरोपी आहेत, ज्यांच्यावर मला संशय आहे. त्यांच्या विरोधात मी अर्ज करतो. तुम्ही मला पोच पावती द्या. तर ते म्हणाले मी, तुम्हाला पावती कशी देणार.

तेव्हा पुलकित आर्य म्हणाले की, तुम्ही रिसॉर्टवर या. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही कळेल. संध्याकाळी 5 च्या सुमारास आम्ही हॉटेलवर पोहोचलो. पटवारीही आमच्या सोबत होते. मी पुलकित आर्यला म्हणालो की, तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे चालू करा, मग तो म्हणू लागला की, तीन महिन्यांपासून काम सुरू आहे, सर्व ठिकाणी पसराच-पसारा झाला आहे. जागोजागी वायर कापल्याचे दिसत होते.

पटवारी मला फिरवत असल्याने मला पटवारी आणि आरोपीवर संशय येऊ लागला. आम्ही हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना बोलावले. त्यांनी आम्हाला सर्व काही सांगितले. या सर्वांची ऑडिओ-व्हिडीओही बनवलेला होता. मी पटवारीच्या कानावर फोन लावला. म्हणालो- हे ऐका, हे तिघे आहेत. त्यांनी हे सर्व केले आहे. यानंतर चौघांचेही चेहरे पडले.

त्यावर मी कोटा अहवाल पाठवतो, त्यानंतर पौडी येथून अहवाल येईल, असे पटवारीने सांगितले. मी लगेच पौडीला फोन केला. सोहनसिंग रावत आधी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष होते. रात्री 9.30 वाजता त्यांनी पटवारीला फोन केला. तुम्ही तक्रार का लिहिली नाही, अशी विचारणा त्यांनी केली.

यानंतर मी रितू खंडुरी (विधानसभा अध्यक्ष) यांना फोन केला. ते लगेच डीएमशी बोलले. मग एसपीला फोन केला. यानंतर प्रशासन सक्रिय झाले आणि प्रकरण वर्ग करण्यात आले.

या प्रकरणाशी संबंधित खालील बातम्या देखील वाचा...

गरीब आहे म्हणून स्वतःला 10 हजारात विकू का:अंकितावर गेस्टला स्पा सर्व्हिस देण्याचा होता दबाव, मित्रासोबतच्या चॅटमधून खुलासा

दिव्य मराठीच्या हाती अंकिताचे काही चॅट्स लागलेत. त्यात अंकिताने आपल्या मित्राला सांगितले होते की, तिच्यावर रिसॉर्टमध्ये येणाऱ्या VIP पाहुण्यांना स्पा सर्व्हिस देण्यासाठी दबाव टाकला जात आहे. तिच्यावर बळजबरी करण्यात आली. प्रॉस्टिट्यूट अर्थात वेश्या बनण्यासाठी 10 हजारांचे आमिष दाखवण्यात आले. तुला पाहुण्यांना हँडल करावे लागेल. नाही तर तुला काढून टाकले जाईल, असे तिला सांगण्यात आले होते.

पूर्ण बातमी वाचा...

अंकिता खून प्रकरण:अंकितावर ‘अतिरिक्त सेवे’चा दबाव कुणाचा?', ज्यातून तिची हत्या घडली; आराेपींच्या बचावासाठी यंत्रणा?

१९ वर्षीय अंकिता भंडारीच्या हत्येपासून ते अंत्यसंस्कारापर्यंत असे अनेक मुद्दे आहेत, ज्यातून गंभीर प्रश्न उपस्थित हाेतात. वास्तविक, भाजपचे माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित हत्येनंतर ४ दिवस पोलिसांच्या ताब्यात नव्हता. त्याचा शोधही घेतला गेला नाही. फोटो व्हायरल हाेताच लोक रस्त्यावर उतरले, तेव्हा रोषापासून वाचवण्यासाठी कुटुंबीयांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याच माहितीवरून अंकिताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या वेळी भाजपच्या महिला आमदार खूप सक्रिय होत्या. पोलिसांच्या दिरंगाईशी संबंधित असे अनेक मुद्दे आहेत, ज्यांची उत्तरे पोलिस आणि प्रशासनाकडे नाहीत.

पूर्ण बातमी वाचा

बातम्या आणखी आहेत...