आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Verul Ajanta International Festival Stage Making; Stage Decoration Making Story | Mukund Goltagwar | Chhtrapati Sambhajinagar

दिव्य मराठी विशेषझळाळी देणारा रंगमंच:22 कलाकारांनी 15 ते 16 तास काम करून 1 महिन्यात साकारली अप्रतिम कलाकृती

निलेश जोशी/अनिकेत दिलवालेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ-अजिंठा महोत्सवातील कलाकारांच्या प्रस्तुती तर प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या आहेतच. पण त्याच बरोबर येथील सजावट, व्यासपीठ, सेल्फी पॉइंट सर्वच चर्चेचा विषय ठरली होती. व्यासपीठावर अजिंठा आणि वेरूळ लेण्यातील प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यामुळे आपण त्याच ऐतिहासिक वास्तूंच्या सान्निध्यात असल्याचा आभास येथील रसिकांना झाला.

वेरूळ-अजिंठा महोत्सवासाठी व्यासपीठ उभारण्याची जबाबदारी देण्यात आली ती शहरातील प्रसिद्ध कलाकार मुकुंद गोलटगावकर यांना. त्यासाठी त्यांनी वेरूळ आणि अजिंठा येथील कलाकृतीच्या प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला.

महोत्सवाला झळाळी देण्याच्या दृष्टीने रंगमंच तयार करण्यासाठी मेहनत घेतली गेली. रंगमंच कसा असेल यासंबंधीचा निर्णय दोन दिवसांत घेण्यात आला. थ्रीडी इफेक्ट साधून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न यात करण्यात आला. वास्तविक, रंगमंच तयार करण्यात गोलटगावकर यांचा हातखंडा आहे.

मुकुंद गोलटगावकर यांचा प्रवास

मुकुंद गोलटगावकर
मुकुंद गोलटगावकर

गोलटगाव या छोट्या गावातून त्यांचा प्रवास सुरू झाला. मेहनती आणि कष्टाळू कलाकार म्हणून ते ओळखले जातात. 2005 मध्ये त्यांनी महोत्सवासाठी पहिल्यांदा रंगमंच उभारला होता. त्या वेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे स्तंभ आकर्षक ठरले होते, तर दुसऱ्या वर्षीदेखील वेरूळ-अजिंठामधील कलाकृती साकारण्यात आल्या होत्या. 2007 मध्ये त्रिमूर्तीचे शिल्प आणि वेरूळ लेणीच्या चित्राने महोत्सवात भर पडली होती. 2008 मध्ये 15 फूट उंचीची नटराज मूर्ती तयार करण्यात आली होती. मात्र, मुंबई बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव होऊ शकला नव्हता. अनेक कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी दरवेळी काहीतरी नविन देण्याचा प्रयत्न केला आहे.

सोनेरी महलाच्या बाहेर उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँइंटवर नागरिकांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.
सोनेरी महलाच्या बाहेर उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँइंटवर नागरिकांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.

23 कलाकार, 16 तास काम, 1 महिन्यांचा कालावधी

अजिंठा लेण्यांमधील खांबांच्या प्रतिकृती तसेच वेरूळमधील लेणी क्रमांक 16 मधील मूर्तींच्या प्रतिकृती यांच्या सुंदर मिलापातून हे व्यासपीठ उभारण्यात आले असल्याची माहिती कलाकार मुकुंद गोलटगावर यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. सुमारे एक महिन्याच्या कालावधील गोलटगावर यांच्यासोबत 22 कलाकारांनी दररोज 16 तास काम करुन हे व्यासपीठ उभारण्यात आले आहे.

सोनेरी महालाच्या प्रवेश दाराच्या बाहेर औरंगाबादची ओळख सांगणाऱ्या दरवाज्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती.
सोनेरी महालाच्या प्रवेश दाराच्या बाहेर औरंगाबादची ओळख सांगणाऱ्या दरवाज्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती.

120 बाय 30 फुटाचे भव्य व्यासपीठ

वेरूळ - अजिंठा महोत्सावासाठी भव्यदिव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. यामध्ये 120 बाय 30 फुटाचे व्यासपीठ असून त्याची उंची 20 फुट आहे. यामुळे दुरवर बसलेल्या व्यक्तीलाही व्यासपीठ स्पष्ट दिसून येईल. तसेच मुर्ती आणि खांब उभारण्यासाठी फायबरचा वापर करण्यात आल्याने हे व्यासपीठ टिकावू आणि मजबूत असल्याचे मुकुंद गोलटगावर यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...