आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅकबोर्डमृत्यूची प्रतीक्षा करताहेत बनारस मधील विधवा:मुलाने मुलीला जाळले, जमीन बळकावली; 110 रुपये देत घराबाहेर काढले

बनारसच्या विधवा आश्रमातून मनीषा भल्लाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्याकडे पाच एकर जमीन आणि पाच पक्क्या खोल्या होत्या. पतीने आमच्य मुलाच्या नावे साडेतीन एकर जमीन आणि धाकट्या मुलीला अर्धा एकरपेक्षा थोडी कमी जमीन दिली. तर एक एकर जमीन स्वत:च्या नावावर ठेवली. त्यांच्या मृत्यूनंतर मुलाने जमिनीच्या लालसेपोटी मुलीला जाळून टाकले. जबरदस्तीने माझी सर्व मालमत्ता लिहून घेतली आणि 110 रुपये देऊन मला घराबाहेर काढले.

असे सांगताना 70 वर्षीय इंद्रासन देवी रडायला लागल्या. बनारसमधील मणिकर्णिका घाट येथील एका विधवाच्या आश्रमात त्या राहतात. त्या सांगतात की, मी केवळ म्हणायला जगतेय, पण आमची अवस्था जिवंत प्रेतासारखी आहे. ना माझा हक्क मिळाला, ना कुटुंबाचा किंवा समाजाचा पाठिंबा मिळाला.

इंद्रासन देवीप्रमाणेच बनारसमधील हजारो विधवा मरणाच्या प्रतीक्षेत चार भिंतीच्या आत गुदमरत आहेत. जणू त्यांच्या सर्व इच्छा त्यांच्या पतीच्या चितेवरील राखेसोबत वाऱ्यावर उडून गेल्या होत्या. या विधवांची स्थिती जाणून घेण्यासाठी मी मणिकर्णिका घाट येथील बिर्ला विधवा आश्रमात पोहोचले.

अंदाजे 7x7 ची खोली. त्यातच झोपायला जागा आणि स्वयंपाकघरही तेच. येथे मी 43 वर्षीय अन्नपूर्णा यांना भेटले. त्या या आश्रमातील सर्वात कमी वयाच्या विधवा आहेत. पहिल्या मजल्यावर बांधलेल्या या आश्रमात सध्या 6 विधवा राहत आहेत. येथे पुरुषांना प्रवेश नाही आणि आश्रमाच्या व्यवस्थापनातही पुरुष नाही.

ही अन्नपूर्णाची खोली आहे. भिंतीवर तिच्या पतीचा फोटो आहे. या घराला काही दिवसांपूर्वी रंगरंगोटी करण्यात आली होती, कारण ओलसर भिंतींचा फोटो मीडियामध्ये आला होता.
ही अन्नपूर्णाची खोली आहे. भिंतीवर तिच्या पतीचा फोटो आहे. या घराला काही दिवसांपूर्वी रंगरंगोटी करण्यात आली होती, कारण ओलसर भिंतींचा फोटो मीडियामध्ये आला होता.

अन्नपूर्णा सांगतात की, 'आश्रम तर आश्रमच आहे, कोणाला येथे राहायला आवडेल, पण बाहेरचे जग हे एका स्त्रीचं जग नाही. 12 वर्षांपूर्वी मी विधवा होऊन इथे आलो तेव्हा मला रोज फोन यायचे, लोक घाणेरडे बोलायचे.

माझ्या पतीच्या निधनानंतर सासरच्या लोकांनी मला घराबाहेर हाकलून दिले. यानंतर मी माझ्या वडिलांच्या घरी गेले आणि तिथेच राहत होते, पण वर्षभरानंतर त्यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर तेथे राहणे कठीण झाले.

सख्खी आत्या आणि काका म्हणायचे की, आज जरी आम्ही तुला ठेवून घेतले तरी आमच्या मृत्यूनंतर मुले तुला हाकलून देतील, म्हणून तू विधवा आश्रमात गेलेलं बरे. माझ्या आत्याच्या मुलानेच मला या आश्रमात ठेवण्यासाठी सर्व कार्यवाही केली होती.

