आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हचंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानाची कहाणी:वीरभद्र तिवारीने केला होता आझाद यांचा विश्वासघात

अमरीश शुक्ल6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हणून आम्ही स्वतंत्र आहोत... या मालिकेच्या आठव्या कथेत वाचा चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानाची कहाणी....

27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील आनंद भवनात जवाहरलाल नेहरूंना भेटल्यानंतर चंद्रशेखर आझाद थेट अल्फ्रेड पार्कला गेले. आझाद यांची HSRA ही संस्था विघटित होत होती. भगत सिंग तुरुंगात होते आणि त्यांना फाशीपासून वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होत होते.

ज्यांना 'बहुरूपिया' म्हटले जायचे असे होत चंद्रशेखर आझाद. त्यांचे केवळ छायाचित्र काढण्यात इंग्रजांनाच घाम फुटला होता, त्यांना आपल्याच जोडीदाराने केलेला विश्वासघात लक्षात आला नाही. त्यांचा जुना मित्र वीरभद्र तिवारी याने आझाला यांना पाहिले आणि पोलिस अधिकारी शंभूनाथ यांना ही बातमी दिली.

आताच्या प्रयागराजमधील आनंद भवन हे मोतीलाल नेहरूंनी बांधले होते. 1930 मध्ये त्यांनी ते देशाला अर्पण केले. येथेच आझाद नेहरूंना भेटले.
आताच्या प्रयागराजमधील आनंद भवन हे मोतीलाल नेहरूंनी बांधले होते. 1930 मध्ये त्यांनी ते देशाला अर्पण केले. येथेच आझाद नेहरूंना भेटले.

आझाद यांच्या ही बाब लक्ष्यात येण्याच्या आधीच 80 सशस्त्र पोलिसांनी आल्फ्रेड पार्कला तिन्ही बाजूंनी घेरले. खूप गोळ्या झाडल्या. आझाद खंबीरपणे उभे होते. मात्र, त्यांना 5 गोळ्या लागल्या होत्या आणि तो गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या आवडीच्या कोल्ट पिस्तुलमध्ये अखेरची गोळी गोळी शिल्लक राहिल्याने ते शहीद झाले, पण ते ब्रिटिशांच्या हाती लागले नाही. आझाद अनेकदा गाणे गुणगुणत - 'दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद हैं, आजाद ही मरेंगे'. अखेर त्यांचे हे वाक्यही खरे ठरले.

मी सध्या त्याच अल्फ्रेड पार्कमध्ये म्हणजेच आता चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये उभा आहे, जिथे आझाद यांनी हौतात्म्य पत्करले. त्याच्या हौतात्म्याने इंग्रज इतके घाबरले होते की, ज्या जामुनच्या झाडाच्या मागे लपून त्यांनी 32 मिनिटे गोळ्यांचा सामना केला, ते झाडही कापण्यात आले. वास्तविक आझादच्या हौतात्म्यानंतर लोकांनी या झाडाची पूजा करून इथल्या मातीचा टिळा लावायला सुरुवात केली होती.

आता त्या ठिकाणी एक नवीन आणि बहरलेले जांभळाचे झाड आहे, जे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यूपी सरकारने लावले होते. ते कधी लावले गेले, याची कोणतीच नोंद नाही.

या जांभळाच्या झाडाजवळ चंद्रशेखर आझाद यांचा पुतळाही आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या मिशांना ताव देतांना दिसतात. अलाहाबाद म्युझियमही याच उद्यानात आहे. जिथे आझाद यांचे पिस्तूल ठेवलेले आहे, ज्याने त्यांनी कपाळावर अखेरची गोळी झाडली आणि इंग्रजांच्या हातात कधीच लागणार नाही, हे त्यांचे वचन पूर्ण केले.

आझाद त्याच्या कायमच्या शैलीत मिशावर ताव मारतांना दाखवण्यात आले आहे. चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये त्यांचा हा पुतळा बसवण्यात आला आहे. हे उद्यान उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे उद्यान आहे.
आझाद त्याच्या कायमच्या शैलीत मिशावर ताव मारतांना दाखवण्यात आले आहे. चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये त्यांचा हा पुतळा बसवण्यात आला आहे. हे उद्यान उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे उद्यान आहे.

