आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:जन की बात करणार पत्रकार : विनोद दुआ

अभिषेक भोसलेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकार, निवेदक विनोद दुआ यांचे ४ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये निधन झाले. विनोद दुआ हे भारतीय पत्रकारितेतील स्वतंत्र प्रवाह होते. त्यांची पत्रकारिता ही जन सामान्यांची पत्रकारिता होती. त्यांच्या पत्रकारितेतून नागरिकांचं म्हणणं समोर यायचं. त्यांना आवाज मिळायचा. आशयापेक्षा सादरीकरणावर भर देण्याचा माध्यमांत ट्रेंड असताना दुआ मात्र आशय हाच सर्वोच्च या तत्वावर ठाम राहिले. ज्याची भारतीय माध्यमांना आज गरज आहे.

नागरिकांना ‘इन्फॉर्म’ आणि ‘एज्युकेट’ करण्याच्या उद्दिष्टांपासून माध्यमे दूर जात असताना विनोद दुआ मात्र त्याला अपवाद होते. विनोद दुआंचा "द वायर' वरील 'जन गण मन की बात' कार्यक्रम पाहायला सुरूवात केली की जनसामान्यांच्या लक्षात यायचं आपल्या टिव्ही, ऑनलाईन माध्यमांच्या स्क्रिन किती उथळपणा, भडकपणा आणि उत्सवीकरणाने भरलेल्या आहेत. त्यातून मार्ग काढत दुआ त्यांच्या प्रेक्षकांना नागरिक असण्याच्या जवळ नेत होते. आशयापेक्षा सादरीकरणावर भर देण्याचा माध्यमांत ट्रेंड असताना दुआ मात्र आशय हाच सर्वोच्च या तत्वावर ठाम राहिले. ज्याची भारतीय माध्यमांना आज गरज आहे.

पत्रकार, निवेदक विनोद दुआ यांचे ४ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये निधन झाले. विनोद दुआ हे भारतीय पत्रकारितेतील स्वतंत्र प्रवाह होते. त्यांची पत्रकारिता ही जन सामान्यांची पत्रकारिता होती. त्यांच्या पत्रकारितेतून नागरिकांचं म्हणणं समोर यायचं. त्यांना आवाज मिळायचा. म्हणूनच की काय, त्यांच्या पहिल्या कार्यक्रमाचे नाव होते, जनवाणी. ज्यातून त्यांनी निवेदक म्हणून वृत्तवाहिनीच्या स्क्रिनवर प्रवेश केला, तोही सामान्यांचा आवाज बनून. या कार्यक्रमातून जनता मंत्र्यांना थेट त्यांच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारू शकायचे. दूरदर्शनवरील हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय ठरला होता. आज ४० वर्षानंतर या कार्यक्रमाकडे पाहताना लक्षात येईल की, सरकारला उत्तरदायी बनविण्यासाठी माध्यमातील अशा जागा महत्त्वाच्या होत्या. दुआंनी हिंदी पत्रकारितेमध्ये नवा प्रवाह जन्माला घातला होता, म्हणूनच हिंदी पत्रकारिता दुआंच्या कामाचा आढावा घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही.

आज २०२१ मध्ये वृत्तवाहिन्यांकडून भव्यदिव्य कॉनक्लेव्ह भरविले जातात. कट्टे भरविले जातात. त्यात मंत्री, राजकारणी, सेलिब्रिटी, उद्योजक, पत्रकार सगळे असतात. पण नागरिक मात्र त्यात दिसत नाहीत. त्यांचा आवाज ऐकायला मिळत नाही. याच नागरिकांना निवडणुकांचे अर्थ समजावून सांगण्यासाठी पत्रकार प्रणय रॉय आणि विनोद दुआ निवडणुक विश्लेशणाचा कार्यक्रम चालवायचे. तोपर्यंत खाजगी वृत्तवाहिन्यांचा प्रवेश झाला न्वहता. त्यामुळे हे कार्यक्रम दूरदर्शनवर चालायचे. दूरदर्शननंतर त्यांनी टिव्ही टुडे, एनडीटिव्ही मध्ये काम केलं. पत्रकारितेमध्ये दिलेल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना २००८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९९६ मध्ये त्यांना पत्रकारितेसाठीचा भारतातील सर्वोच्च रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला होता. २०१७ मध्ये त्यांना रेडइंक लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला होतो.

