आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरबलात्कारी, एड्स रुग्ण पुतिन यांचे नवे शस्त्र:तुरुंगातून थेट सीमेवर रवानगी; रशियाची खास 'वॅगनर आर्मी'

लेखक: अनुराग आनंदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियामध्ये HIV एड्स आणि हिपॅटायटीसचे रुग्ण, बलात्कारी आणि समलैंगिकांची सैन्यात भरती केली जात आहे. वेगवेगळ्या देशांतील तीन अहवालांमध्ये हा दावा करण्यात आला आहे. अशा लोकांचा रशियन लष्कराच्या 'वॅगनर' तुकडीमध्ये समावेश केला जात आहे, ज्याला प्रायव्हेट आर्मी देखील म्हटले जाते. दिव्य मराठी एस्कप्लेनरमधून समजून घेऊया की, पुतिन यांची खाजगी सेना 'वॅगनर' काय आहे आणि त्यात एड्सच्या रुग्णांची भरती का केली जात आहे?

सर्वप्रथम जाणून घेऊया, रशियन सैन्यात HIV रुग्णांच्या भरतीची बातमी कुठून आली...

युनायटेड किंगडम संरक्षण मंत्रालयाचा अहवाल: 30 ऑक्टोबरच्या या अहवालात पुतिन यांचे शेफ मोगुल येवजेनी प्रीगोझिन यांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की युक्रेनचे खाजगी सैन्य एड्स आणि हेपेटायटीस-सी रुग्णांची भरती करत आहे.

युक्रेनियन वृत्तपत्राचा अहवाल: युरोपियन वृत्तपत्र युक्रेन्स्का प्रावदाने वृत्त दिले आहे की, एड्स आणि हिपॅटायटीस आजाराने ग्रस्त 100 हून अधिक कैद्यांना खाजगी सैन्यात भरती करण्यात आले आहे.

अमेरिकन न्यूज एजन्सी 'द डेली बीस्ट'चे वृत्त: डेली बीस्टने आपल्या तपास अहवालात म्हटले आहे की, रशियामध्ये बलात्काराचे दोषी, समलैंगिक आणि संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या कैद्यांना बळजबरीने आघाडीवर लढण्यासाठी पाठवले जात आहे.

रशियन खाजगी सैन्यावर HIV रुग्णांना सैन्यात का भरती करण्याची वेळ का ओढवली?

  1. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनुसार रशियन सैन्यात सैनिकांचा मोठा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत दीर्घकाळ युद्धात टिकून राहण्यासाठी तुरुंगात कैद अट्टल गुन्हेगार आणि आजारी व्यक्तींचा सहारा घेतला जात आहे.
  2. द डेली बीस्टच्या वृत्तानुसार, रशियाच्या तुरुंगांमध्ये अजूनही सोव्हिएत काळाप्रमाणेच भेदभाव केला जातो. येथे बलात्कारी, समलैंगिक आणि संसर्गजन्य रोगाच्या रुग्णांना 'द शेम्ड' म्हटले जाते. तुरुंगात त्यांच्यासोबत भेदभाव आणि मारहाण केली जातो. अशा स्थितीत वॅगनर आर्मीमध्ये भरती होऊन त्यांना सहज रणांगणात ढकलता येते.
  3. एका कैद्याचा हवाला देत अहवालात दावा करण्यात आला आहे की, या रुग्णांची सैन्यात भरती केवळ युद्धभूमीवर मरण्यासाठी केली जात आहे. वास्तविक, रशिया पूर्व युक्रेनमध्ये 200 किमी लांबीची संरक्षणात्मक रेषा तयार करत आहे. आघाडीवर त्याची जबाबदारी खासगी लष्करावर सोपवण्यात आली आहे.

रशियाची भयंकर खाजगी सेना आहे वॅगनर

वॅगनर हे रशियाचे खाजगी सैन्य आहे, जे केवळ आणि केवळ राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार काम करते. वॅगनर ग्रुपची स्थापना 2014 मध्ये माजी रशियन लष्करी अधिकारी दिमित्री उत्किन यांनी केली होती. हा तो काळ होता जेव्हा रशिया क्रिमियावर ताबा मिळवण्याच्या तयारीत होते. चेचन युद्धादरम्यान दिमित्री एक नायक म्हणून उदयास आले होते. त्यांनी रशियन गुप्तचर सेवेतही काम केले.

अशा स्थितीत निवृत्त झाल्यानंतर त्यांनी या खासगी लष्कराची पायाभरणी केली. यामध्ये माजी लष्करी जवान आणि तुरुंगातून सुटलेल्या भयंकर मारेकऱ्यांचा समावेश होता.

पुतिन यांचे मित्र येवगेनी यांच्याकडून पैसे घेऊन ऑपरेट होते वॅगनर

युरोपियन युनियन आणि अमेरिकन ट्रेझरी डिपार्टमेंट या दोन्हींनी दावा केला आहे की रशियन प्रायव्हेट आर्मी वॅगनर सध्या पुतिन यांचे जवळचे मित्र आणि आयटी क्षेत्रातील मोठे उद्योजक येवगेनी व्हिक्टोरोविच प्रीगोझिन यांच्या पैशाने चालत आहे. मात्र, पुतिन आणि त्यांच्या मित्राने हा दावा फेटाळून लावला आहे.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कार्यालया क्रेमलिनने अनेक प्रसंगी म्हटले आहे की रशियन सरकारचा खाजगी सैन्य वॅगनरशी काहीही संबंध नाही. तर इंग्रजी वृत्तपत्र डेली स्टारने आपल्या वृत्तात दावा केला आहे की, क्रेमलिन रशियामध्ये खाजगी भाडोत्री सैन्याला प्रोत्साहन देत आहे.

