आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणी एलिझाबेथ-II होत्या पैगंबरांच्या वंशज?:36 वर्षांपूर्वी 43 पिढ्यांच्या संशोधनानंतर करण्यात आला होता दावा; निधनानंतर पुन्हा चर्चा

अभिषेक पांडे18 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

1986 साली ब्रिटीश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासंबंधीचे एक पत्र मिळाले. पत्रात लिहिले होते -'खूप कमी ब्रिटीशांना माहिती आहे की राणीच्या अंगात पैगंबर मोहम्मद यांचे रक्त वाहत आहे. तथापि, सर्वच मुस्लिम धार्मिक नेत्यांना या तथ्यावर गर्व आहे.'

पत्रात पुढे लिहिले होते - 'शाही कुटुंब पैगरंबर मोहम्मद यांचे वंशज असणे हेच मुस्लिम अतिरेक्यांपासून त्यांचे संरक्षण करेल, यावर विश्वास ठेवता येत नाही.'

हे पत्र शाही वंशावर संशोधन करणाऱ्या बर्क्स पीयरेज (Burke’s Peerage) चे पब्लिशिंग डायरेक्टर हेरॉल्ड ब्रुक्स-ब्रेकर यांनी लिहिले होते. हे पत्र महाराणीच्या सुरक्षेविषयी लिहिण्यात आले होते. पण त्यात एलिझाबेथ द्वितीय यांच्या प्रेषितांच्या वंशज असल्याचा दावा करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली होती.

हा दावा अनेकदा चर्चेत आला. आता महाराणींच्या मृत्यूनंतर त्यावर पुन्हा खमंग चर्चा रंगली आहे.

त्यामुळे आजच्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आपण जाणून घेऊया की महाराणी एलिझाबेथ द्वितीय या प्रेषितांच्या वंशज असल्याचा दावा का केला जातो?

1986 मध्ये पहिल्यांदा करण्यात आला दावा

महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्या मोहम्मद साहब यांच्या वंशज असल्याचा दावा सर्वप्रथम 1986 मध्ये पब्लिकेशन हाऊस बर्क पीयरेजने प्रकाशित केला होता. ही ब्रिटनच्या शाही कुटुंबाच्या वंशावळीवर काम करणारी ब्रिटीश संस्था आहे. तिची स्थापना 1826 साली जॉन बर्क यांनी केली होती.

1986 मध्ये बर्क्स पीयरेजचे पब्लिशिंग डायरेक्टर व वंशावळीचे तज्ज्ञ हेरॉल्ड ब्रुक्स -बेकर यांनी या दाव्याशी संबंधित एक पत्र बिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना पाठवले होते. त्यात राजवंशाच्या 43 पीढ्यांचा अभ्यास केल्यानंतर महाराणी प्रेषितांच्या वंशज असल्याचे सिद्ध होते असा दावा करण्यात आला होता.

हे वृत्त सर्वप्रथम ऑक्टोबर 1986 मध्ये यूनायटेड प्रेस इंटरनॅश्नल म्हणजे यूपीआयने छापले होते.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या प्रेषितांच्या वंशज असल्याचा दावा सर्वप्रथम अमेरिकन-ब्रिटीश पत्रकार ब्रुक्स-बेकर यांनी केला होता. बेकर यांचे 2005 मध्ये निधन झाले.
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या प्रेषितांच्या वंशज असल्याचा दावा सर्वप्रथम अमेरिकन-ब्रिटीश पत्रकार ब्रुक्स-बेकर यांनी केला होता. बेकर यांचे 2005 मध्ये निधन झाले.

2018 मध्ये मोरक्कोच्या वृत्तपत्राने छापले वृत्त

महाराणी एलिझाबेथ -II प्रेषितांच्या वंशज असल्याचा दावा सर्वप्रथम मार्च 2018 मध्ये मोरक्कोच्या Al-Ousboue वृत्तपत्राने छापले होते. वृत्तपत्राने 1986 साली करण्यात आलेल्या ब्रुक्स-बेकरच्या दाव्याचा पुनरुच्चार करत एलिझाबेथ द्वितीय कशा प्रकारे प्रेषितांच्या वंशज आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.