इंग्रज अधिकाऱ्यांनीच केला वीरभद्रच्या विश्वासघाताचा पर्दाफाश

चंद्रशेखर आझाद यांचा खबरी कोण, हा प्रश्न अनेक वर्षे कायम होता. वीरभद्र तिवारी आणि यशपाल यांच्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह असायचे. वास्तविक, आल्फ्रेड पार्कमध्ये आझादला घेरलेल्या 40 जणांच्या सशस्त्र दलाचा भाग असलेल्या अधिकाऱ्याच्या वैयक्तिक डायरीमध्ये वीरभद्र हा देशद्रोही असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अलाहाबाद संग्रहालयाचे क्युरेटर डॉ. राजेश मिश्रा यांच्या मते, "आमच्या लायब्ररीत धर्मेंद्र गौर यांच्या वैयक्तिक डायरीवर आधारित एक पुस्तक आहे. ‘आजाद की पिस्तौल और उनके गद्दार साथी’ असे त्याचे शीर्षक आहे. धर्मेंद्र गौर हे त्यावेळी ब्रिटीश सशस्त्र दलाच्या गुप्तचर शाखेत सामील होते. या पुस्तकात जे काही नोंदवले आहे ते ते रोज लिहीत असलेल्या डायरीतील उतारे आहेत. हा एक अस्सल दस्तऐवज आहे.

या डायरीत गौर लिहितात- 27 फेब्रुवारी 1931 रोजी आझाद अल्फ्रेड पार्कला पोहोचण्यापूर्वी जवाहरलाल नेहरूंना भेटण्यासाठी आनंद भवनात गेले होते. यानंतर ते सुखदेव राजसोबत सकाळी 9 वाजता अल्फ्रेड पार्कमध्ये पोहोचले. भगतसिंगांना वाचवण्यासाठी आणि विस्कळीत झालेल्या संघटनेची पुनर्बांधणी करण्यासाठी येथे चर्चा सुरू होती.

वीरभद्र तिवारी यांनी इंग्रजांना दिली होती माहिती

डायरीत नोंदवलेल्या माहितीनुसार, वीरभद्र तिवारी यांनी आझाद आणि सुखदेव राज यांना उद्यानात पाहिले होते. तो ताबडतोब पोलिस अधिकारी शंभूनाथ यांच्याकडे पोहोचला आणि म्हणाला – पंडितजी (चंद्रशेखर आझाद) अल्फ्रेड पार्कमध्ये आहेत. आझाद उद्यानात असल्याची माहिती शंभूनाथने ब्रिटीश अधिकारी मेजरला दिली. रिझर्व्ह पोलिस लाइन्स अलाहाबाद येथे सकाळच्या परेडनंतर, सार्जंट टिटर्टन रिजर्व्ह हे निरीक्षकांच्या कार्यालयात बसून काही कागदपत्रे पाहत होते. अचानक रात्री नऊ वाजता टेलिफोनची बेल वाजली.

'आजाद की पिस्तौल और उनके गद्दार साथी' या पुस्तकात वीरभद्रनेच आझादचा विश्वासघात केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
'आजाद की पिस्तौल और उनके गद्दार साथी' या पुस्तकात वीरभद्रनेच आझादचा विश्वासघात केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

पोलिस अधीक्षक मेजरच्या फोनवर होते. सशस्त्र दलाच्या 80 सैनिकांना अर्ध्या मिनिटात अल्फ्रेड पार्कमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले. 40 सशस्त्र माणसे आणि 40 लाठ्या घेऊन सैनिक आल्फ्रेड पार्कच्या दिशेने धावले. उपअधीक्षक विश्वेश्वर सिंह यांच्यासह पोलिस अधीक्षक (विशेष शाखा) नॉट बावर हे देखील काही वेळातच त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या अ‍ॅम्बेसेडर कारमधून अल्फ्रेड पार्कमध्ये पोहोचले.

