आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर शहरात सात वर्षांनंतर वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 25 फेब्रुवारी रोजी सोनेरी महलामध्ये या महोत्सवाला सुरुवात झाली. मागच्या काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोनाच्या कारणाने हा महोत्सव झाला नाही. यंदा 25, 26 आणि 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान महोत्सव पार पडला. विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकारांमार्फत शास्त्रीय आणि उपशास्रीय, गायन, शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आल्या. महोत्सवात पद्मश्री शंकर महादेवन, उस्ताद राशीद खान, गायक महेश काळे, विजय घाटे, पद्मश्री शिवमणी, रवी चारी, सेल्देन डी सिल्वा, अदिती भागवत यांनी आपल्या कला सादर केल्या आहेत.
वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले ते यातील सर्व गायक मंडळी, विशेष म्हणजे या गायक कलाकारांनी त्यांच्या मुख्य अशा शास्त्रीय गायनाचे सादरीकरण केले. विशेष बाब म्हणजे तरूणाईने मोठ्या संख्येने सर्व सादरीकरण अनुभवले. शास्त्रीय संगीत, नृत्यकला, भरतनाट्यम, कथक या सर्व पारंपरिक कलांपासून तरुणाई दूर जात असल्याचे चित्र एकीकडे असताना, युवा पिढीने महोत्सवाचा आनंद लुटत, महोत्सवाला दाद दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महोत्सवाच्या सर्वच पारंपरिक कला सादरीकरणाला तरुणाईने अत्यंत चांगला प्रतिसाद नोंदवला.
शास्त्रीय कलेचे कार्यक्रम तुलनेने कमी होत असल्याची खंत
उस्ताद राशिद खान, महेश काळे आणि शंकर महादेवन या तिन्ही शास्त्रीय गायकांच्या मैफिलींना तरुणाईने भरघोस गर्दी केली. शास्त्रीय गायनाला तरुण वर्गापर्यंत नव्या मार्गाने ही गायक मंडळी पोहचवत असल्याची प्रतिक्रिया युवावर्गाने दिली. छत्रपती संभाजीनगरात शास्त्रीय कलांचे कार्यक्रम व महोत्सव पुणे-मुंबई या शहरांच्या तुलनेने कमी होत असल्याची खंत तरुणाईनी मांडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये कलेचा मोठा चाहता वर्ग असल्याचे मत युवा पिढीने मांडले.
सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी घेतला आस्वाद
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गायक महेश काळे यांनी सादरीकरण केले. काळे यांचे गाणे पूर्ण होताच उपस्थितांनी त्यांना उस्फूर्त दाद दिली. यातच तरुणाईची संख्या मोठी होती. उस्ताद राशिद खान यांच्या गायनाला सुद्धा युवावर्गाने चांगला प्रतिसाद दिला. शंकर महादेवन यांनी शेवटच्या दिवशी अंतिम सादरीकरण करत सर्व उपस्थितांना थिरकायला भाग पाडले. तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी गाण्याच्या आस्वाद घेतला.
या संबंधी आणखी बातम्या वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.