वृत्तपत्राने लिहिले होते की, एलिझाबेथ द्वितीय प्रत्यक्षात प्रेषितांच्या कन्या फातिमा यांच्या 43 व्या पीढाच्या वारसदार आहेत.

या दाव्यानुसार, एलिझाबेथ द्वितीय यांचे रक्ताचे नाते 14 व्या शतकातील अर्ल ऑफ कॅम्ब्रिज यांच्याशी आहे, जे मध्ययुगीन स्पेनच्या मुस्लिम साम्राज्यापासून पैगंबरांची मुलगी फातिमाशी संबंधित आहेत. मोरक्कोच्या या वृत्तपत्रात पत्रकार अब्देल- हामिद अल-अवनी यांनी हे आर्टिकल लिहिले होते.

मोरक्कोच्या Al-Ousboue वृत्तपत्राने वंशावळीच्या चार्टच्या माध्यमातून महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा संबंध प्रेषितांशी असल्याचा दावा केला होता.
मोरक्कोच्या Al-Ousboue वृत्तपत्राने वंशावळीच्या चार्टच्या माध्यमातून महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा संबंध प्रेषितांशी असल्याचा दावा केला होता.

महाराणी प्रेषितांच्या वंशज असल्याचा दावा का झाला?

महाराणी व पैगंबर मोहम्मद यांच्यातील संबंध पटवून देण्यासाठी या दाव्यातील काही महत्वाचे पात्र समजून घ्यावे लागतील. खाली दिलेले सर्व दावे मोरक्कोच्या वृत्तपत्राने प्रकाशित केले होते...

 • फातिमा पैगंबर मोहम्मद यांच्या कन्या होत्या. त्यांचे वंशज अल-कासिम स्पेनचे राजे होते. अल-कासिमचे वंशज मुलगी झायदा व त्यांचे सुपुत्र सांचोच्या वंशजांचा महाराणीशी संबंध आहे.
 • 11 व्या शकतात स्पेनच्या सेव्हिले शहराचे शासक अबू अल-कासिम मोहम्मद इब्न अब्बाद होते. अल-कासिम पैगंबर मोहम्मद यांच्या कन्या फातिमाच्या वंशज असल्यामुळे थेट पैगंबरांचे वंशज मानले जात होते.
 • अल-कासिम यांनी अब्बासिद नावाने आपला राजवंश तयार केला व अल-अन्दलुस स्थित सेव्हिलेवर इसवीसन 1023 ते 1042 पर्यंत राज्य केले. अल-अन्दलुस स्पेन व पोर्तुगाल स्थित मुस्लिम शासकांचे राज्य असणाऱ्या साम्राज्याला म्हटले जात होते.
 • 8 व्या शतकात अरबच्या उमय्यद राजवंशाच्या माध्यमातून स्पेनमध्ये मुस्लिमांची राजवट सुरू झाली. ती 15 व्या शतकापर्यंत टिकली. त्यानंतर हा राजवंश दुबळा झाल्यानंतर त्याची जागा अल-कासिमच्या अब्बासीद राजघराण्याने घेतली.
 • अब्बासीद राजवंशाचे तिसरे राजे होते -अल-मुतामिद इब्न अब्बाद. त्यांना एक मुलगी होती. झायदा असे तिचे नाव होते. सेव्हिलेवर अल्मोराविदोंनी हल्ला केला. अल्मोराविद एक निर्दयी मुस्लिम राजघराणे होते. मोरक्कोच्या आसपासच्या भागात त्याचे राज्य होते.
 • या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सेव्हिलेच्या मुस्लिम राजकुमारी झायदा यांनी स्पेनचे राजे अल्फोंसो-VI यांच्याकडे आश्रय घेतला. अल्फोंसो लियोन, कॅसिले व गॅलिसिया क्षेत्राचे राजे होते.
 • अल्फोंसो-VI यांनी झाएदाचा स्वीकार केला. झायदा धर्मांतर करून ख्रिश्चन झाली. त्यानंतर तिने स्वतःचे नाव बदलून ईसाबेल ठेवले.
 • अल्फोंसो व झायदाला एक मुलगा झाला. त्याचे नाव सांचो अल्फोंसेज असे ठेवण्यात आले.
 • सांचोच्या एका वंशजाने पुढे चालून तिसऱ्या अर्ल ऑफ कॅम्ब्रिज, रिचर्ड कॉनिसब्रॉशी लग्न केले. अर्ल ऑफ कॅम्ब्रिज इंग्लंडचे राजे एडवर्ड -III याचे नातू होते.
 • रिचर्ड कॉनिसब्रॉ यांच्या वंशजांचा संबंध नंतर इंग्लंडचे राजे एडवर्ड-IV यांच्याशी आला.
 • अशाच प्रकारे पुढे हे रक्ताचे नाते स्कॉटलंडचे राजे जेम्स -V यांच्या माध्यमातून स्कॉटलंडच्या तत्कालीन महाराणी मेरी यांच्यापर्यंत पोहोचले.
 • त्यानंतर हे नाते मेरीचे सुपुत्र जेम्स-VI यांच्यापर्यंत आले. ते नंतर इंग्लंडचे राजे झाले.
 • 11 पीढ्यांनंतर या नातेसंबंधांचा आणखी विस्तार होत ब्रिटनचे राजे जॉर्ज VI पोहोचले.
 • एलिझाबेथ द्वितीय या जॉर्ज -VI यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म 1926 मध्ये झाला. त्यानंतर 1952 साली त्या ब्रिटनच्या महाराणी झाल्या.
एलिझाबेथ द्वितीय यांचे 96 व्या वर्षी 8 सप्टेबर 2022 रोजी निधन झाले. त्यांनी ब्रिटनवर सर्वाधिक 70 वर्षे राज्य केले.
एलिझाबेथ द्वितीय यांचे 96 व्या वर्षी 8 सप्टेबर 2022 रोजी निधन झाले. त्यांनी ब्रिटनवर सर्वाधिक 70 वर्षे राज्य केले.