तत्पूर्वी पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांनी उद्यानाला तिन्ही बाजूंनी वेढा घातला होता. अचानक नॉट बावर, विश्वेश्वर सिंह यांना सोबत घेऊन उद्यानात घुसले आणि त्यांनी आझाद यांच्यावर गोळीबार केला. गोळी आझादच्या उजव्या मांडीला लागली आणि हाड मोडून बाहेर गेली.

आझादच्या 'बमतुल बुखारा'ने तोडले बावरचे मनगट आणि विश्वेश्वरचा जबडा

धर्मेंद्र गौर आपल्या डायरीत लिहितात – आझादला समजले होते की, तो येथून पळून जाता येणार नाही. त्यांनी आधी सुखदेवला तिथून पाठवले आणि खिशातून पिस्तूल काढायला लागले. त्याच वेळी विश्वेश्वर सिंगने दुसरी गोळी झाडली जी आझादच्या उजव्या हाताला छेदून फुफ्फुसात गेली. आझादनेही प्रत्युत्तर देत नॉट बावर यांची गाडी पंक्चर केली.

यानंतर आझाद यांची कोल्ट सेमी-ऑटोमॅटिक गन, ते जीला 'बमतुल बुखारा' देखील म्हणायचे, तीचा करीश्मा दिसला आणि एका गोळीने नॉट बावरचे मनगटात मोडले. डायरीनुसार आझादने 10 राउंड फायर केले होते. दुसरे मॅगझीन लोड केल्यावर आझाद यांनी जोरात गर्जना केली. ते म्हणाले- 'अरे ब्रिटिश सरकारचे गुलाम. मर्दा सारखा बाहेर का येत नाहीस? माझ्यासमोर कायरा सारखा का लपून बसला आहेस?

आझादवर गोळीबार करण्यास भारतीय जवानांचा नकार

गौर पुढे लिहितात - आझाद यांना अनेक गोळ्या लागल्या होत्या. मात्र तरी देखील तो मागे हटायला किंवा आत्मसमर्पण करायला तयार नव्हता. यादरम्यान अनेक भारतीय सैनिकांनी आदेश असूनही आझाद यांच्यावर गोळीबार केला नाही आणि हवेत गोळीबार करत राहिले. या सैनिकांना नंतर बडतर्फ करण्यात आले. दुसरीकडे विश्वेश्वर सिंगने आझादला पुढे येण्याचे आव्हान दिले, मात्र त्यानंतर आझादची एक गोळी त्याचा जबडा फोडून निघून गेली.

तोपर्यंत आझादने 39 राऊंड फायर केले होते. आता त्याच्याकडे शेवटची गोळी शिल्लक होती. त्यामुळेच त्यांनी हौतात्म्य पत्करले. मात्र, आझाद यांच्या हौतात्म्याचाही वाद सुरू आहे. आल्फ्रेड पार्कवर इंग्रजांना सामोरे जाताना त्याने प्रथम इंग्रजांवर पाच गोळ्या झाडल्या आणि नंतर सहाव्या गोळीने स्वतःला ठार मारले असा एक दावा आहे.

आझाद शहीद झाल्यानंतरही त्यांचा मृत्यू झाला, यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. आधी त्यांनी आझाद यांच्या अंगावर गोळ्या झाडल्या, त्यानंतर ते आझाद यांच्या जवळ गेले.
आझाद शहीद झाल्यानंतरही त्यांचा मृत्यू झाला, यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. आधी त्यांनी आझाद यांच्या अंगावर गोळ्या झाडल्या, त्यानंतर ते आझाद यांच्या जवळ गेले.

आणखी एका दाव्यानुसार, पोलिसांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिले की, - आझाद यांच्याकडे 1903 मॉडेलचे एक कोल्ट रिव्हॉल्व्हर, 16 जिवंत आणि 22 रिकामी काडतुसे आणि 448 रुपये सापडले. आझाद यांनी स्वतःवर गोळी झाडली नाही. असेच आझाद यांचे सहकारी आणि क्रांतिकारक शचिंद्रनाथ बक्षी यांनीही सांगितले.

