आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टशॅम्पू करताना आला स्ट्रोक:पार्लरच्या वॉश बेसिनमध्ये मान झुकवल्याने झाल्या उलट्या; गाठावे लागले हॉस्पिटल

अलिशा सिन्हा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवडाभराचा ताण घालवायचा असो की, शरीरदुखी, आजकाल लोक पार्लर किंवा सलूनमध्ये जाऊन केस धुण्यापासून ते नेक मसाज करतात. पार्लरमध्ये किंवा घरी केस धुवल्यानंतर तुम्हाला कधी मानदुखी आणि मळमळ झाली आहे का?

जर याचे उत्तर हो असेल, तर खाली लिहिलेली ही घटना नक्की वाचा-

हैदराबादमध्ये, एक 50 वर्षीय महिला आपले केस धुण्यासाठी ब्युटी पार्लर किंवा सलूनमध्ये गेली. केस धुत असताना तिला अचानक चक्कर येऊ लागली, मळमळ आणि उलट्यांचा त्रासही होऊ लागला. बातमीत पुढे जाण्यापूर्वी डॉक्टरांचे हे ट्विट वाचा-

महिलेवर उपचार करणारे अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ सुधीर कुमार यांचे ट्विट पाहा-

मी अलीकडेच एका महिलेला पाहिले, जीला पार्लरमध्ये शॅम्पूने केस धुत असताना अचानक चक्कर येणे, उलट्या होणे आणि मळमळणे सुरू झाले. सुरुवातीला महिलेला गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टकडे (पोटाचे डॉक्टर) नेण्यात आले. त्यांच्या लक्षणांमध्ये सुधारणा झाली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना चालायला त्रास होऊ लागला, म्हणून त्यांना माझ्याकडे आणले. एमआरआयमधून महिलेला पक्षाघात झाल्याचे निष्पन्न झाले.

Beauty Parlor #Stroke Syndrome

1. I recently saw a 50-year old woman with symptoms of dizziness, nausea & vomiting, which started during her hair wash with shampoo in a beauty parlor. Initially, she was taken to a gastroenterologist, who treated her symptomatically.#Medtwitter

— Dr Sudhir Kumar MD DM🇮🇳 (@hyderabaddoctor) October 30, 2022

डॉक्टर सुधीर कुमार यांनी महिलेच्या या परिस्थितीचे वर्णन ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम असे केले आहे. आज आपण कामाची गोष्ट मध्ये या सिंड्रोमबद्दल चर्चा करणार आहोत. हे काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या की, कदाचीत तुमच्या घरातील एखादा सदस्य या सिंड्रोमचा शिकार होवू शकतो, कारण आजकाल ब्युटी पार्लरमध्ये जाणे ही एक सामान्य गोष्ट आहे.

ब्युटी पार्लर सिंड्रोम नंतर ती स्त्री पूर्णपणे बरी झाली का?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. पूर्ण पणे बरी होण्यासाठी आणखी 2-3 आठवडे लागतील. महिलेची मान मागे वाकल्यामुळे तिच्या सेरेबेलममध्ये रक्ताची गुठळी झाली होती. त्यामुळेच तिला ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोमची समस्या होती.

सेरेबेलम हा मेंदूचा एक भाग आहे. जो डोक्याच्या मागच्या बाजूला असतो, जिथे तुमचा पाठीचा कणा तुमच्या मेंदूला जोडतो.

स्ट्रोकच्या या परिस्थितीला ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हणून कधी ओळख देण्यात आली?

ब्युटी पार्लर सिंड्रोमचे पहिले प्रकरण अमेरिकेत 1993 मध्ये नोंदवले गेले. तिथे एका महिलेने याबाबत तक्रार केली तेव्हापासून या परिस्थितीला ब्युटी पार्लर सिंड्रोम असे नाव देण्यात आले.

हे देखील जाणून घ्या आणि इतरांना देखील सांगा की चुकीच्या पद्धतीने मानेला मसाज केल्याने आणि डांन्स केल्यानेही ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो

मेदांता हॉस्पिटलचे संचालक आणि न्यूरो-इंटरव्हेंशनल सर्जरीचे प्रमुख डॉ. गौरव गोयल यांच्या मते, हॉस्पिटलमध्ये स्ट्रोकचे असे रुग्णही येतात ज्यांनी मानेचा मसाज केला आहे. याचे कारण मानेचा मसाज नेहमी हलक्या हातांनी करावा. तुम्ही जोमाने मसाज करताच, जळजळ आणि मळमळ होईल, ज्यामुळे धमनी खराब होऊ शकते. यामुळे स्ट्रोक होईल. त्यामुळे मानेचा मसाज हलक्या हातांनी करावा.

त्याचप्रमाणे नाचताना डोक्याला जास्त झटका दिल्यानेही स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे डोक्यावर जास्त दबाव टाकणे टाळा. दैनंदिन कामातही काळजी घ्या.

आता हवामान बदलत आहे. उन्हाळा संपत आला आहे आणि हिवाळा येणार आहे, त्यामुळे हवामानाचा कोणत्याही प्रकारच्या झटक्याशी काही संबंध आहे का?

बरोबर कारण थंडीच्या वातावरणात रक्त घट्ट होते. त्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये रक्त नीट वाहत नाही. यामुळे स्ट्रोक होतो.

हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त असतो कारण…

  • हिवाळ्यात व्यक्ती बराच वेळ अंथरुणावर झोप घेतो. शारीरिक हालचाली कमी होते. शरीरातील उच्च रक्तदाबामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.
  • या ऋतूत भूक जास्त लागते. व्यायामाच्या अभावामुळे, तापमानात घट, शरीराला सामान्य तापमानात ठेवणे खूप कठीण होते. शरीर आपले तापमान सामान्य ठेवण्यासाठी अधिक अन्न खातो. शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळावी म्हणून हे अन्न पचवण्याचे काम करावे लागते. थंडीमुळे हा आळस केला तर ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.
  • थंडीच्या मोसमात मिठाई, तूप, तेल जास्त खाल्ले जाते. हे खाण्याचे प्रमाण वाढते आणि आपण तितका व्यायाम करत नाही, त्यामुळे उच्च रक्तदाब किंवा मधुमेह होण्याचा धोका असतो. मधुमेह, लठ्ठपणा आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांना ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त असतो.
  • असेही काही लोक आहेत जे थंड वातावरणात शरीराला उष्णता देण्यासाठी मद्यपान आणि धूम्रपान करतात. यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
  • कमी पाणी पिणे हे देखील ब्रेन स्ट्रोकचे कारण असू शकते. बहुतेक लोक हिवाळ्यात हे करतात. त्यामुळे डिहायड्रेशनची तक्रार सुरू होते. शरीराचे तापमान राखण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. पाणी कमी प्यायल्याने रक्त घट्ट होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...