दाव्यावर अनेक सवाल

 • या संपूर्ण दाव्यातील सर्वात महत्त्वाचा वाद म्हणजे झायदाच्या ओळखीबद्दलचा मुद्दा. काही इतिहासकारांच्या मते, झायदा ह्या पैगंबरांच्या वंशज होत्या किंवा नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
 • ब्रिटीश नियतकालीक स्पेक्टेटरच्या मते, झायदाच्या ओळखीविषयी मतैक्य नाही.
 • मोरक्कोच्या वृत्तपत्राने झायदा ही सेव्हिलेचे तिसरे राजे अल-अब्बाद यांची कन्या असल्याचा दावा केला आहे. तर काही इतिहासकारांच्या मते, झायदा ह्या अल-अब्बाद यांच्या पत्नी होत्या. काही मुस्लिम इतिहासकारांनी झायदा या अल-अब्बाद यांच्या सूनबाई व अब्बाद यांचे सुपुत्र अबू अल-फतह अल -मामून यांच्या पत्नी असल्याचा दावा केला आहे.
 • द इकोनॉमिस्टने इतिहासकारांचा दाखला देत म्हटले आहे की, त्या प्रेषितांचे वंशज खलिफा मुतामिद बिन अब्बाद यांच्या कन्या होत्या. याऊलट काहींच्या मते झायदाचे लग्न मुतामिद बिन अब्बाद घराण्यात झाले होते.
 • नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार, एलिझाबेथ द्वितीय व प्रेषितांचा संबंध जोडण्यासाठी झायदा ह्या मूळ स्त्रोत असल्याचा दावा साफ खोटा आहे.
 • पीयरेजच्या मते, या मूळ स्त्रोत सर इयान मोनक्रिफ होते. त्यांनी ही वस्तुस्थिती 1982 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'रॉयल हायनेस: एनसेस्ट्री ऑफ द रॉयल चाइल्ड' नामक पुस्तकांत मांडली होती.