काही वर्षांपूर्वी पित्ताशयात खडे झाले होते. रुग्णालयातील डॉक्टर ऑपरेशनसाठी 20 हजार रुपये मागत होते. कसेबसे मी 15 हजार रुपयांसाठी हॉस्पिटलमध्ये बोलले, पण तेथील डॉक्टरांनी ऑपरेशनच्या नावाखाली माझ्या अन्ननलिकेतील आतडी जोडली. त्यानंतर जीवन नरक बनले.

कर्ज काढून उपचार केले, पण आजही मी आजारी आहे. डाळी आणि भाज्या खाऊ शकत नाही, फक्त उकडलेले अन्न खावे लागते. मासिक औषध 8 हजार रुपयांना येते, मात्र पैशाअभावी 4 हजार रुपयांत मी एक वेळचे औषध घेतो.

आश्रमात प्रत्येक विधवा महिलेला महिन्याचे रेशन मोफत मिळते, पण दूध आणि औषधे स्वत: खरेदी करावी लागतात.

आश्रमात महिला सकाळ संध्याकाळ पूजा करतात. त्यानंतर गायीला प्रसाद खाऊ घातला जातो. त्यानंतर त्या त्यांच्या कामात व्यस्त होतात.
आश्रमात महिला सकाळ संध्याकाळ पूजा करतात. त्यानंतर गायीला प्रसाद खाऊ घातला जातो. त्यानंतर त्या त्यांच्या कामात व्यस्त होतात.

काही वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध उद्योजक बिंदेश्वर पाठक यांनी हा आश्रम दत्तक घेतला, तेव्हापासून प्रत्येक विधवा महिलेला महिन्याला दोन हजार रुपये मिळतात, पण अन्नपूर्णा यांना विशेषत: महिन्याला 5 हजार रुपये मिळतात, जेणेकरून त्या स्वत:साठी औषध खरेदी करू शकतात.

विधवांना स्वतःचा सैपाक स्वतः करावा लागतो. तर एखाद्या विधवा महिलेचे शरीर काम करत नसेल तर, त्यांच्यातीलच एक विधवा त्या महिलेसाठी सैपाक करते. बिंदेश्वर पाठक यांच्या संस्थेने येथे इन्व्हर्टरची व्यवस्था केली आहे, मात्र ट्रस्टकडून फ्रिज किंवा टीव्ही मिळालेला नाही, तसेच ठेवण्यासही परवानगी नाही.

यानंतर मी 73 वर्षांच्या शकुंतला देवींना भेटले. त्या 16 वर्षांपासून येथे राहतात. लग्नाच्या 18 वर्षांनंतर त्यांच्या पतीचे कर्करोगाने निधन झाले. त्या पाच वर्षे आग्रा येथे सासरच्यांसोबत राहिल्या, पण या काळात सासरच्या लोकांनी त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले.

त्यांच्या जावेने ना त्याला खायला दिले, ना मुलीला. वरून वाटेल तेव्हा ती मुलीला बेदम मारहाण करायची.

शकुंतला सांगतात की, 'मी कोणत्याही प्रकारे दुःखात जगू शकले असते, पण माझ्या मुलीसोबत जी मारहाण होत होती, ती मला सहन होत नव्हती. मी तर वीज बिल सुद्धा देत असे.’

एवढेच नाही तर घर बांधण्यासाठी 5 हजार रुपये दिले, पण मुलगी 15 वर्षांची झाल्यावर तिचे लग्न करावे लागेल, असे त्यांना वाटू लागले, म्हणून त्यांनी मला आणि मुलीला घराबाहेर हाकलून दिले.

शकुंतला सांगतात की, 'जे शिकलेले आहेत, ते काही काम तरी करतात, पण आमच्या सारख्या लोकांचे जीवन मातीमोल आहे. आम्ही काय करू शकतो? जर कोणी लाथ मारली तर रडत बसू. आश्रमातही आम्हाला जसे ठेवले जाते, तसे आम्ही आयुष्य घालवतो. मी आणखी काय करणार, आम्हा विधवांना जीवन नसते. आम्ही फक्त मृत्यूची वाट पाहत जगतो.

