आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर ओरिजनल:वित्तीय तंत्रज्ञान-डिजिटल अर्थव्यवस्था कंपन्या कोरोनानंतर जगात महत्त्वाची भूमिका बजावणार, लाेकांची व्यवहाराची पद्धत बदलणार : विजय शर्मा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील सर्वात माेठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमचे संस्थापक व सीईआे विजयशेखर शर्मांशी खास बातचीत

धर्मेंद्रसिंह भदौरिया  

कोरोना महामारीतील लाॅकडाऊनच्या काळातही डिजिटल पेमेंट कंपन्या व्यवहाराची गती सातत्याने वाढत आहे. व्यवसाय व व्यावसायिक जीवनावर या लाॅकडाऊनचा कसा परिणाम हाेईल या संदर्भात दैनिक भास्करने पेटीएम या देशातील सर्वात माेठ्या डिजिटल फायनान्स कंपनीचे संस्थापक व सीईआे विजयशेखर शर्मा यांच्याशी केलेली चर्चा... पेटीएम ही १६ अब्ज डाॅलरचे (१.२० लाख काेटी) बाजारमूल्य असलेली कंपनी आहे.

आरोग्याची काळजी आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा महत्त्वाची

देशात या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय अर्थव्यवस्थेतही तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे. उत्पादने असोत किंवा सेवा क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. वित्त आणि तंत्रज्ञान क्षेत्रे बहुतांश सेवांना अधिक भक्कम करतील.

लॉकडाऊनचा नेहमीच्या व्यावसायिक कामावर कसा परिणाम झाला आहे. त्याला सामाेरे जाताना काेणकाेणते बदल केले आहेत ?

सध्याच्या बदलांना सामोरे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नियमित कामांचे काटेकोर पालन करणे. त्यासाठी सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, याेग्य आहार घेणे व दिवसभरातील कामांच्या नियाेजनापर्यंतचे माझे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याचा मी प्रयत्न करतो. इतरांप्रमाणे मीदेखील वर्क फ्राॅम हाेमच्या सध्याच्या कामाशी स्वत:ला जुळवून घेतले आहे. दीड अब्ज भारतीयांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने मी माझ्या टीमला सतत प्राेत्साहन देत आहे. व्हिडिआे काॅल, ई-मेल आदी विविध प्रकारे मी माझ्या टीमच्या सतत संपर्कात असताे. टाऊनहाॅल मीटिंग्जच्या माध्यमातून दर आठवड्याला मी माेठ्या संख्येने माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करताे. जागतिक महामारी व लाॅकडाऊन असतानाही पेटीएमचे नेहमीप्रमाणेच गतिमान काम सुरू असल्याचा मला आनंद आहे.

काेराेनानंतर कामाच्या पद्धतीत काेणता बदल अपेक्षित आहे. वर्क फ्राॅम हाेम किती वाढेल ?

कोरोनाच्या काळात जगभर अनेक क्षेत्रांत खूप मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. हे बदल अनपेक्षित असेच आहेत. कारण जगात अशा प्रकारच्या घडामोडी यापूर्वी कधीच घडल्या नव्हत्या. जागतिक पातळीवर लाेक आपल्या जीवनशैलीत झालेल्या विविध बदलांचा स्वीकार करतील. आगामी दीर्घकाळात कामाच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम असतील. व्यवसायासाठी कंपन्या तंत्रज्ञान, व्हिडिआे काॅलवर जास्त अवलंबून असतील. कारण कामासाठीच्या प्रवासात कपात हाेणार आहे. काेणत्याही कंपनीसाठी वर्क फ्राॅमचे महत्त्व वाढले तरी कार्यालये मात्र राहतील. पूर्ववत स्थिती निर्माण झाल्यानंतर लाेक पुन्हा आपल्या कार्यालयात कामासाठी रुजू हाेतील, असा मला विश्वास वाटताे.

तुमच्या उद्याेगावर काेविड-१९चा काय परिणाम झाला ?