पुतिन यांच्या सांगण्यावरून वॅगनरने अनेक मोहिमा राबवल्या

पुतिन यांच्या आदेशानुसार या खाजगी निमलष्करी संघटनेने जगभरात क्रूर आणि भयंकर मोहिमा राबवल्या आहेत. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकची(CAR)लढाई याचे उदाहरण आहे. येथे पुतिन यांच्या सांगण्यावरून या खाजगी लढवय्यांच्या सैन्याने 100 हून अधिक युद्ध गुन्हेगारी घटना घडवून आणल्या होत्या. त्यांनी तिथल्या लोकांवर अत्याचार तर केलेच पण बलात्कार आणि खूनही केले.

याशिवाय 7 फेब्रुवारी 2018 रोजी सीरियातील खशम शहरात इस्लामिक स्टेट ऑफ इराकचे दहशतवादी आणि खाजगी रशियन सैन्य यांच्यात भीषण युद्ध झाले होते. या प्रदेशात आपली पाळेमुळे घट्ट रोवलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावणे सीरियन सरकारला अवघड होते. अशा स्थितीत रशियन प्रायव्हेट आर्मी वॅगनरने हे अभियान यशस्वीपणे पार पाडले आणि इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना मैदान सोडून पळ काढावा लागला.

वॅगनर आर्मी 2015 मध्ये सीरिया आणि 2016 मध्ये लिबियामध्ये सक्रिय आढळली होती. 2017 मध्ये मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकने हिऱ्यांच्या खाणींच्या संरक्षणासाठी रशियन प्रायव्हेट आर्मीला टेंडर दिले होते. 2021 मध्ये, पश्चिम आफ्रिकन देश माली येथे इस्लामिक दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्यासाठी वॅगनरचे भयानक सैनिक तैनात करण्यात आले होते.

संयुक्त राष्ट्र आणि फ्रेंच सरकारने रशियन खाजगी सैनिक वॅगनरवर मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये बलात्कार आणि दरोडा टाकल्याचा आरोपही केला आहे. यामुळेच युरोपियन युनियनने वॅगनरवर बंदी घातली आहे.

युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाने वॅगनरला युक्रेनमध्ये पाठवले होते

किंग्ज कॉलेज लंडनमधील युद्धविषयक तज्ज्ञ प्रोफेसर ट्रेसी जर्मन यांच्या मते, डोनेस्त्क आणि लुहान्स्कमध्ये रशियन समर्थक अतिरेक्यांना भडकवण्यासाठी 1,000 भाडोत्री सैनिक पाठवण्यात आले होते.

याशिवाय ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने असाही दावा केला आहे की, युक्रेनची जमीन जिंकल्यानंतर रशियन सैन्य तेथील सुरक्षेची जबाबदारी वॅगनर गटाला देतात. अलजजीराच्या वृत्तानुसार, युक्रेन युद्धात टिकून राहण्यासाठी रशिया पूर्णपणे वॅगनरवर अवलंबून झाला आहे.

रशियन वॅगनरप्रमाणेच युक्रेनकडेही आहे खासगी लष्कर 'अझोव्ह'

2014 मध्ये वॅगनरच्या पदार्पणानंतर युक्रेनला रशियाचे हेतू कळाले होते. त्यानंतर त्याच वर्षी युक्रेनमध्ये खाजगी आर्मी अझोव्ह सुरू करण्यात आली. पूर्व युक्रेनमधील रशियन समर्थक बंडखोरांविरुद्ध सैन्याऐवजी अझोव्ह सैनिकांना उभे करणे हा त्याचा उद्देश होता. सुरुवातीला ही कट्टर राष्ट्रवादी सेनानींची रेजिमेंट होती. पुढे युक्रेनमधील सामान्य तरुणही त्यात जोडले जाऊ लागले.

2019 मध्ये, अमेरिकन संसद अझोव्हला 'दहशतवादी संघटने'चा दर्जा देणार होती, परंतु नंतर तसे झाले नाही. अझोव्हची भूमिका जर्मन आंदोलनांतही समोर आली होती. ऑगस्ट 2022 मध्ये रशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने अझोव्हला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

7 महिन्यांच्या युद्धानंतर युक्रेनलाही भासतेय सैनिकांची कमतरता

रशियाप्रमाणेच युक्रेनमध्येही युद्ध लढणाऱ्या पुरुष सैनिकांची संख्या सातत्याने कमतरता जाणवत आहे. DW च्या वृत्तानुसार, युक्रेनच्या शहरांमध्येही शांतता आहे. रस्त्यावर आणि बाजारात पुरुष क्वचितच दिसतात. देशात राहणारे बहुतेक पुरुष एकतर सीमेवर आहेत किंवा त्यांच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. हे दोन गोष्टींवरून समजू शकते...

पहिले: युक्रेन सरकारने महिला आणि मुलांना देश सोडण्याची परवानगी दिली आहे, परंतु पुरुषांना देश सोडण्यास पूर्णपणे बंदी आहे.

दुसरे: रशियाप्रमाणेच युक्रेनमध्ये 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना सैन्यात जबरदस्तीने भरती केले जात आहे. एवढेच नाही तर युक्रेन आणि परदेशातील पुरुषही स्वयंसेवक सैनिक म्हणून सैन्यात सामील होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...