70 वर्षीय इंद्रासन देवी मूळच्या बिहारच्या बेगुसराय येथील आहेत. त्या सांगतात की, त्यांच्याकडे दहा बिघा म्हणजेच पाच एकर जमीन आणि पाच पक्क्या खोल्या होत्या. पतीने मुलाला साडेतीन एकर, धाकट्या मुलीच्या नावावर सुमारे अर्धा एकर जमीन केली. तर एक एकर जमीन आमच्यासाठी ठेवली होती.

त्यांच्या मृत्यूनंतर मी मोठ्या मुलीच्या नावे काही जमीन केली. मुलाला ही बातमी कुठून मिळाली माहीत नाही. यानंतर त्याने आणि सुनेने आमचे जगणे कठीण केले होते.

मोठी मुलगी नोकरीच्या तयारीसाठी आमच्या घरी राहायची. जमिनीच्या वादातून मुलाने रॉकेल ओतून तीला जाळण्याचा प्रयत्न केला. मुलगीही थोडी भाजली होती, त्यानंतर मी तिला रुग्णालयात नेले.

तोपर्यंत मुलगाही तिथे पोहोचला. डॉक्टरांना पटवून त्यांनी मुलीला मृत घोषित केले. आणि तीला बदलापूर घाटावर घेऊन जात असल्याचे सांगितले. रस्त्यात त्याने मुलीला माझ्यासमोर नदीत फेकून दिले.

यानंतर मी लहान मुलीकडे गेलो, मात्र तेथेही भांडण झाले. मग मी मुलाकडे परत आले. एके दिवशी त्याने माझ्यावर हात उचलला.

बळजबरीने सर्व जमीन आणि मालमत्ता त्याच्या नावावर करून घेतली आणि 110 रुपये देऊन मला घराबाहेर हाकलून दिले. अनेक दिवस मी बेगुसरायमध्येच इकडे तिकडे भटकत होते. आता मी माझ्या मुलीच्या मदतीने या आश्रमात पोहोचले आहे.

इंद्रासन देवी सांगतात की, पतीच्या निधनानंतर मी घरात मोलकरणी प्रमाणे काम करत होते, पण मुलगा आणि सून मला ओझं मानत होते.
इंद्रासन देवी सांगतात की, पतीच्या निधनानंतर मी घरात मोलकरणी प्रमाणे काम करत होते, पण मुलगा आणि सून मला ओझं मानत होते.

येथून मी ललिता घाटावरील पशुपतीनाथाच्या नेपाळी मंदिराकडे निघाले. लाकडापासून बनवलेल्या या मंदिरात चार पायऱ्या चढून गेल्यावर एका सभामंडपात पोहोचले. कमी प्रकाश, जमिनीवर विखुरलेल्या वस्तू, शेजारील बेड आणि आजारी महिला. एकच हॉल आहे, जिथे सात विधवा राहतात. सोबत आश्रमाची काळजी घेणारे पुरुष.

सुमारे 300 वर्षे जुने हे मंदिर नेपाळ सरकार चालवते.

नेपाळी मंदिरात एकाच हॉलमध्ये 7 विधवा राहतात. यामध्ये खाणे-पिणे आणि झोपणेही होते. त्या खाटेखाली सर्व पीठ आणि तांदूळ तसेच इतर साहित्य ठेवतात.
नेपाळी मंदिरात एकाच हॉलमध्ये 7 विधवा राहतात. यामध्ये खाणे-पिणे आणि झोपणेही होते. त्या खाटेखाली सर्व पीठ आणि तांदूळ तसेच इतर साहित्य ठेवतात.

गोपाल प्रसाद हे या मंदिराचे व्यवस्थापक आहेत. ते सांगतात की, इथे महिलांना खाणे, पिणे आणि राहणे मोफत आहे. रोख पैसे मिळत नाहीत आणि त्याची गरजही नाही. याआधी आश्रमात त्यांच्यासाठी स्वतंत्र इमारत होती, मात्र ती कोसळल्यानंतर त्यांना येथे हलवावे लागले.

ते सांगतात की, 'अनेक स्त्रिया मृत्यूच्या इच्छेने काशीला येतात तर काही मोक्ष मिळावा म्हणून तर अनेक मजबुरीने.'

