आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरज्ञानवापीच्या पहिल्या लढ्यात हिंदू पक्षाचा विजय:4 वेळा पाडले विश्वनाथ मंदिर, अवशेषांवर उभी राहिली मशीद; वाचा वादाची संपूर्ण कहाणी...

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशीद परिसरात माँ शृंगार गौरीच्या पूजेसंदर्भातील याचिकेवर सुनावणीस परवानगी दिली आहे. या याचिकेला आव्हान देणारी अंजुमन इस्लामिया मशीद कमिटीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीचा हा वाद शतकानुशतके जुना आहे. या वादावरून 213 वर्षांपूर्वी पहिल्यांदाच दंगली झाल्या होत्या.

आज दिव्य मराठी एक्स्प्लेनरमध्ये आम्ही या संपूर्ण वादाची कहाणी तुमच्यासमोर मांडत आहोत...

ज्ञानवापी मशिदीच्या बांधकामाची कथा जाणून घेण्याआधी, काशी विश्वनाथ मंदिर पाडण्याच्या घटनांबद्दल जाणून घेऊया...

1. काशी विश्वनाथ मंदिर प्रथम 1194 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकने पाडले. तो मोहम्मद घोरीचा सेनापती होता. सुमारे 100 वर्षांनंतर एका गुजराती व्यापाऱ्याने हे मंदिर पुन्हा बांधले.

हे पेंटिंग कुतुबुद्दीन ऐबकचे आहे.
हे पेंटिंग कुतुबुद्दीन ऐबकचे आहे.

2. काशी विश्वनाथ मंदिरावर दुसरा हल्ला 1447 मध्ये जौनपूरचा सुलतान महमूद शाहने केला होता. मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. 1585 मध्ये, अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक, राजा तोडरमल याने मंदिराची पुनर्बांधणी केली.

हे पेंटिंग राजा तोडरमल यांचे आहे.
हे पेंटिंग राजा तोडरमल यांचे आहे.

3. 1642 मध्ये शाहजहानने काशी विश्वनाथ मंदिर पाडण्याचा आदेश दिला. हिंदूंच्या प्रचंड विरोधानंतर मुख्य मंदिर पाडता आले नाही, पण काशीची 63 छोटी-मोठी मंदिरे पाडण्यात आली.

हा फोटो 19व्या शतकातील काशी विश्वनाथ मंदिराचा आहे.
हा फोटो 19व्या शतकातील काशी विश्वनाथ मंदिराचा आहे.

4. 18 एप्रिल 1669 रोजी औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडण्याचा आदेश जारी केला. हा आदेश आजही कोलकात्याच्या एशियाटिक लायब्ररीत ठेवण्यात आला आहे. सप्टेंबर 1669 मध्ये मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली. या घटनेच्या सुमारे 111 वर्षांनंतर, इंदूरच्या मराठा शासक अहिल्याबाई होळकर यांनी 1780 मध्ये विद्यमान काशी विश्वनाथ मंदिर बांधले.

हा फोटो 19 व्या शतकातील काशी विश्वनाथ मंदिराचा आहे.
हा फोटो 19 व्या शतकातील काशी विश्वनाथ मंदिराचा आहे.

मान्यता: औरंगजेबाने मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद बांधली

1669 मध्ये औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग तोडून ज्ञानवापी मशीद बांधली असे मानले जाते. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की 14 व्या शतकात जौनपूरच्या शर्की सुलतानने मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद बांधली होती.

काही मान्यतांनुसार, अकबराने 1585 मध्ये दीन-ए-इलाही या नव्या धर्मानुसार विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद बांधली होती.

मशीद आणि विश्वनाथ मंदिराच्या मध्ये 10 फूट खोल विहीर आहे, तिला ज्ञानवापी म्हणतात. या विहिरीवरून मशिदीला हे नाव पडले. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की भगवान शिवाने स्वतः आपल्या त्रिशूलाने ही विहीर लिंगाभिषेकासाठी बनवली होती.

येथेच शिवाने आपली पत्नी पार्वतीला ज्ञान दिले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ज्ञानवापी किंवा ज्ञानाची विहीर पडले. ही विहीर थेट पौराणिक काळातील दंतकथा, सामान्य लोकांच्या श्रद्धा यांच्याशी संबंधित आहे.