आझाद यांचे पोस्टमॉर्टम सिव्हिल सर्जन लेफ्टनंट कर्नल टाऊनसेंड यांच्या देखरेखीखाली करण्यात आले आणि त्यांचे सहाय्यक म्हणून डॉ. गांडे आणि डॉ. राधेमोहन लाल हे होते. आझादने स्वत:वर गोळी झाडली असती तर त्याच्या डोक्यावरील बहुतांश त्वचा आणि केस जळाले असते, असा दावा त्यांनीही केला आहे. नंतर जॉन नॉट बॉवर म्हणाले की - 'त्याच्यावर (आझाद) कोणी गोळीबार केला की, पहिल्या जखमांमुळेच त्याचा मृत्यू झाला, हे मी सांगू शकत नाही.'

वीरभद्र तिवारीचे काय झाले

वीरभद्र तिवारी हा देखील आझाद यांची संघटना हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी (HSRA) च्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. संघटनेचे क्रांतिकारक रमेशचंद्र गुप्ता यांना या खबऱ्याची माहिती मिळताच त्यांनी ओराई येथे जाऊन तिवारी यांच्यावर गोळीबार केला. मात्र, तो बचावला आणि गुप्ताला अटक करण्यात आली. त्यांनी 10 वर्षांचा कारावासही भोगला.

या संपूर्ण घटनेचा दावा रमेश चंद्र गुप्ता यांनी त्यांच्या 'क्रांतीकथा' या आत्मचरित्रात केला आहे. यानंतर तिवारीचे काय झाले, कोणालाच माहिती नाही.

आझादच्या फोटोसाठी दोरोदार फिरले इंग्रज, 5 वेळा छापेही टाकले

1920 मध्ये सुरू झालेल्या गांधींच्या असहकार चळवळीत सक्रिय सहभागी झालेल्यांमध्ये आझाद यांचाही समावेश होता. त्यांना अटक करून 14 फटके मारण्याची शिक्षा झाली. त्यावेळी आझाद अवघे 15 वर्षांचे होते. बनारस मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्यानंतर आझाद यांचा बनारसमधील ज्ञानवापी येथे एका सत्कार समारंभात स्थानिक काँग्रेस नेत्यांनी सन्मान केला.

याच समारंभात आझाद यांचे स्थानिक पालक शिव विनायक मिश्रा यांनी त्यांचा फोटो काढला होता. हे चित्र मिळवण्यासाठी ब्रिटीश पोलिसांनी शिवविनायक मिश्रा यांच्या घरावर 5 वेळा छापे टाकले, मात्र त्यांनी हे चित्र मंदिरात लपवून ठेवले होते.

आझादचा विचार करताच हे चित्र सर्वप्रथम आपल्या मनात येते. हा फोटो त्याचा क्रांतिकारी साथीदार मास्टर रुद्र नारायण याने झाशीत काढला होता.
आझादचा विचार करताच हे चित्र सर्वप्रथम आपल्या मनात येते. हा फोटो त्याचा क्रांतिकारी साथीदार मास्टर रुद्र नारायण याने झाशीत काढला होता.

आझाद यांनी हे चित्र नष्ट करण्यास सांगितले होते. रुद्र नारायण यांनी निगेटीव्ह लपवून ठेवली होती. उद्या आझादबाबत काही अनुचित घटना घडली तर काहीतरी पुरावा हवा, असे त्यांना वाटत होते.

हौतात्म्यानंतर आझाद-नेहरू भेटीवर प्रश्नचिन्ह

आझादच्या हौतात्म्यानंतर, त्यांच्या आणि नेहरूंच्या भेटीनंतर, आनंद भवनातून आझाद यांची खबर इंग्रजांपर्यंत पोहोचली असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, यासंबंधी कोणताही ठोस पुरावा कधीच सापडला नाही.

या भेटीबद्दल नेहरू त्यांच्या आत्मचरित्रातही लिहितात- माझ्या वडिलांच्या निधनानंतर एक अनोळखी व्यक्ती मला भेटायला माझ्या घरी आली. त्यांचे नाव चंद्रशेखर आझाद असल्याचे मला सांगण्यात आले. मी त्यांना यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, पण दहा वर्षांपूर्वी ते असहकार आंदोलनात तुरुंगात गेले त्या वेळी त्यांचे नाव मी ऐकले होते.