या विधवांच्या अनेक व्यथा आहेत. त्यांनी चांगायला सुरूवात केली की, वेळ कुठे जातो कळतही नाही. जसे शालीचा एक दोरा उघडला तर पूर्ण धागे आपोआप उलगडत जातात, त्याच प्रमाणे. मात्र, जगाला त्यांचे दुख: माहितीच होत नसावे. कारण इथे राहणाऱ्या लोकांचे आवाज चार भिंतीच्या उंच भिंतीतून बाहेर पडत नाहीत.

देशात 5 कोटी विधवा, वृंदावन आणि बनारसमध्ये सर्वाधिक

बनारसमधील बहुतांश विधवा वृद्ध आहेत. घरातून बेदखल केल्यानंतर आता ते इथे मंदिरात बांधलेल्या आश्रमात राहतात. येथे पूजा करून त्या मोक्षाचा मार्ग शोधत आहेत.
बनारसमधील बहुतांश विधवा वृद्ध आहेत. घरातून बेदखल केल्यानंतर आता ते इथे मंदिरात बांधलेल्या आश्रमात राहतात. येथे पूजा करून त्या मोक्षाचा मार्ग शोधत आहेत.

व्ही मोहिनी गिरी या विधवा संघटनेच्या संस्थापक आहेत. त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाही होत्या. देशात 5 कोटींहून अधिक विधवा आहेत, असे सांगितले जाते. बहुतेक विधवा वृंदावन, गया, बनारस येथे राहतात. बनारसमध्ये सध्या त्यांची संख्या चार हजारांच्या जवळपास आहे.

2018 मध्ये केंद्र सरकारने बनारसमध्ये एक हजार विधवा आश्रम स्थापन करण्याची घोषणा केली होती, मात्र आजपर्यंत त्याचा विशेष परिणाम दिसून येत नाही. बहुतेक आश्रम मंदिरांचे आहेत.

या विधवा बनारसमधील नेपाळी आश्रम, बिर्ला आश्रम, लालमुनी आश्रम, मुमुक्षु भवन, अपना घर, आशा भवन, माँ सर्वेश्वरी वृद्धाश्रम, रामकृष्ण मिशन, शासकीय वृद्धाश्रम दुर्गाकुंड, भटुआ वृद्धाश्रम, मदर तेरेसा आश्रम, शिवा आदी आश्रमांमध्ये राहतात. .

आश्रमात राहणे आणि खाणे, पैशासाठी भीक मागण्याचा पर्याय

बनारसमधील ललिता घाट येथे नेपाळी आश्रमाबाहेर पूजा करताना एक विधवा. तीला पाहिल्यावर वाटते की, तिला तिची वेदना सर्वांना सांगायची आहे, परंतु ऐकण्यासाठी कोणीच नाही.
बनारसमधील ललिता घाट येथे नेपाळी आश्रमाबाहेर पूजा करताना एक विधवा. तीला पाहिल्यावर वाटते की, तिला तिची वेदना सर्वांना सांगायची आहे, परंतु ऐकण्यासाठी कोणीच नाही.

देशातील विधवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत केंद्र सरकार विधवांना दरमहा 300 रुपये देते. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात येते. याशिवाय यूपी सरकार दरमहा 400 रुपये देते, पण वृंदावन आणि बनारसच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. बनारसच्या आश्रमात या विधवांना खाण्याची आणि राहण्याची सोय आहे. बिर्ला आश्रमातही महिन्याला दोन हजार रुपये मिळतात, पण इतर आश्रमात रोख मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेक महिला भीक मागून उदरनिर्वाह करतात.

बनारसच्या विधवा मरणाच्या प्रतीक्षेत

व्ही मोहिनी गिरी सांगतात की, आमची संस्था या विधवांच्या पुनर्विवाहासाठी काम करते. आम्ही आतापर्यंत 7 हजारांहून अधिक विधवांची लग्ने केली आहेत.

वृंदावनातील बहुतेक विधवा तरुण वयाच्या आहेत, त्यांची लग्नेही होतात, पण बनारसच्या बहुतेक विधवा वयाच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. दिवसेंदिवस त्या मृत्यूची वाट पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...