मागच्या काही वर्षांपर्यंत ते "द वायर' या माध्यम संस्थेमध्ये काम करत होते. "द वायर' वरील त्यांचा कार्यक्रम "जन गण मन की बात' अनेक अर्थांनी महत्त्वाचा होता. मागच्या काही वर्षात माध्यमांमधील चिकित्सक आवाज क्षीण केले जात असताना त्यातून निर्माण होणारी पोकळी दुआ या कार्यक्रमामधून भरून काढत होते. कार्यक्रमाची ओळख करून देतानाच लिहिले आहे, ‘यहां एकतरफा मन की बात का दौर है, जहां जनता बात करनेवाला कोई नही है. ऐसे में जनता के मुद्दे पिछे छूट रहे है. अब "वायर द हिंदी' पर वरिष्ठ पत्रकार विनोद दुआ करेंगे जन की बात’. या कार्यक्रमातून आजूबाजूला घडणाऱ्या घडामोंडींची सोप्या पद्धतीने उकल करून ते प्रेक्षकांना सांगत होते. हे सांगताना त्यात कोणताच आवेश नसायचा, पार्श्वसंगीत नसायचे, भडक स्क्रिन नसायची. या कार्यक्रमाचे तब्बल ३१८ भाग झाले. ते प्रेक्षकांना आजही "द वायर"च्या संकेतस्थळावर आणि यूट्यूबवर पाहता येतात. या कार्यक्रमात त्यांनी विकास, राजकारण, भष्टाचार, परराष्ट्र धोरणे, शिक्षण, कला, साहित्य, क्रिडा या सर्व विषयांवर क्षेत्रातील समकालीन घडामोडींवर भाष्य केले. परखड मांडणी केली, सत्तेसमोर प्रश्न उपस्थित केले. धोरणांमधील मर्याद स्पष्ट केल्या. पण हे करताना त्यांनी संयम कधीच सोडला नाही. आक्राळस्तेपणा येऊ दिला नाही. तो त्यांचा पिंडच होता.

त्यानंतर त्यांनी "विनोद दुआ शो' नावाचा कार्यक्रम सुरू केला. त्याचे जवळपास ४२५ पेक्षा अधिक भाग झाले. त्यांनी सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम केला. यातल्याच एका कार्यक्रमावर आक्षेप घेऊन जून २०२० मध्ये विनोद दुआ यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय जनता पक्षातील नेते अजय श्याम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुआंनी कोव्हिड परिस्थितीमधील सरकारचे अपयश मांडणारा कार्यक्रम केला होता. हे स्पष्टच होतं की, दुआंचा आवाज क्षीण करण्याचाच सत्ताधारी भाजपाचा हा केविलवाणा प्रयत्न होता. दुआंनी या सर्व प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या वकीलांनी शेवटी सर्वोच्च न्यायालयाने यात दुआंच्या बाजूने निकाल देत देशद्रोहचा गुन्हा वापस घेण्याचे आदेश तपास यंत्रणांना दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत झाले. हा निकाल अनेक अर्थांनी महत्त्वाचा होता, एकतर या निकालाने सरकार सूडबुद्धीने देशद्रोहाचा कायदा पत्रकारांविरोधात वापरत असल्याचे स्पष्ट झाले. दुसरं म्हणजे लोकशाहीतील चिकित्सक आवाजांचे समर्थन करणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा होता. त्यातून पत्रकारांना देशद्रोह्याच्या कायद्याच्या सूडबुद्धीने होणाऱ्या वापरापासून संरक्षण मिळणार होते. तसंच देशद्रोहचा कायदा संपविण्याच्या मागणीनेही या निकालामुळे जोर धरला होता.

पारख, खबरदार इंडिया, विनोद दुआ लाईव्ह या त्यांच्या कार्यक्रमांनी ऐंशा नव्वदच्या काळात प्रेक्षकांवर प्रभाव टाकला होता. खाद्यसंस्कृतीवर आधारलेला "जायका इंडिया का' या कार्यक्रमातून त्यांनी देशातील खाद्यपदार्थांची विविधता आणि चव प्रेक्षकांसमोर आमली.

संयम, भाषेवर प्रभुत्व आणि स्पष्टवक्तेपणा ही दुआ यांच्या पत्रकारितेची वैशिष्टये. सत्तेला न आवडणारे प्रश्न विचारणं हेच खरं तर पत्रकारांचे काम. ते काम दुआंनी त्यांच्या पत्रकारितेतून चोख पार पाडले. भारतात हिंदी भाषिक पत्रकारिता वर्चस्व राखून आहे. त्यांच्या वाचकवर्ग मोठा आहे. राजकारण हिंदी भाषिक राज्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याच हिंदी भाषिक जनतेला टार्गेट ठेवून सरकारच्या दावणीला बांधलेल्या हिंदी वृत्तवाहिना काम करत आहेत. द्वेषाचा आशय पसरवित आहेत. याच हिंदी भाषिक पट्टयातील वृत्तवाहिन्या सरकारच्या प्रचारयंत्रणा बनल्या आहेत. त्या हिंदी पत्रकारितेमध्ये विनोद दुआंचं असणं आश्वासक होतं.

विनोद दुआंची जन की बात, मन की बात ला आव्हान देणारी होती. विनोद दुआ द वायर किंवा एचडब्लू न्यूज सारख्या समांतर माध्यमांतून आपली पत्रकारिता करत असताना सुद्धा सत्ता आणि सत्ताधारी त्यांच्या मांडणीने अस्वस्थ व्हायचे. अडचणीत यायचे हेच विनोद दुआंच्या पत्रकारितेचे फलित होते. इन्फॉर्म आणि एज्यूकेट या उद्दिष्टांपासून दुआंनी कधीच फारकत घेतली नाही. ज्याची आज गरज आहे.

bhosaleabhi90@gmail.com

बातम्या आणखी आहेत...