आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Vidhan Parishad : Mahavikas Is In The Lead For Five Seats; Congress Wants Two Seats, While Swabhimani Wants One; The Picture Will Be Clear On May 14

विधान परिषद:पाच जागांसाठी महाविकास आघाडीत खलबते; काँग्रेसला दोन, तर स्वाभिमानीला हवी एक जागा; १४ मे रोजी चित्र स्पष्ट होणार

मुंबई2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना २, राष्ट्रवादी २, काँग्रेसकडे १ जागेची मते अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपला ४ जागांची आशा

विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी महाराष्ट्र विकास आघाडीत सध्या जोरबैठका चालू आहेत. काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असून त्यांनी अधिकची एक जागा मागितली अाहे. तर, आघाडी धर्माची आठवण करून देत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीने एक जागा सोडण्याची मागणी केली आहे. परिणामी, पाच जागांची वाटणी करण्यावरून महाविकास आघाडीत खलबतांना जोर आला आहे.

मंगळवारी सकाळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि परिषदेच्या दोन जागा काँग्रेसला मिळाव्यात अशी मागणी केली. शिवाजी पार्क येथील ठाकरे स्मारकात सायंकाळी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात काँग्रेसने दोन जागा सोडण्याची मागणी लावून धरल्याचे सांगण्यात आले.

भाजपचे विधानसभेतील संख्याबळ १०५ आहे. तसेच, काही अपक्षांचा पाठिंबा असल्याने ११४ मते आपल्याकडे असल्याचा भाजपचा दावा आहे. त्या बळावर ४ जागा लढवण्याची भाजपची तयारी आहे. शिवसेनेकडे ५६ संख्याबळ असून सेनेने उद्धव ठाकरे आणि डाॅ. नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. राष्ट्रवादीकडे ५४ संख्याबळ असून राष्ट्रवादीने आपले दोन उमेदवार निश्चित केले आहेत. काँग्रेसकडे ४४ संख्याबळ आहे. १९ मते कमी पडत असताना काँग्रेसने अधिकच्या एक जागेची मागणी लावून धरली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी व काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या झंझावाती प्रचाराचा मोठा लाभ झाला होता. त्यामुळे आघाडीने एक जागा सोडावी, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाने केली आहे.

काँग्रेसला एक जागा, ३५ इच्छुक

काँग्रेसकडून एका जागेसाठी ३५ इच्छुकांची नावे आहेत. भाजपमध्ये एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, माधव भंडारी यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी मंत्री शशिकांत सावंत, अमोल मिटकरी, शिवाजीराव गर्जे, नजीब मुल्ला, रूपाली चाकणकर, हेमंत टकले प्रयत्न

करीत आहेत.

विजयासाठी पहिल्या पसंतीची २९ मते आवश्यक

विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. २१ मे रोजी मतदान आहे. सर्व ९ जागा या विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या आहेत. पहिल्या पसंतीची २९ मते मिळविणारा उमेदवार विजयी ठरणार आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११ मे असून अर्ज परत घेण्याची १४ मे शेवटची मुदत आहे. २१ मे रोजी मतमोजणी आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे यावेळी खुद्द उमेदवार असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी शिवसेनेची इच्छा आहे.

बातम्या आणखी आहेत...