सरकार आणि काँग्रेस यांच्यात करार झाला तर त्यांच्यासारखे लोक शांततेत राहू शकतील का, हे त्यांना जाणून घ्यायचे होते. केवळ हिंसक मार्गाने किंवा केवळ शांततापूर्ण मार्गाने स्वातंत्र्य मिळू शकत नाही, असा त्यांचा विश्वास होता.

हिंदी साहित्यिक यशपाल देखील त्यांचे आत्मचरित्र 'सिंहावलोकन 'मध्ये लिहितात - 'आझाद या भेटीमुळे खूश नव्हते, नेहरूंनी हिंसक आंदोलनाच्या उपयुक्ततेबद्दल शंकाच व्यक्त केली नाही, तर एचएसआरए संस्थेच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आझादच्या मृतदेहाची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 448 रुपये आणि 16 गोळ्या (पोलिस अहवालानुसार) सापडल्या. कदाचित आझाद यांच्या खिशात नेहरूंनी दिलेले पैसे असतील.

जेव्हा मी आनंद भवनात पोहोचतो तेव्हा मला दिसले की ते, आजही जसेच्या तसे इतिहासाची साक्ष देत उभे आहे. सध्या ते जवाहर लाल नेहरू स्मारक निधि नावाच्या ट्रस्टद्वारे चालवले जाते. आता त्याचे संग्रहालय झाले आहे. यामध्ये नेहरू, त्यांचे वडील मोतीलाल नेहरू, कमला नेहरू, इंदिरा गांधी यांच्याशी संबंधित वस्तू, छायाचित्रे, फर्निचर आणि इतर वस्तू जतन केलेल्या आहेत. आनंद भवन पाहण्यासाठी देश-विदेशातून अनेक पर्यटक येतात.

इंग्रजांनी आझादचे पिस्तूलही इंग्लंडला नेले होते

अलाहाबाद संग्रहालयात स्थापित आझाद गॅलरीचे सह-प्रभारी आणि व्याख्याते डॉ. संजू मिश्रा सांगतात की, संग्रहालयाच्या सेंट्रल हॉलचे मुख्य आकर्षण आझादचे पिस्तूल आहे. कोल्ट कंपनीने ते 1903 मध्ये ते तयार केले होते. देश-विदेशातून अलाहाबाद संग्रहालयात येणारा प्रत्येक पर्यटक प्रथम विचारतो- आझादची पिस्तूल कुठे आहे? मला ते पहायचे आहे.

हे पिस्तूल भारतात परतल्याचीही एक कहाणी आहे. नॉट बावरच्या निवृत्तीनंतर सरकारने त्यांना आझादची पिस्तूल भेट दिली आणि ते ती इंग्लंडला घेऊन गेले. नंतर अलाहाबादचे कमिशनर मुस्तफी यांनी बावर यांना पिस्तूल परत करण्यासाठी पत्र लिहिले, परंतु बावर यांनी प्रतिसाद दिला नाही.

नंतर, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या प्रयत्नांनंतर, बावर यांनी त्यांना भारत सरकार यासाठी लेखी विनंती करेल या अटीवर त्यांना परत करण्याचे मान्य केले. त्यांची अट मान्य करण्यात आली. आझादचे कोल्ट पिस्तूल 1972 मध्ये भारतात परत आले आणि 27 फेब्रुवारी 1973 रोजी शचिंद्रनाथ बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभानंतर लखनऊ संग्रहालयात ठेवण्यात आले.

चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या पिस्तुलाचे नाव बमतुल बुखारा असे ठेवले होते. अमेरिकन फायर आर्म बनवणाऱ्या कोल्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने 1903 मध्ये या पिस्तुलाची निर्मिती केली होती.
चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या पिस्तुलाचे नाव बमतुल बुखारा असे ठेवले होते. अमेरिकन फायर आर्म बनवणाऱ्या कोल्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने 1903 मध्ये या पिस्तुलाची निर्मिती केली होती.