दाव्याला प्रोपेगेंडा का म्हटले गेले?

लेखिका लेस्ली हेजलटन यांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही थेअरी पाश्चिमात्य राष्ट्रांत मुस्लिम धर्माचा उदोउदो करण्यासाठी पुढे करण्यात आल्याचा दावा केला. रेडडिट सारख्या सोशल फोरमवरही हा प्रचार जगावर पुन्हा एकदा ब्रिटीश साम्राज्याची पताका फडकावण्याचा एक कट असल्याचा दावा करण्यात आला.

द इकोनॉमिस्टच्या मते, 2018 मध्ये अरब एथिस्ट नेटवर्कच्या वेब फोरमवर एक बातमी हेडलाइनसह चालवण्यात आली होती -"महाराणी एलिझाबेथ यांनी मुस्लिमांवर राज्य करण्याच्या आपल्या अधिकाराचा दावा सांगितला पाहिजे."

3 वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध ब्रिटीश लेखिका लेस्ली हेजलटन यानी महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्या प्रेषितांच्या वंशज असल्याचा दावा फेटाळून लावला होता.
3 वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध ब्रिटीश लेखिका लेस्ली हेजलटन यानी महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्या प्रेषितांच्या वंशज असल्याचा दावा फेटाळून लावला होता.

महाराणी व प्रेषितांतील संबंधाच्या दाव्याचे सत्य काय?

हे दावे प्रकाशझोतात आल्यानंतर ब्रिटीश रॉयल घराण्याने त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. आम्ही अशा दाव्यांवर भाष्य करत नाही, असे ते म्हणाले.

काही इतिहासकारांच्या मते, इतिहासातील ज्या लोकांच्या उल्लेखाच्या आधारावर हा दावा करण्यात आला, त्यांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आणखी संशोधन करण्याची गरज आहे. ब्रिटीश इतिहासकार डेव्हीड स्टार्की यांनी 2018 मध्ये या दाव्यावर भाष्य करताना 'यात काहीच विचित्र नाही', असे सूचक विधान केले होते.

मध्ययुगीन स्पेनच्या वंशावळीचे रेकॉर्ड या दाव्याची पुष्टी करतात. 2018 मध्ये इजिप्तचे माजी ग्रँड मुफ्ती अली गोमा यांनीही हा दावा खरा असल्याचा मत व्यक्त केले होते.

या दाव्याचे जनक सुप्रसिद्ध अमेरिकन-ब्रिटीश पत्रकार व वंशावळीचे तज्ज्ञ ब्रुक्स-बेकर यांचे 2005 मध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूवर ब्रिटनच्या द टेलीग्राफ वृत्तपत्राने आपल्या शोकसंदेशात म्हटले होते की, 'पत्रकारांसाठी त्यांचा (बेकर असण्याचा) सर्वात मोठा फायदा म्हणजे ते नेहमी लक्षवेधक टिप्पणी करत होते. नुकसान हे होते की ते नेहमीच चुकीचे ठरले.'

संदर्भ

https://www.economist.com/middle-east-and-africa/2018/04/05/muslims-consider-queen-elizabeths-ties-to-the-prophet-muhammad

https://archive.ph/hxEEX#selection-643.413-643.656

https://www.dailymail.co.uk/news/article-5587555/Historians-trace-Queens-heritage-Prophet-Muhammad.html

https://timesofindia.indiatimes.com/world/uk/queen-a-direct-descendant-of-the-prophet-report/articleshow/63675110.cms

https://timesofindia.indiatimes.com/world/uk/queen-a-direct-descendant-of-the-prophet-claims-report/articleshow/63671907.cms

https://www.snopes.com/news/2022/09/08/queen-elizabeth-prophet-muhammad/

https://english.alaraby.co.uk/news/queen-elizabeth-ii-descended-prophet-muhammad

https://www.thetimes.co.uk/article/queen-may-be-child-of-muhammad-k5xd9btcl

बातम्या आणखी आहेत...