ज्ञानवापी मशीद 1669 मध्ये औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून बांधली होती, असे मानले जाते.
ज्ञानवापी मशीद 1669 मध्ये औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून बांधली होती, असे मानले जाते.

मशिदीची रचना ताज महालसारखी

ज्ञानवापी मशीद हिंदू आणि मुस्लिम वास्तुकलेचे मिश्रण आहे. मशिदीच्या घुमटाखाली मंदिरासारखी भिंत दिसते.

औरंगजेबाने पाडलेल्या विश्वनाथ मंदिराचा हा भाग असल्याचे मानले जाते. ज्ञानवापी मशिदीचे प्रवेशद्वारही ताज महालप्रमाणेच बनवले आहे.

मशिदीला तीन घुमट आहेत, जे मुघलकालीन छाप सोडतात. मशिदीचे मुख्य आकर्षण म्हणजे गंगा नदीवरील 71 मीटर उंच मिनार. 1948 मध्ये आलेल्या पुरामुळे ज्ञानवापी मशिदीचा एक टॉवर कोसळला होता.

ज्ञानवापी मंदिराच्या एका भागाची रचना मंदिराच्या रचनेसारखी वाटते.
ज्ञानवापी मंदिराच्या एका भागाची रचना मंदिराच्या रचनेसारखी वाटते.

मंदिराच्या अवशेषांवर मशीद बांधण्यावरून वाद

मंदिर-मशीदीबाबत अनेक वाद झाले आहेत, पण हे वाद स्वातंत्र्यापूर्वीपासून आहेत. 1809 मध्ये, जेव्हा हिंदूंनी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांच्यामध्ये एक छोटे स्थळ बांधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथे भीषण दंगली झाल्या.

1991 मध्ये काशी विश्वनाथ मंदिराच्या पुरोहितांच्या वंशजांनी वाराणसी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले की, मूळ मंदिर 2050 वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्यने बांधले होते. 1669 मध्ये औरंगजेबाने ते पाडून मशीद बांधली.

मंदिराचे अवशेष मशिदीत वापरण्यात आले होते, त्यामुळे ही जमीन हिंदू समाजाला परत देण्यात यावी, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकेनुसार, मंदिराच्या अवशेषांवर मशीद बांधण्यात आल्याने या प्रकरणात प्रार्थनास्थळ कायदा 1991 लागू होत नाही.

1998 मध्ये, ज्ञानवापी मशिदीची देखरेख करणारी समिती अंजुमन इंतजामियाने याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. समितीने म्हटले की, या वादात कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही कारण पूजास्थळे कायद्यानुसार याला मनाई आहे. यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या कार्यवाहीला स्थगिती दिली.

2019 मध्ये, विजय शंकर रस्तोगी यांनी वाराणसी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी मशीद परिसराचे पुरातत्व सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली.

उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, 2019 मध्ये वाराणसी न्यायालयात पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.

2020 मध्ये, अंजुमन इंतजामियाने पुरातत्व सर्वेक्षण करण्याच्या याचिकेला विरोध केला. त्याच वर्षी रस्तोगी यांनी उच्च न्यायालयाने स्थगिती न वाढवण्याचा हवाला देत कनिष्ठ न्यायालयात सुनावणी पुन्हा सुरू करण्याची विनंती केली.

मंदिर आणि मशीद जवळ-जवळ, येण्या-जाण्याचे मार्ग वेगळे

काशी विश्वनाथ मंदिर वाराणसीच्या विश्वनाथ गल्लीमध्ये गंगा नदीच्या काठावर आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद एकमेकांना लागून आहेत, पण इथे येण्या-जाण्याचे मार्ग वेगळे आहेत.

मंदिराचे मुख्य शिवलिंग 60 सेमी लांब आणि 90 सेमी परिघात आहे. मुख्य मंदिराभोवती काल-भैरव, कार्तिकेय, विष्णू, गणेश, पार्वती आणि शनी यांची छोटी मंदिरे आहेत.

मंदिरात 3 सोन्याचे घुमट आहेत, जे पंजाबचे महाराजा रणजित सिंग यांनी 1839 मध्ये लावले होते. मंदिर-मशीद यांच्यामध्ये एक विहीर आहे, तिला ज्ञानवापी विहीर म्हणतात. स्कंदपुराणातही ज्ञानवापी विहिरीचा उल्लेख आहे. मुघलांच्या आक्रमणावेळी ज्ञानवापी विहिरीत शिवलिंग दडवले होते, असे सांगितले जाते.

