आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकटात बाप्पाचे स्वागत:आज लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन; सकाळी 7.41 पासुन रात्री 8.17 पर्यंत प्रतिष्ठापेनेचे विविध मुहूर्त

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आज शनिवारी गणेश चतुर्थी असुन राज्यभरात घरोघर लाडक्या विघ्नहर्त्याचे स्वागत होत आहे.आज गणपतीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी सकाळी ७.४१ ते रात्री ८.१७ मिनिटापर्यंत वेगवेगळे मुहूर्त आहेत. सकाळी साडेनऊ पर्यंत शुभ मुहूर्त आहे तर दुपारी साडेबारा ते दोन वाजून पाच मिनिटापर्यंत अभिजीत मुहूर्त आहे. दुपारी ३.४० ते सव्वापाच वाजेपर्यंत अमृत योग मुहूर्त आहे.त्यामुळे दिवसभर वेगवेगळे मुहुर्त असल्याचे बीड येथील ज्योतिष विशारद संतोष मुळे यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगीतले

सकाळी ७.४१ ते ९.२९ शुभ मुहूर्त

आज हस्त नक्षत्र साध्य योग असुन वणीज करण आहे. पार्थिव गणेश पुजन करतांना गणेश भक्तांनी आधी पूजेची पूर्ण तयारी करून नंतरच या मुहूर्तावर लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करावी. ९.३० ते साडे बारा या काळात भद्रा आहे परंतु भद्रा ही पूर्णत: अशुभ मानली जात नाही. भद्र म्हणजे शुभ होय परंतु भद्रेचे मुख अशुभ मानले जाते व उर्वरीत काळ शुभ मानला जातो .तसेच आज सकाळी नऊ ते साडेदहा राहु काळ आहे परंतु राहु काळ हा केवळ नवीन कार्यारंभ व खरेदी विक्री तसेच महत्वाचे मदार यांच्या करीता अशुभ मानल्या जातो. परंतु विघ्नहर्ता गजाननाच्या प्राण प्रतिष्ठेकरीता या राहु काळाचा विधी निषेध मानुन नये.ज्योतिष विशारद सूर्यकांत (संतोष) मुळे यांनी सांगीतले आहे.

१२.३० ते २.०५ अभिजीत मुहूर्त

हा मध्यम दर्जाचा मुहूर्त असुन वृश्चिक लग्न असुन व हा देखील चांगला मुहूर्त मानल्या जातो.या मुहूर्तावर गणेश भक्तांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी याला माध्यान्ह काळातील अभिजीत मुहूर्त म्हणतात

३.४० ते ५.१५ अमृत योग

शनिवारी दुपारी वरील वेळेतील योग हा अमृतयोग असुन गणेश भक्तांनी या मुहूर्तावर देखील प्राण प्रतिष्ठा करावी .संध्याकाळी ६.५२ रात्री ८.१७ मिनिटापर्यंत लाभ मुहूर्त आहे. लाभ वेळेत गणेश प्रतिष्ठापणा व पुजन केल्यास सुख शांती, समृध्दी समाधान हे मिळते. विघ्नहर्ता गणेश कोरोना सारख्या वैश्विक महामारीत सर्वांचे रक्षण करण्यास समर्थ आहे.

बातम्या आणखी आहेत...