वित्तीय तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्था कंपन्या काेविड -१९ नंतर जगात महत्वाची भूमिका बजावतील असा माझा हमखास विश्वास आहे. लहान दुकानदारांपासून ते किराणा दुकानांचे मालक, एसएमईपर्यंत सर्वंान डिजिटल व्यवसाय करण्यासाठी सक्षम बनवण्याचा आमचा मानस आहे.माेठ्या प्रमाणावर अर्थव्यवसायचा विकास करण्यासाठी हे महत्वपूर्ण आहे. लाेकांची व्यवसाय करण्याची पद्धत बदलणार आहे.

तुमच्या व्यवसायात अल्प व दीर्घकाळात काय परिणाम हाेईल?

अल्पकालावधीत पर्यटन व तिकीटावर आधारीत कार्यक्रम करणाऱ्या व्यवसायाला फटका बसेल. विमा, पेटीएम मनी व पेटीएम पेमेंट बंॅकेच्या माध्यमातून बंॅक सेवांशी जाेडल्या गेलेलाे असल्याने आम्ही वित्तीय सेवांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पेटीएम मनीमुळे आमच्या व्हाॅल्युममध्ये सतत वाढ हाेत आहे. आम्ही कंटेंट स्ट्रॅटेजीमध्ये दमदार प्रगती करत असून आमची पेटीएम फर्स्ट गेम्स कंपनी चांगले काम करत आहे. ब्रंॅड पुन्हा जाहिराती करतील त्यामुळे वेळ आल्यानंतर त्यातून चांगली कमाई हाेऊ शकेल.

२०२० -२१ साठी व्यवसाय याेजनेत किती बदल तुम्ही केला आहे. ?

आम्ही आमची वाढीव महसुली याेजना पुडील एक तिमाहीपर्यंत पुढे ढकलली आहे. आमच्या डिजिटल फर्स्ट धाेरणांतर्गत पुढील तिमाहीनंतर समुह पातळीवर सर्व काही सामन्य हाेईल असे चित्र दिसत आहे.

सद्य:स्थितीतून बाहेर येण्यासाठी कंपनी काय याेजना आखत आहे ?

एक कंपनी म्हणून आम्ही लोकांना व्यवसाय, डिजिटल व्यवहार करतानाच त्यात प्रगती करण्यास मदत हाेऊ शकेल अशा उत्पादनांवर काम करीत आहोत. सध्याच्या कठिण स्थितीत प्रत्येकउद्याेगाने आपल्या मनुष्यबळाची काळजी घेणे गरजेचे आहे.

महामारीचा सामना करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययाेजनांकडे तुम्ही कशा प्रकारे बघता ?

सरकारने वेळीच साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी पावले उचलली आहेत. योग्य वेळी लॉकडाऊनची घोषणा असो किंवा आरोग्य सेतू सुरू करण्याचे पाऊल असाे महामारीमध्ये नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

भारताला काेराेनातून बाहेर काढण्यासाठी काेणत्या प्रकारच्या राेडमॅपची गरज आहे ?

काेराेना संकटातून भारत सुरक्षितपणे बाहेर पडावा म्हणून सरकार याेग्य ती पावले उचलत आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी लाेकांचे आराेग्य चांगले राखणे आणि अर्थव्यवस्थेला चालना देणे या दाेन मुख्य महत्वाच्या गाेष्टी आहेत. उत्पादन क्षेत्र तसेच सेवा उद्याेगावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महामारी नियंत्रणात आल्यानंतर वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रामुळे बहुतांश सेवा समर्थ हाेऊ शकतील.

केंद्राचे २० लाख काेटी रुपयांचे पॅकेज अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण ठरेल, असे तुम्हाला वाटते?

केंद्र सरकारने जाहीर केलेले पॅकेज आपल्या जीडीपीच्या तुलनेत जवळपास १० % इतके आहे. सरकारने याेग्यवेळी निर्णय घेतल्यामुळे या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत हाेऊ शकेल असा मला विश्वास आहे. अन्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत वेगाने सुधारणा हाेतील.

बातम्या आणखी आहेत...