ज्ञानवापी मशिदीचा ताजा वाद काय आहे?

ज्ञानवापी मशीद परिसरात शृंगार गौरी आणि इतर देवतांच्या दैनंदिन पूजेविषयी ताजा वाद आहे. 18 ऑगस्ट 2021 रोजी, 5 महिला ज्ञानवापी मशीद परिसरातील माँ शृंगार गौरी, गणेश जी, हनुमान जी आणि परिसरातील इतर देवतांच्या दैनंदिन पूजेची परवानगी मागत न्यायालयात पोहोचल्या होत्या. सध्या येथे वर्षातून एकदाच पूजा होते.

या पाच याचिकाकर्त्यांचे नेतृत्व दिल्लीतील राखी सिंह करत आहेत, उर्वरित चार महिला सीता साहू, मंजू व्यास, लक्ष्मी देवी आणि बनारसच्या रेखा पाठक आहेत.

26 एप्रिल 2022 रोजी वाराणसी सिव्हिल कोर्टाने ज्ञानवापी मशीद परिसरातील शृंगार गौरी आणि इतर देव विग्रहांच्या सत्यापनासाठी व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षणाचे आदेश दिले होते.

न्यायालयाच्या आदेशानंतरही मुस्लीम पक्षाच्या प्रचंड विरोधामुळे येथे 6 मेपासून सुरू झालेले तीन दिवसीय सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. 10 मे रोजी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार होती. या सुनावणीत न्यायालय ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी नवी तारीख देणार असल्याचे मानले जात होते.

सर्वेक्षणासाठी मशिदीच्या आत जाणे चुकीचे असल्याचे मुस्लीम पक्ष सांगत आहे. तर शृंगार देवीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याचे हिंदू पक्षाचे म्हणणे आहे.

आता आपण 'द प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट' अर्थात प्रार्थना स्थळांचा कायदा देखील समजून घेऊया:

ज्ञानवापी वादाचा युक्तिवाद 'द प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट'वर आहे.

ज्ञानवापी वादाची संपूर्ण चर्चा द प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट, 1991 या कायद्याभोवती आहे. हा कायदा प्रार्थना स्थळे बदलण्यास मनाई करतो. या कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ रोजी ज्या धार्मिक स्वरूपात प्रार्थनास्थळे होती ती अबाधित राहतील. म्हणजेच स्वातंत्र्याच्या वेळी जर मशीद होती, तर नंतर ती मंदिर, चर्च किंवा गुरुद्वारामध्ये बदलता येणार नाही. हा कायदा 11 जुलै 1991 रोजी लागू झाला.

यात एकूण 8 विभाग आहेत त्यापैकी सर्वात महत्वाच्या 4 गोष्टी खालीलप्रमाणे आहेत...

कलम-3: 15 ऑगस्ट 1947 नंतर धार्मिक स्थळांमध्ये कोणताही बदल नाही, प्रार्थना स्थळ कायद्याच्या कलम 3 मध्ये असे नमूद केले आहे की धार्मिक स्थळे 15 ऑगस्ट 1947 रोजी होती तशीच जतन केली जातील. इतिहासात इतर कुठल्यातरी धार्मिक स्थळाची मोडतोड करून सध्याचे धार्मिक स्थळ बांधले गेले हे सिद्ध झाले, तरी त्याचे सध्याचे स्वरूप बदलता येणार नाही.

कलम 4(2): 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच्या वादावर कोणताही नवीन खटला नाही, 15 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळाच्या धार्मिक स्वरूपामध्ये फेरफार करण्यासाठी कोणत्याही न्यायालयात प्रलंबित असलेला कोणताही खटला किंवा कायदेशीर कार्यवाही रद्द केली जाईल आणि नवीन खटला किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू होणार नाही. 15 ऑगस्ट 1947 नंतर प्रार्थनास्थळात बदल झाला असेल तर कायदेशीर कारवाई करता येईल.

कलम-५: रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाला लागू नाही, अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाला प्रार्थनास्थळ कायद्यातील कोणत्याही तरतुदी लागू होणार नाही.

कलम-6: 3 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद, जर कोणी या कायद्याच्या कलम-3 चे उल्लंघन केले तर त्याला तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...