आझादच्या आईला म्हटले गेले - डाकूची आई, सामाजिक बहिष्कारही

आझादच्या हौतात्म्यानंतर काही महिन्यांनी, त्यांची आई जागराणी देवी यांना समजले की ते आता राहिले नाहीत. इतिहासकार जानकी शरण वर्मा लिहितात की, 'गावातील लोकांनी आझादच्या आईवर बहिष्कार टाकला आणि तिला डकैत-दहशतवाद्यांची आई असे म्हटले गले. त्यांची अवस्था पाहून आझादांचे सहकारी सदाशिव राव यांनी त्यांना आपल्यासोबत झाशीला आणले.

जिथे त्यांनी 1951 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाशीतील बारागाव गेट स्मशानभूमीतही आजही त्यांचे स्मारक आहे.

आझादची सायकल कुठे गेली?

अलाहाबाद विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख योगेश्वर तिवारी सांगतात की, आझादची सायकल कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही. ते शहीद झाले तेव्हा झाडावर विसावलेली त्यांची सायकलही उभी होती. आझाद अलाहाबादमध्ये कोणाकडूनही सायकल मागायचे आणि दुसऱ्या दिवशी ते फोन करून त्याच ठिकाणी त्या व्यक्तीला परत देत असे, त्यामुळे इंग्रजांना त्यांचा पाठलाग करता येत नव्हता.

आझाद यांचे हौतात्म्य या गॅलरीतून जाणून घ्या

अलाहाबाद संग्रहालयात समर्पित आझाद गॅलरी तयार आहे. 10 कोटी रुपये खर्चून बांधलेली ही गॅलरी लवकरच देशाला समर्पित करण्यात येणार आहे. देशातील अशी ही पहिली गॅलरी असेल, ज्यामध्ये आझाद आणि त्यांच्या वस्तूंचे आणि त्यांच्या आठवणी ऑडिओ, व्हिडिओ, लाईट आणि साउंडच्या माध्यमातून दाखवल्या जातील. यामध्ये आझादचे पिस्तूल हे प्रमुख आकर्षण असेल. याशिवाय गॅलरीत 12 बंदुकांसह 211 शस्त्रे असतील.

संदर्भ :

  • राजेश मिश्रा, अलाहाबाद संग्रहालयाचे क्युरेटर डॉ.
  • धर्मेंद्र गौर यांचे पुस्तक- आझादचे पिस्तूल आणि त्याचे गद्दार साथीदार.
  • रमेशचंद्र गुप्ता यांचे आत्मचरित्र- क्रांतीकथा.
  • हिस्ट्री ऑफ मॉर्डन इंडिया, बिपिन चंद्र.

संपादक मंडळ: निशांत कुमार, अंकित फ्रान्सिस आणि इंद्रभूषण मिश्रा

म्हणून आम्ही स्वतंत्र आहोत......या मालिकेतील या 6 कथाही वाचा...

विस्मृतीत गेलेले नौदलाचे बंड:पटेलांनी थांबवले नसते तर गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज तोफेने उडवले असते

बारडोलीतून देशाला मिळाले 'सरदार':पटेल शेतकऱ्यांना म्हणाले, स्त्रियांशिवाय घर चालत नाही आणि तुम्ही मोठ्या सत्याग्रहाचे स्वप्न पाहता

खुदीराम यांचा ब्रिटिशांवर बॉम्ब हल्ला:वयाच्या 18व्या वर्षी फासावर, लोक त्यांच्या राखेचे ताईत घालू लागले

गांधी टोपीमुळे थांबले असहकार आंदोलन:चौरी-चौरामध्ये देणगीतून उभारले 19 हुतात्म्यांचे स्मारक

चिमूटभर मिठाने उतरवला इंग्रजांचा गर्व:गांधींजी केवळ हिंदूंचे नेते नाही, हे दांडी यात्रेतून केले सिद्ध

ब्रिटिश राजवट हादवणारा विधानसभेतील स्फोट:भगतसिंग यांचा फोटो काढणारा निघाला पोलिस फोटोग्राफर

बातम्या आणखी आहेत...